Bachat Gat Karj Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी राबवण्यात येणाऱ्या गट कर्ज व्याज परतावा योजना ची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये कोणत्या बँकांमार्फत हे कर्ज दिले जाते , कर्जाची परतफेड कालावधी, अनुदान, आवश्यक पात्रता, कर्जाचे हप्ते आणि व्याजदर, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अर्ज कुठे करावा या संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
Table of Contents
गट कर्ज व्याज परतावा योजना
महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये अर्जदाराला शासनमान्य भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत) कर्ज दिले जाईल. अर्जदाराला शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थांना बँकेतर्फे उद्योग उभारणी, स्वयंरोजगार याकरिता कर्ज दिले जाईल. या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जातो.
गट कर्ज व्याज परतावा योजना व्याज दर आणि परतफेड कालावधी
गट कर्ज व्याज परतावा योजनेचा परतफेड कालावधी पाच वर्षांपर्यंत असेल किंवा कर्ज कालावधी यापैकी जो कालावधी कमी असेल तो. गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरले, तर जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराने किंवा रुपये 15 लाख मर्यादित एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये महामंडळाच्या मार्फत जमा केली जाईल. इतर कोणतेही चार्जेस किंवा फी (उदाहरणार्थ लेट फी, दंड, व्याज प्रोसेसिंग फी,इन्शुरन्स, इत्यादी) महामंडळ करणार नाही.
10 लाखांपर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: Online अर्ज, कागदपत्रे, अनुदान
आवश्यक पात्रता
- अर्जदार इतर मागासवर्गीय असावा.
- महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
- गटातील अर्जदार लाभार्थीचे वय किमान 18 ते 45 वर्षे असावे.
- लाभार्थी गटातील सर्व लाभार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, नॉन-किम्रीलेअर करीता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखाच्या मर्यादेत (सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार ) असावे.
- गटातील अर्जदाराने या प्रकल्पासाठी यापूर्वी या व इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- गटाने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली ( PFMS ) या किंवा तत्सम ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
- ही योजना सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि योजनेची अंमलबजावणी सुरु केल्यानंतर स्थापन झालेल्या नवीन उद्योगांसाठी लागू असेल.
- गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
- गटांच्या भागीदारांचे किमान रुपये 500 कोटींच्या वर ठेवी असलेल्या आणि कोअर बँकिंग सिस्टिम असलेल्या शेड्युल्ड किंवा राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडिट स्कोर कमीत कमी 500 इतका असणे गरजेचे आहे.
Online अपलोड करावयाची कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र
- शिधा पत्रिकेची प्रमाणित प्रत
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसाय स्थळाची भाडेपावती
- करारनामा
- ७/१२ चा उतारा
- शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.
- तांत्रिक व्यवसायाकरीता आवश्यक असणारे परवाने / लायसन्स
- व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादींचे गोष्टींचे दरपत्रक
- महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार इतर कागदपत्रे.
मागासवर्गीयांसाठी 1 लाखापर्यंत थेट कर्ज योजना: अर्ज, पात्रता,कागदपत्रे, हप्ते, व्याजदर
अर्ज कुठे करावा?
गटातील अर्जदार लाभार्थीची महामंडळाच्या वेबपोर्टलवर www.msobcfdc.org ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य राहील.गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेब पोर्टल वरती अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेता येईल.
अर्ज प्रक्रिया काय?
अर्ज सादर केलेल्या प्रस्ताव अटी व शर्तीनुसार पात्र असलेल्या गटांना ऑनलाइन हेतू पत्र दिले जाईल. आणि या पात्र गटांना बँकेकडून त्यांच्या प्रकरणावर कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल. अधिक माहितीकरीता तुमच्या जिल्हयाच्या जिल्हा व्यवस्थापक यांचेशी संपर्क करावा.
- Agneepath Yojana in Marathi: Online Apply Date, Online Form, कागदपत्रे
- जमिनीची धूप म्हणजे काय: प्रकार , कारणे, उपाययोजना | Soil Erosion in Marathi
- कांदा लागवड संपूर्ण माहिती: रोग आणि कीड व्यवस्थापन, खत पाणी व्यवस्थापन
- १०० कोटी कृषी पंप ग्राहकांना वीज बिल सवलत योजना निधी वितरित
- 6 कोटी आदिम जमाती घरकुल योजना मंजूर GR PDF 2023