अपंग प्रमाणपत्र online: फॉर्म , स्मार्ट कार्ड, शासन निर्णय जीआर, अपंग प्रकार, नियम

अपंग प्रमाणपत्र online: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये दिव्यांग अपंग व्यक्तींना Online अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate Online Maharashtra) देण्याबाबत शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये अपंग प्रमाणपत्र पडताळणी, अपंग प्रमाणपत्र शासन निर्णय, अपंग स्मार्ट कार्ड, अपंग यादी, अपंग जीआर, अपंगत्व प्रमाणपत्र फॉर्म, अपंग वेबसाईट, अपंग प्रमाणपत्र तपासणी, अपंग प्रमाणपत्र नियम, अपंग प्रकार, अपंग प्रमाणपत्र online इत्यादी संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत.

अपंग प्रमाणपत्र online

दिव्यांग व्यक्तींना UDID संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन अपंग प्रमाणपत्र आणि अपंग कार्ड देण्याबाबत जिल्हा शासनामार्फत विशेष मोहीम राबवण्यात संबंधित चा शासन निर्णयदिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात आला.

अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र 2022 संपूर्ण माहिती: फॉर्म PDF, कागदपत्रे

अपंग प्रकार

केंद्र शासनाने 28-12-2016 रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 संमत केला असून या कायद्यातील तरतुदीनुसार एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगांच्या प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे ते खालीलप्रमाणे

  • दृष्टिदोष अंधत्व
  • कर्णबधिरता
  • शारीरिक दिव्यांगता
  • मानसिक आजार
  • बौद्धिक दिव्यांगता (intellectual disability)
  • बहु दिव्यांगता multiple disability
  • शारीरिक वाढ खुंटणे (डार्फिझम)
  • स्वमगनता (ऑटिझम)
  • मेंदूचा पक्षाघात (सेरेब्रल पाल्सी)
  • स्नायूंची विकृती
  • मज्जासंस्थेचे जुने आजार
  • विशेष अध्ययन अक्षमता
  • मल्टिपल स्क्लेरॉसीस
  • वाचा व भाषा दोष (स्पीच अँड लांग्वेज डिसॅबिलिटी)
  • थॅलेसेमिया
  • हिमोफिलिया
  • सिकल सेल डिसीज
  • ऍसिड अटॅक व्हिक्टम
  • पार्किनसन्स डिसीज
  • दृष्टीक्षीणता (लो-व्हिजन )
  • कुष्ठरोग (लेप्रसी क्युअर्ड पर्सन्स )

अपंग कर्ज योजना 2022: अर्ज, लाभ, संपर्क कार्यालय संपूर्ण माहिती

Online अपंग प्रमाणपत्र पडताळणी

UDID या संगणक प्रणालीद्वारे अपंगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याकरिता मान्यता दिलेली असून त्यानुसार खालील आरोग्य यंत्रणा कडून दिव्यांग व्यक्तींना अपंगाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र म्हणजेच अपंग कार्ड देण्यात येत आहेत.

  • शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांची जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय
  • शासकीय \ महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय
  • महानगरपालिका रुग्णालय
  • केंद्र शासनाच्या दिव्यांग संस्था अलीयावरजंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंत ऑफ हिअरिंग डिसॅबिलिटीज बांद्रा
  • ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर फिजीकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन हाजीअली मुंबई बंदार वाला लेप्रोसी हॉस्पिटल पुणे
  • आर्मड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे

Online अपंग प्रमाणपत्र आणि अपंग कार्ड ची गरज काय?

  • दिव्यांग व्यक्ती किंवा दिव्यांग व्यक्तीचे पालक व दिव्यांग व्यक्तींच्या संघटना यांच्याकडून UDID संगणक प्रणाली मार्फत अपंगांचे प्रमाणपत्र आणि अपंग कार्ड वेळेवर मिळत नाही.
  • काही दिव्यांग तत्वाच्या प्रकाराबाबत तज्ञ व्यक्ती आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध होत नाहीत. दिव्यांग व्यक्तींना वारंवार योग्य यंत्रणेकडे दिव्यांग व प्रमाणपत्र आणि ओळखपत्र यासाठी हेलपाटे मारावे लागतात.
  • प्रमाणपत्र आणि कार्ड ठरवून दिलेल्या दिवशी मिळत नाही तसेच कुरियर द्वारा देखील ओळख पत्र आणि प्रमाणपत्र यांचे वाटप व्यवस्थित होत नाही.

