Online Apply प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2024: अर्ज कुठे, कागदपत्रे, पात्रता, लाभ

Thibak Tushar Sinchan Anudan Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण ठिबक सिंचन तुषार सिंचन अनुदान योजना: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना विषयीची संपूर्ण माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे, लाभ कोणत्या शेतकऱ्यांना घेता येतील, या योजनेसाठी पात्रता. तसेच या योजनेअंतर्गत शेतात शेतकऱ्याला जलसिंचनाच्या कोणत्या सुविधा मिळणार आहेत. ही सर्व माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना:ठिबक सिंचन तुषार सिंचन अनुदान योजना

पाण्याचा शेतीसाठी पुरेपुर वापर करता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सुक्ष्म सिंचन योजना राबवली आहे. जेणेकरून कमी पाण्यात देखील शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवता येईल. त्यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ही योजना राबवली आहे .

Tushar Sinchan Mahiti

तुषार सिंचन प्रणालीद्वारे पंप, स्प्रिंकलर आणि पाइपद्वारे पिकाला पाणी दिले जाऊन कमी पाण्यात चांगली शेती केली जाऊ शकते. या जलसिंचन प्रणालीचा वापर औद्योगिक आणि शेतीसाठी देखील केला जाऊ शकतो. जेव्हा पंपाच्या मदतीने पाणी दिले जाते. तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून पाणी बाहेर पडते आणि ते पिकावर लहान पावसासारखे शिंपडले जाते. या सिंचन प्रणालीद्वारे कमीत कमी पाण्यामध्ये देखील पिकाची वाढ चांगली होते. कारण या सूक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे थेट मुळापर्यंत पाणी पिकाला मिळते.

Kisan Credit Card Yojana In Marathi: KCC पीक कर्ज योजना माहिती

Thibak Sinchan Mahiti

ठिबक सिंचन प्रणाली मध्ये लहान नळीद्वारे झाडाच्या मुळाला थेंबाथेंबाने पाणी दिले जाते. ही पाणी देण्याची आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजेच ठिबक सिंचन. या आधुनिक सिंचन प्रणालीमुळे ज्या शेतकऱ्याकडे अतिशय कमी पाणी आहे. त्यांना अश्या आधुनिक सिंचन प्रणालीचा वापर करून कमी पाण्यात देखील चांगले उत्पादन घेता येणार आहे. यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. थेंबाथेंबाने पाणी दिल्यामुळे पाणी थेट मुळापर्यंत जाते आणि झाडांची पाण्याची गरज भागवली जाते. यामध्ये पाणी कसलेही वाया न जाता त्याचा पुरेपूर उपयोग केला जातो. ही गोष्ट लक्षात घेता, शासनाने शेतकऱ्यांसाठी हि अनुदान योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र हा ठिबक सिंचनात अग्रेसर आहे आणि 60 टक्के ठिबक सिंचन महाराष्ट्रामध्ये केले जाते.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा देशातील सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही जातीची अट असणार नाही. जर अर्जदार शेतकरी एससी एसटी जातीचा असेल, तर त्याला जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना तुषार किंवा ठिबक सिंचनावर 55 टक्के अनुदान मिळणार आहे. तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते.

7/12 Online Maharashtra: ऑनलाइन गाव नमुना नंबर, सातबारा व ८- अ पाहणे

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अर्जदार पात्रता

  • अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • त्याच्या शेतजमिनीचे सातबारा प्रमाणपत्र आणि आठ प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • जर अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असेल, तर त्याला जातीचा दाखला आवश्यक आहे.
  • जर शेतकऱ्याने 2016-17 च्या आधी या योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर पुढची 10 वर्ष त्याला त्या सर्वे नंबर साठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी विद्युत जोडणी असणे आवश्यक आहे.
  • वीज बिलाची ताजी पावती सादर करणे आवश्यक राहील.
  • 5 हेक्‍टर क्षेत्राच्या मर्यादेतच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

अर्ज कुठे करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वरती online पद्धतीने अर्ज सादर करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.

लाभ प्रक्रिया काय?

  • महाडीबीटी पोर्टल वरती फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला सुक्ष्म सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी पूर्व मंजुरी मिळेल.
  • या पूर्व मंजुरीनंतर तो शेतकरी अधिकृत विक्रेत्याकडून सुक्ष्म सिंचन प्रणाली विकत घेऊन विकत घेऊ शकतो.
  • विकत घेतलेल्या सिंचन प्रणालीच्या पावत्या 30 दिवसाच्या आत ऑनलाईन महाडीबीटी पोर्टल वरती अपलोड कराव्या लागतील.
  • अधिक माहितीसाठी आणि अर्ज दाखल करण्यासाठी अर्जदार पात्र शेतकऱ्याला महाडीबीटी पोर्टल ला भेट द्यावी लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top