Bij Bhandval Karj Yojana Mahiti: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी राबवण्यात येणाऱ्या २० टक्के बीज भांडवल कर्ज योजना ची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये कोणत्या बँकांमार्फत हे कर्ज दिले जाते , कर्जाची परतफेड कालावधी, अनुदान, आवश्यक पात्रता, कर्जाचे हप्ते आणि व्याजदर, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करावा या संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना
वीस टक्के बीज भांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि जिल्हा अग्रणी बँक यांच्या माध्यमातून राबवली जाणारी एक कर्ज योजना आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग हा 20 टक्के आहे. लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आणि बँकांचा सहभाग 75 टक्के आहे. या योजनेअंर्गत जास्तीत जास्त प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपये आहे. महामंडळ सहभागावर व्याज दर 6 टक्के आहे आणि परतफेडीचा कालावधी 5 वर्ष इतका आहे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रुपये एक लाख पर्यंत आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- उत्पन्नाचा दाखला सोबत सक्षम अधिकाऱ्याने तो प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे दिलेले प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
- जातीचे प्रमाणपत्र
- शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- आधार कार्ड
- व्यवसाय स्थळाची भाडेपावती
- सातबारा उतारा
- करारनामा
- शैक्षणिक किंवा जन्मतारखेचा जन्मतारखेचे प्रमाणपत्र
- आठ वर्ष सेवा शिल्लक असलेल्या दोन जामिनदारांची हमी पत्रे किंवा शेतीचे गहाणखत. त्याचप्रमाणे दोन्ही पर्यायातील जामिनदारांचे जमीनदार राहणार असल्याचे संमतीपत्र
- स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र
- व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र
- आवश्यक ते परवाने किंवा लायसन्स
- महामंडळाच्या संचालकांनी निर्देशीत केलेली इतर कागदपत्रे
- व्यवसाय प्रकल्पासाठीचा अहवाल, कच्चामाल आणि यंत्रसामग्री यांचे दर पत्रक.
10 लाखांपर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: Online अर्ज, कागदपत्रे, अनुदान
बीज भांडवल कर्ज योजना आवश्यक सूचना
अर्जदाराने अर्ज करतेवेळी अर्जासोबत मूळ प्रमाणपत्र जोडू नये, तर त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात. अर्जदाराने संबंधित जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क करावा.
बीज भांडवल कर्ज योजना अर्जदाराची आवश्यक पात्रता
- लाभार्थी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावा.
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असणे गरजेचे आहे.
- अर्जदार कोणत्याही वित्तीय संस्थेचा, बँकेचा किंवा महामंडळाचा थकबाकीदार असू नये.
- शहरी आणि ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराने जो व्यवसाय निवडला आहे, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान आणि अनुभव असणे गरजेचे आहे.
- कर्जाच्या इतर अटी आणि शर्ती महामंडळ ठरवतील त्याप्रमाणे लागू राहतील.
SBI Loan Information In Marathi | स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजना मराठी
अर्ज कुठे करावा?
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या ऑनलाईन वेब पोर्टल वरती www.msobcfdc.org ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून वरील कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा आणि या योजनेचा लाभ मिळवावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्हयांच्या जिल्हा व्यवस्थापक यांचेशी संपर्क करावा.
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सर्व GR 2023
- दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना 2023 मराठी माहिती
- फार्म मशिनरी बँक योजना 2023 महाराष्ट्र मराठी माहिती
- पीएम हेल्थ आयडी कार्ड 2023 मराठी संपूर्ण माहिती
- नाविन्यपूर्ण योजना GR 2023: गाई म्हशींचे गट वाटप 6000 लाख निधी मंजूर