Pik Karj: प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान खात्यात जमा !! कोणते शेतकरी पात्र??

Pik Karj: जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करतात. अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. ही एक महत्त्वपूर्ण आलेली माहिती आहे. जी आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे मध्यंतरी शेतकऱ्यांनी आंदोलन चालवले होते. त्यांच्या काही मागण्या महाराष्ट्र सरकार कडून होत्या. या शेतकऱ्यांना स्वतः कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी भेट दिली होती आणि त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतला जाईल असे शब्द दिले होते. या शब्दावर ते आंदोलन मागे घेण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर ७ जून 2022 रोजी मंत्रालयामध्ये बैठक पार पाडण्यात आली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री श्री दादाजी भुसे त्याचप्रमाणे शेतकरी आंदोलनकर्ते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Kisan Credit Card Yojana In Marathi: KCC पीक कर्ज योजना माहिती

कधी सुरू होणार ही Pik Karj अनुदान वितरण प्रक्रिया

या बैठकीमध्ये शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागण्यांवर विचार करण्यात आला. राज्याचे कृषिमंत्री श्री दादाजी भुसे यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. यामध्ये राज्यातील नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रुपये 50 हजार एवढे अनुदान दिले जाईल जाणार आहे. हे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना येत्या 1 जुलै रोजी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात बाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल. किंवा त्याबद्दल अधिकृतरीत्या माहिती दिली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top