अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना संपूर्ण माहिती: अर्ज, पात्रता, कागदपत्रे


Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना 2023 राबवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगार योजनांची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये अर्जदाराची पात्रता, आवश्यक कागदपत्रे कोणती, कर्ज मंजुरी ची पद्धत काय, कर्जासाठी अर्ज कसा करावा, त्याच्या अर्जाचा नमुना, अधिक माहितीसाठी टोलफ्री नंबर आणि पत्ता तसेच इतर अनेक गोष्टींची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

Annasaheb Patil Loan Yojana Registration

बीज भांडवल कर्ज प्रकरणाची माहिती

  • इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने महारोजगार या वेबपोर्टलवर प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • महारोजगार वेब पोर्टल वरती नोंदणीकृत असल्यास लाभार्थ्यांनी त्याचे प्रोफाईल सक्रिय करावे.
  • आयडी व पासवर्ड देण्यात आलेल्या मोबाईल आणि ईमेलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून लॉगिन करून कर्ज योजनेसाठी अर्ज भरावा लागेल.
  • अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. तसेच व्यवसायांवर आवश्यक परवाने लायसन्स यांचीही सत्यप्रत जसे की शॉप, वाहन परवाना व इत्यादी आवश्यकतेनुसार अपलोड करावीत.
  • स्थळ पाहणीसाठी दिनांक व वेळ निश्चित करावी.
  • स्थळ पाहणी करते वेळी जिल्हा अधिकारी अधिकारी यांना खालील कागदपत्रांची मूळ प्रत द्यावी.
  1. उत्पन्नाचा दाखला
  2. लाभार्थ्याची शपथपत्र
  3. जमीनदाराची शपथपत्र
  4. निविदा बँकेचे ना देय प्रमाणपत्र
  • तसेच जिल्हा अधिकारी अधिकारी यांना ऑनलाइन सादर केलेली उर्वरित कागदपत्रे तपासण्यासाठी सादर करावीत.
  • जर फी लाभार्थ्याने ऑनलाईन अर्ज करते वेळी दिली नसल्यास, ती स्थळ पाहणी करताना जिल्हा अधिकारी किंवा नोडल अधिकारी यांना द्यावी आणि त्याची पावती घ्यावी.
  • लाभार्थ्याने सादर केलेल्या अर्जाची स्थिती लाभार्थ्याच्या डॅशबोर्डवर येईल.

Kisan Credit Card Yojana In Marathi: KCC पीक कर्ज योजना माहिती

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना लाभार्थ्याची पात्रता

पात्रतापात्रता सिद्ध करणारे प्रमाणपत्र / कागदपत्र
महाराष्ट्राचा रहिवाशी असावातहसीलदाराने दिलेला अधिवास दाखला
त्याचे जिल्ह्यातील वास्तव्य मागील किमान तीन वर्ष असावे.तीन वर्ष वास्तव्य दर्शविणारे कागदपत्र उदा. विजेचे बिल / रेशन कार्ड / ग्रामपंचायत दाखला / आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र
वय हे १८ ते ४५ चे दरम्यान असावेजन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला.
maharojgar.gov.in या वेब प्रणाली मध्ये नोंदणीकृत असावा.अर्ज online करण्यासाठी maharojgar.gov.in या वेब प्रणाली मध्ये नोंदणी अनिवार्य आहे.
अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी रु.५५,०००/-व ग्रामीण भागासाठी रु.४०,०००/-च्या आत असावे.तहसीलदार यांच्याकडून देण्यात आलेला उत्पन्नाचा दाखला.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज अर्जासोबत सादर कारावयाची आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत सादर करावयाची इतर आवश्यक कागदपत्रेपात्रता सिद्ध करणारे प्रमाणपत्र / कागदपत्र (अर्जा सोबत जोडावयाची कागदपत्रे)
किमान दोन सक्षम जामीनदार यांचे हमी / प्रतिज्ञा पत्रसाक्षीदाराने रु. १०० मूल्याचे मुद्रांक पेपरवर द्यावयाचे
वेतन कपातीचे हमी पत्रनोकरदार जामिनदाराचे कार्यालय प्रमुखाचे वेतन कपातीचे हमी पत्र
प्रकल्प अहवाल
व्यवसायास आवश्यक दरपत्रके (कोटेशन)पुरवठादाराकडून घ्यावयाचे दरपत्रक
व्यवसायाच्या जागेसंबंधी पुरावा (भाडे करारनामा / सात बारा / संमती पत्र )प्रस्तावित व्यवसाय करावयाच्या जागेच्या / दुकान मालकाने रु. १०० मूल्याचे मुद्रांक पेपरवर द्यावयाचे संमती पत्र
व्यवसायानुरूप आवश्यक शिक्षण / प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्रप्रशिक्षण संस्थेने दिलेले प्रमाणपत्र
व्यवसायानुरूप आवश्यक दाखला / परवाने उदा. ग्रामपंचायत / महानगरपालिका याचे ना हरकत दाखला / अनुमती परवाना, वाहन परवाना ई.गुमास्ता, आर.टी.ओ. ने दिलेला परवाना.

SBI Loan Information In Marathi | स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजना मराठी

कर्ज मंजुरीनंतर सादर करावयाची कागदपत्रे

अर्जासोबत सादर करावयाची इतर आवश्यक कागदपत्रेपात्रता सिद्ध करणारे प्रमाणपत्र / कागदपत्र (प्रमाणपत्र / आवश्यक कागदपत्राचा नमुना पाहण्यासाठी स्तंभ ३ वरील संबधित प्रमाणपत्रावर क्लिक करावे)
रक्कम पोच पावती (मुद्रांकीत)अर्जदाराने द्यावयाची पावती
डिमांड प्रोमिसरी नोटअर्जदाराने द्यावयाची वचन चिट्ठी
शुअरीटी बॉंडरु १०० मूल्याच्या मुद्रांक पेपर वर अर्जदाराने द्यावयाचे हमीपत्र
हायपोथीकेशन डीड अथवा स्थावर / जंगम मालमत्ता तारण करारनामारु १०० मूल्याच्या मुद्रांक पेपर वर अर्जदाराने करावयाचा करारनामा
जामीनदार स्थावर / जंगम मालमत्ता तारण करारनामा
(अ. क्र. ४ नसल्यास)
जामिनदाराने रु १०० मूल्याच्या मुद्रांक पेपरवर करून द्यावयाचा करारनामा
आगावू सही केलेले धनादेशअर्जदाराने स्वाक्षरीत करून द्यावयाचे धनादेश


अर्जदाराची पात्रता मध्ये दर्शविण्यात आलेली पात्रते बाबतची प्रमाणपत्रे / कागदपत्रांबरोबरच खाली दर्शविण्यात आलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रेसुद्धा कर्ज अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे.

कर्ज मंजूर झाल्यावर लाभार्थ्याने काय करावे?

  • कर्ज मंजूर झाल्यावर महामंडळाच्या नावे आगाऊ धनादेश जमा करावी.
  • लाभार्थ्यांनी तारण गहाण करारनामा नोंदणी करून द्यावा.
  • लाभार्थी वा जमीनदाराच्या मिळकतीवर बोजा चढवून द्यावा.
  • जनरल एग्रीमेंट दीड करून द्यावे.
  • लाभार्थ्याने प्रॉमिसरी नोट व मनी रिसिप्ट भरून द्यावी.
  • कर्ज रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर परतफेडीच्या कालावधीतील ठरलेल्या त्याप्रमाणे मुद्दल व व्याज या रकमेचा भरणा करावा.

स्वयंरोजगार या वेबपोर्टल वर इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा कोणत्या?

