वैयक्तिक कर्ज योजना: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या कर्जाचा उद्दिष्ट्य काय असणार आहे, कर्जाची परतफेड कालावधी, अनुदान, कर्ज कश्यासाठी घेऊ शकता,आवश्यक पात्रता, प्राधान्य, कर्जाचे हप्ते आणि व्याजदर तसेच आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करावा या संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना उद्दिष्ट्य
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील कुशल आणि गरजू व्यक्तींना आणि पारंपारिक उपक्रम सुरू करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा कर्ज योजना सुरु केली गेलेली आहे. तसेच लघुउद्योग व मध्यम उद्योग, व्यापार व विक्री, उत्पादन, सेवा क्षेत्र इत्यादी व्यवसाय करिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून दिला जातो. या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा अनुदान
बँकेमार्फत लाभार्थ्यांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत रुपये दहा लाख पर्यंत कर्ज वितरित केले जाते. कर्ज रकमेची हप्ते जर लाभार्थ्याने वेळेवर भरले. तर व्याजाची रक्कम बारा टक्केच्या मर्यादित व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थ्याच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये महामंडळामार्फत जमा करण्यात येते. अर्जदार लाभार्थ्याने सुरू केलेल्या उद्योगाचे किमान दोन फोटो अपलोड करणे गरजेचे आहे. या कर्जाची परतफेड कालावधी निकषांनुसार ठरवला जातो.
महिला कर्ज योजना २०२२ महाराष्ट्र संपूर्ण मार्गदर्शक
आवश्यक पात्रता
- कर्ज घेण्यासाठी अर्ज करणारा व्यक्ती इतर मागासवर्गीय असावा.
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे.
- अर्जदाराचे कर्जखाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने यापूर्वी महामंडळाचा किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला असू नये.
- अर्जदार कोणत्याही बँकेचा वित्तीय संस्थेचा किंवा महामंडळाचा थकबाकीदार असू नये.
- अर्जदाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेमध्ये केलेले असणे गरजेचे आहे.
- या योजनेअंतर्गत एकावेळी कर्जाचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस घेता येईल.
- कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये आठ लाख इतकी असणे गरजेचे आहे. ( नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र अनुसार)
- महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्देशीत केल्यानुसार कागदपत्रांच्या तपशीलामध्ये बदल होतील.
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना संपूर्ण माहिती: अर्ज, पात्रता, कागदपत्रे
वेब पोर्टलवर अपलोड करावयाची आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जन्मतारखेचा दाखला
- रहिवासी दाखला पुरावा
- आधार लिंक बँक खाते पासबुक
अर्ज कुठे करावा
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वेब पोर्टल वरती www.msobcfdc.org ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा आणि या योजनेचा लाभ मिळवावा. अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्हयांतील जिल्हा व्यवस्थापक यांचेशी संपर्क करावा.
- Election Commission Maharashtra Voter List ऑनलाइन तपासणी
- Mahadbt Farmer Scheme List | महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2023
- Tractor Loan Online Apply: ट्रॅक्टर कर्ज योजना रु. 2500000/- कर्ज करा अर्ज
- Pik Karj: प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान खात्यात जमा !! कोणते शेतकरी पात्र??
- 100% अनुदान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती