संजय गांधी निराधार अनुदान योजना शासन निर्णय GR: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील एप्रिल 2022 ते मार्च 2023 करिता झालेल्या अनुदानात संबंधित शासन निर्णयाची माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.
संजय गांधी निराधार अनुदान योजना शासन निर्णय GR
सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये 50 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद 100% रक्कम वित्त विभागाने वितरित केलेली आहे. त्या अनुषंगाने सर्वसाधारण लाभार्थ्या करिता संजय गांधी निराधार अनुदान योजना 2022 साठी एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम 540 कोटी आहे. ही या शासन निर्णयान्वये विवरणपत्रांमध्ये वितरित करण्यास शासनाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच मासिक विवरण पत्रानुसार निधी पुढे किंवा मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संवितरण प्रणालीवर देण्यात आलेली आहे.

सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आलेली आहे की, सोबतच्या विवरण पत्रातील New CO Code वर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे. त्यांनी वितरित केलेल्या अनुदानाची वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे. हे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळविलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे.
सदर निधी मधून झालेला खर्च सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, वृद्ध विकलांग व निराश्रीत व्यक्तींचे कल्याण, संजय गांधी निराधार अनुदान योजना इतर खर्च या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.
225 कोटी मंजूर श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना 2022-23 GR
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असे देखील कळविण्यात येते की, त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालाच्या कार्यालयात नोंदविलेल्या खर्चाची ताळमेळ घालून त्याप्रमाणे टाळमिळाचे विवरण पत्राची प्रत या विभागाच्या लेखापरीक्षण कार्यासनास पाठवावी. तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत. त्याची प्रत या विभागाच्या नियोजन कार्यासनास पाठवावी. खर्चाचा ताळमेळ काम व्यवस्थितरित्या पार न पडल्यास त्याचप्रमाणे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखा कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हाधिकार्यांची राहील. असे या शासन निर्णयांमध्ये नमूद केलेले आहे.
या शासन निर्णयाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. संजय गांधी निराधार अनुदान योजना शासन निर्णय GR ची सत्यप्रतता आणि अधिक सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वर जाऊ शकता. https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202205041314085122.pdf
- Election Commission Maharashtra Voter List ऑनलाइन तपासणी
- Mahadbt Farmer Scheme List | महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2023
- Tractor Loan Online Apply: ट्रॅक्टर कर्ज योजना रु. 2500000/- कर्ज करा अर्ज
- Pik Karj: प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान खात्यात जमा !! कोणते शेतकरी पात्र??
- 100% अनुदान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती