PM Kisan Credit Card Yojana in Marathi: नमस्कार मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड च्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण उपडेट आहे. तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज 2021-2022 च्या बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी केलेले गेलेल्या काही महत्त्वपूर्ण घोषणा मध्ये एक महत्त्वाचे आणि मुख्य घोषणा म्हणजे शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत चे बिनव्याजी कर्ज. खरिप पीक कर्जाचे वाटप सुरू होईल 15 एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज कसा दिला जाणारा, याचा लाभ घेण्यासाठी कशा प्रकारे अर्ज केला जाऊ शकतो किंवा कुठल्या योजनेच्या अंतर्गत हे कर्ज दिले जाईल जाणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखात तुम्हाला मिळणार आहेत.
Update किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम
ज्यामध्ये 24 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 या कालावधीमध्ये किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेच्या अंतर्गत किसान क्रेडिट कार्डचे वाटप केले जाणार आहे. या अंतर्गत किसान सन्मान निधीचे लाभार्थी शेतकरी आहेत. अशा प्रत्येक शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड वितरित केले जावे. यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मोहीम राबवली होती. मात्र महाराष्ट्रातील अद्याप 80 टक्के पेक्षा जास्त शेतकरी किसान क्रेडिट कार्ड च्या प्रतीक्षेत आहे. 24 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 या कालावधीमध्ये ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी‘ ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्याच्या अंतर्गत कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग याप्रमाणे राष्ट्रीय बँक आहे. तर या सर्व बँकांच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वीपणे राबवून 24 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप केले जाणार आहे.
Update किसान क्रेडिट कार्ड बिनव्याजी कर्ज
21 मार्च 2022 रोजी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर विभागाची दिल्लीत पार पडलेल्या बैठकीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड चे अर्ज भरण्यासाठी यंत्रणा करण्यात आलेले आहे. अहमदनगर, सोलापूर, सातारा, बीड, औरंगाबाद या सर्व जिल्ह्यांच्या माध्यमातून हे पीक कर्जाचे किसान क्रेडिट कार्ड चे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले गेले होते. त्याप्रमाणे या वर्षीसुद्धा ऑनलाइन प्रणाली विकसित करून ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आणि या कालावधीमध्ये राज्यस्तरीय विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येईल. ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यापर्यंत हि मोहीम पोहोचवली जाणार आहे.
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना
राज्यांमध्ये पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना नावाची ही योजना राबवली जाते. 1990 पासून पन्नास हजार रुपयांपर्यंतच्याकर्जाला तीन टक्के व्याज दिले जात होते. यामध्ये सुरवातीला काही राष्ट्रीयीकृत बँकांचा यात समावेश करण्यात आला नव्हता. सहकारी बँक, सोसायटीच्या माध्यमातून दिली जाणारी कर्जे यांचा समावेश करण्यात आली होता. तेव्हा हे कर्ज एक लाखापर्यंत वाढविण्यात आले. त्यानंतर त्याच्यामध्ये काही सुधारणा करून परत राष्ट्रीयकृत बँका इतर बँकांचा समावेश करण्यात आला. पण आत्ता एक लाखापर्यंत कर्जाला तीन टक्के व्याज सवलत दिली जाते. आणि तीन लाखापर्यंत च्या कर्जाला एक टक्का व्याज सवलत दिली जाते.
किसान क्रेडिट कार्ड KCC वाटप मोहीम समविष्ट जिल्हे
1.87 कोटी किसान क्रेडिट कार्ड दिली गेली आहेत आणि याव्यतिरिक्त 2.5 कोटी नवीन किसान क्रेडिट कार्ड दिली जाणार आहेत. अशा प्रकारचे केंद्र शासनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे. पी एम किसान सन्मान निधी चे लाभार्थी आहेत. अशा लाभार्थ्यांना क्रेडिट कार्ड देण्यासाठीचे तयारी सुरु केली जाईल. साधारणपणे खरिपाचे पीक कर्ज दिले जाईल. ते कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दिले जातील. कारण 2020 मध्ये सोलापूर, नगर, नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती या जिल्यांसाठी KCC साठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून घेतले होते. यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज दिले जातील.