  • विविध प्रवर्गातील उमेदवारांकरीता महामंडळाच्या योजना
  • उमेदवारास पात्रतेनुसार सुयोग्य स्वयंरोजगार योजनेचा शोध घेणे
  • उमेदवारांना स्वयंरोजगार कर्ज अर्ज ऑनलाईन भरणे
  • कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता, अटी व शर्ती, कर्ज मंजुर होण्यापूर्वी तसेच, कर्ज मंजुर झाल्यानंतर सादर करावयाच्या कागदपत्रे इत्यादी माहिती उपलब्ध
  • ऑन लाईन सादर केलेल्या अर्जाची सद्यःस्थिती तपासणे, कर्ज परतफेडीची सद्यस्थिती पाहणे
  • २५० पेक्षा अधिक नमुना प्रकल्प अहवालांची वेबपोर्टलवर उपलब्धता
  • कर्जफेडीच्या हप्त्यांची परिगणना (इएमआय कॅलक्युलेटर) करणे
  • उमेदवारांच्या अडचणी निराकरणासाठी हेल्पलाईन

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती महाराष्ट्र: फार्म, फायदे, अर्ज, कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना अर्ज कसा करावा?

  • रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी नसल्यास, नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
  • सदर रोजगार नोंदणी क्रमांक पुढील रकान्यात टाकावा
  • आपला प्रोफाईल डेटा दिसेल(प्रोफाईल वर फोटो नसेल तर आपण फोटो अपलोड करावा.)
  • आपणास उपलब्ध असणाऱ्या योजना पाहता येतील.
  • निवडलेल्या योजनेला अप्लाय केल्यास संबंधित अर्ज उपलब्ध होईल.
  • अर्जा मध्ये माहिती भरून तो पूर्ण करावा त्यानंतर आवश्यक ती कागद पत्रे अपलोड करावीत.
  • पूर्ण केलेल्या अर्जानंतर online अथवा offline पद्धतीने अर्ज शुल्क (फॉर्म फी रु. ५०) भरणा करावा.
  • Offline पद्धतीने अर्ज सादर केल्यास जिल्हा कार्यालयात फॉर्म फी रु. ५० चा भरणा करावा व शुल्क भरल्याची पावती online अपलोड करावी.
  • ज्या तारखेस फॉर्म फी ची भरणा केली जाईल त्या तारखेपासून कर्ज अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

कर्ज मंजुरीची कार्यपद्धती आणि अर्ज मंजूरीचे टप्पे कोणते?

  • अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या https://udyog.mahaswayam.gov.in/#/home वर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारास सिस्टीम द्वारे SMS व email सूचना प्राप्त होईल.
  • स्थळ पाहणीसाठी लाभार्थी वेबपोर्टलद्वारे दिनांक व वेळ स्वतः निश्चित करेल त्यानुसार संबधीत जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालया मार्फत प्रस्तावित व्यवसायाच्या जागेची, वास्तव्याच्या स्थळाची पाहणी तसेच जामीनदाराची पडताळणी करण्यात येईल.
  • सादर केलेल्या कर्ज प्रकरणाचा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर बँकेकडे पाठवण्यात येतो.
  • बँकेने कर्ज मंजुरी आदेश दिल्यानंतर कर्ज प्रकरणाची फाईल आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून महामंडळाकडे मंजुरीकरिता पाठवण्यात येते.
  • महामंडळाकडून कर्ज प्रकरण मंजुरी केल्यानंतर मंजुरी आदेश अर्जदारास सिस्टीम द्वारे (SMS व email) प्राप्त होईल. त्यानंतर अर्जदाराकडून वैधानिक कागदपत्राची पूर्तता करून घेण्यात येईल.
  • त्यानंतर महामंडळाकडून बीज भांडवलाच्या रकमेचा धनाकर्ष (डीडी) जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात येतो व त्याची माहिती लाभार्थ्याला सिस्टीम द्वारे (SMS व email) देण्यात येते.
  • महामंडळाकडून प्राप्त झालेले बीज भांडवल आणि बँकेने मंजूर केलेली कर्जाची रक्कम एकत्रितपणे अर्जदाराच्या बँक खाती जमा करण्यात येते.
  • कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यावर लाभार्थ्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र, ई–मेल वर प्राप्त होईल.

पत्ता

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
जी. टी हॉस्पिटल कंपाऊंड, बद्ड्रुद्दीन तय्यबजी मार्ग,
जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मागे, मुंबई 400 001.
दूरध्वनी. 22657662,
फॅक्स क्रमांक.22658017
ईमेल:[email protected]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top