अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र 2024 संपूर्ण माहिती: फॉर्म PDF, कागदपत्रे

Apang Pension Yojana Maharashtra : नमस्कार मित्रांनो, आज आपण अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र (Handicap Pension Scheme Maharashtra) योजनेसंबंधित संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. त्यामध्ये अपंग पेन्शन योजनेचे उद्दिष्ट काय, (Handicapped Pension form Maharashtra), अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, आवश्यक पात्रता काय, या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा इत्यादी सर्व माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

samaj kalyan portal maharashtra

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य सरकारने शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांना पेन्शन योजना देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील दिव्यांग नागरिकांसाठी विकलांग पेन्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्रातील शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांना आर्थिक सहाय्य म्हणून पेन्शन देते. अपंग निवृत्ती वेतन योजना SJSA महाराष्ट्र मार्फत मागविण्यात येत असून पात्र नागरिकांना मदतीची रक्कम दिली जाईल.

राज्यात अंध, अपंग, शारीरिक आजाराने रोगग्रस्त, निराधार व्यक्ती तसेच निराधार विधवा त्यासोबतच परित्यक्ता, देवदासी या दुर्बल घटकांसाठी त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य्य मिळावे, या उद्देश्याने राज्य पुरस्कृत तसेच केंद्रपुरस्कृत शासकीय पेन्शन योजना राबविल्या जातात.

पेन्शन योजना महाराष्ट्र

कोणासाठी योजना कोणतीकोणामार्फत
राज्यातील निराधार लोकांसाठी पेन्शनसंजय गांधी निराधार निवृत्तीवेतन योजनाराज्य पुरस्कृत योजना
वृद्ध व्यक्तींसाठी पेन्शन श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनाराज्य पुरस्कृत योजना
दारिद्र्यरेषेखालील वृद्ध व्यक्तींसाठीइंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनाकेंद्र पुरस्कृत योजना
विधवा महिलांसाठीइंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनाकेंद्र पुरस्कृत योजना
दिव्यांग/अपंग व्यक्तींसाठीइंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनाकेंद्र पुरस्कृत योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत राज्यातील अपंग /दिव्यांग व्यक्तींना दरमहा पेन्शन (Apang Pension) देण्यात येते. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016’ (RPWD Act 2016) अन्वये 21 प्रवर्गातील दिव्यांगांना राज्यातील सर्व प्रवर्गातील अपंग व्यक्तींसाठी हि योजना लागू आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील अपंग व्यक्तींना दरमहा पेन्शन मिळून देणे हा आहे. आज आपण दिव्यांग व्यक्तींसाठी असणारी अपंग पेन्शन योजना मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना संबंधित माहिती घेणार आहोत.

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र Highlights

योजनेचे नावअपंग पेन्शन योजना महाराष्ट्र
योजना प्रकारराज्य सरकारची योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागसामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग
लाभार्थीराज्य अपंग व्यक्ती
उद्देशअपंग लोकांना मदत करणे
पेन्शनची रक्कम द्यावी600 रुपये दरमहा
अधिकृत संकेतस्थळhttps://sjsa.maharashtra.gov.in/

अपंग कर्ज योजना : अर्ज, लाभ, संपर्क कार्यालय संपूर्ण माहिती

अपंग पेन्शन योजनेची उद्दिष्टे

  • या योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करावे.
  • योजनेचा लाभ घेऊन दिव्यांग व्यक्ती आपल्या जीवनातील अडचणींवर मात करून जीवनात पुढे जाऊ शकतात.
  • दिव्यांग पेन्शन योजनेंतर्गत शिक्षणापासून वंचित अशा अपंग मुलांना मोफत शिक्षण देणे.

राज्य सरकारचा मुख्य उद्देश हा आहे की राज्यातील सर्व गरीब आणि असहाय कुटुंबातील नागरिक ज्यांच्या शरीराचे अवयव 80% पेक्षा जास्त विकृत आहेत, त्यांना त्यांच्या शरीराने कोणतेही काम करणे अत्यंत अवघड आहे, महाराष्ट्र सरकार दरमहा 600 रुपये मदतीचे वाटप करते. राज्यातील ज्यांचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान आहे आणि दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत अशा नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

अपंग प्रमाणपत्र online: फॉर्म , स्मार्ट कार्ड, शासन निर्णय जीआर, अपंग प्रकार, नियम

महाराष्ट्र अपंग योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?

  • अर्जदार अपंग व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • सरकारी नोकरी असणाऱ्या अपंग व्यक्तीला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
  • या योजनेअंतर्गत ८०% अपंगत्व असलेला व्यक्तीच अर्ज करून लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
  • अर्जदाराचे वय १८ ते ६५ वर्ष्यादरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या अपंग कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३५,०००/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.

लाभ

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व सेवानिवृत्ती योजनेंतर्गत 18 ते 65 वर्षांखालील अपंग लाभार्थ्यांपैकी केवळ 80% अपंग किंवा एक किंवा अधिक अपंग किंवा एकाधिक अपंग (दोन किंवा अधिक अपंग) लाभार्थी पेन्शनसाठी पात्र आहेत. आहेत. पात्र लाभार्थींना केंद्र सरकारकडून रु.200/- प्रति महिना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रति महिना एकूण रु.600/- दिले जातील.

अपंग पेन्शन योजनासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ओळखपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • वय प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

अपंग पेन्शन योजना साठी अर्ज कसा व कुठे करावा?

  • अपंग पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला/तहसीलदार/तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
  • अपंग पेन्शन योजनेचा फॉर्म या कार्यालयांमध्ये तुम्हाला मिळेल.
  • फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून नंतर आवश्यक ती कागदपत्रे जोडून ती तुम्हाला जिल्हाधिकारी /तहसीलदार/तलाठी कार्यालयामध्ये जमा करावी लागतील.
  • तुमचा फॉर्म या कार्यालयांमध्ये जमा झाल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
  • अर्जाची पडताळणी नंतर तुमची पेन्शन सुरु केली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top