किसान क्रेडिट कार्ड व्याजदार सवलत
- किसान क्रेडिट कार्ड च्या अंतर्गत कर्ज दिले जाणारे कर्ज जर शेतकरी नियमित परतफेड करत असतील, तरी या कर्जावर ते चार टक्के व्याजदर सवलत केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाते.
- जर आपण एक लाखाचं अर्ज भरत असाल, या कर्जावर व्याज लावलेला असेल, तर त्याच्या पैकी चार टक्के व्याज हे केंद्र शासनाच्या माध्यमातून मान्य केले जातात.
- म्हणजे एकंदरीत 6 टक्के व्याज व्याज सवलत ही मंडळी राज्य शासनाच्या माध्यमातून केले जाते. दोन टक्के ते तीन टक्के आपल्याला पंजाबराव देशमुख व्याज सवलत मिळणार आहे आणि उरलेल्या चार टक्के आहे ते किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपले माफ होणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड अंगणात पीक कर्ज मिळवण्यासाठी पात्रता काय?
- किसान क्रेडिट कार्ड देताना दुसऱ्या बँकेचे कर्ज नसणे आवश्यक असते कारण बरेचसे शेतकरी थकबाकीदार असतात.
- दुसऱ्या बँकेचे जर आपल्याकडे कर्ज असेल, तर आपल्याला किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मिळत नाही.
- त्यामुळे जे शेतकरी नवीन कर्ज घेतात आणि ते कर्ज वेळेवरभरतील अशा शेतकऱ्यांना असे योजनांचा लाभ मिळू शकतो.
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत किती व कशासाठी कर्ज मिळते?
- एक लाखाचं कर्ज किंवा तीन लाखाचे कर्ज आपल्या क्षेत्रानुसार आपल्याला मिळेल. कारण पीक कर्ज घ्यायला गेलं, तर शेतकऱ्यांना 30 हजार रुपये 35 हजार रुपये फक्त कोरडवाहू क्षेत्रासाठी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर मिळते.
- पशुधन, मत्स्यपालन,शेळी किंवा इतर व्यवसाय असेल, तर अशा सर्व बाबींचा समावेश करून जर ते शेतकऱ्यांना कर्ज दिलं. तर एक हेक्टर पर्यंत तीन लाख रुपये अशा मर्यादेत कर्ज दिला जाते.
- ट्रॅक्टर खरेदी, कृषी अवजार खरेदी आणि इतर बाबींसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज दिले जातात आणि या कर्जावर ती पुन्हा करत असाल तर ४ टक्केपर्यंत व्याज सवलत दिली जाते.
- तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवायचे असेल, तर या सर्व योजनांचे एकत्रीकरण करूनच मिळणार आहे आणि याच्यासाठीच या प्रक्रिया आता राज्य शासन राबवत आहे.
किसबी क्रेडिट कार्ड KCC अंर्गत पीक कर्जासाठी अर्ज केव्हा सुरु होतात?
15 एप्रिल पासून पीक कर्जाचे वाटप सुरू होतील. पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना जास्तीत जास्त किसान क्रेडिट कार्डअंतर्गत लाभ दिला जाईल.
- 800+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | List of Marathi Mhani With PDF
- प्रधानमंत्री आवास योजना मराठी माहिती: फार्म Online, PMAY List, कागदपत्रे, अर्ज
- Sant Tukaram Information in Marathi | संत तुकाराम महाराज माहिती
- प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मराठी माहिती महाराष्ट्र: फार्म, फायदे, अर्ज, कागदपत्रे
- Agniveer Bharti 2023: Online Apply, Agniveer Recruitment 2023