अशा प्रकारच्या व इतर काही तक्रारी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. तसेच शासनाने देखील घेतलेल्या युडीआयडी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आढाव यामध्ये राज्याने अधिक प्रगती करणेबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तालयात कळविले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या प्रभावी अंमलबजावणी करिता समितीने जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र आणि दिव्यांग कार्ड निर्गमित करण्याची संबंधित असलेल्या सर्व आरोग्य यंत्रणा समाजकल्याण विभाग शिक्षण विभाग यांचा आढावा घेऊन समन्वय साधून जिल्ह्यातील युडीआयडी सक्षमीकरण करून दिव्यांग व्यक्तींना विहित मुदतीत दिव्यांग प्रमाणपत्र आणि अपंग कार्ड देण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करुन विशेष मोहीम राबवून होण्याच्या दृष्टीने दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

अपंग प्रमाणपत्र UDID CARD काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

दिव्यांग व्यक्तीस दिव्यांगत्व प्रमाणपत्र UDID कार्ड (disability certificate) मिळविण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

ओळखीचा पुरावा (कोणताही एक) :-

  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • शाळा/ कॉलेजचे ओळखपत्र
  • पासपोर्ट
  • पॅनकार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणत्याही एकाची प्रत

निवासाबाबत पुरावा (कोणताही एक) :-

  • लाईट बिल
  • मिळकत कर पावती
  • ७/१२ किंवा ८अ उतारा
  • अधिवास प्रमाणपत्र
  • फोन बिल
  • पाणीपट्टी
  • घरपट्टी
  • ग्रामपंचायत
  • नगरपालिका
  • महानगरपालिका
  • छावणी मंडळाने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र
  • निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यासाठी संस्थेने दिलेली रहिवासी प्रमाणपत्र
  • रेशनकार्ड यापैकी कोणत्याही एकाची प्रत

अर्जासोबत पासपोर्ट आकाराची २ फोटो

नजीकच्या कालावधीतील काढलेले फोटो असावे. दिव्यांगत्व दर्शविणारे पुर्ण फोटो सादर करु नये.

प्रधानमंत्री पेन्शन योजना मराठी माहिती: सर्व प्रधानमंत्री पेन्शन योजनांची माहिती

अपंग प्रमाणपत्र (कार्ड) ऑनलाईन नोंदणी कुठे करावी | Disability Certificate Online Registration

वैश्विक दिव्यांग ओळख पत्र (Unique Disability ID card) किंवा स्वावलंबन कार्ड (swavlambancard) साठी www.swavlambancard.gov.in या संकेत स्थळावरून ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. हे UDID CARD भारत सरकारच्या www.swavlambancard.gov.in या संगणक प्रणालीद्वारे दिले जात आहे.

अपंग वेबसाईट

www.swavlambancard.gov.in

अपंग प्रमाणपत्र शासन निर्णय दिनांक 2 डिसेंबर 2021

जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या प्रभावी अंमलबजावणी करिता दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र आणि ओळखपत्र युडीआयडी संकल्प संगणकीय प्रणालीद्वारे विहित वेळेत मिळण्याच्या दृष्टीने विशेष मोहिमेचे आयोजन केलेले आहे. याकरिता प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण विभाग समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर/उपनगर यांनी याचे कामकाज केले जाईल.
या शासन निर्णयाच्या अधिक माहितीसाठी खालील जीआर पहा

Online अपंग प्रमाणपत्र शासन निर्णय जीआर –

https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202112021659515822.pdf

अपंग प्रमाणपत्र

महाराष्ट्र राज्यात SADM (software assessment of disability Maharashtra) या संगणक प्रणालीत 12 अपंगत्व प्रमाणपत्र सन 2012 पासून वितरित करण्यात येत आहेत. दिव्यांग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा पुरावा असून अन्य पुरावा सोबत ओळखपत्र सादर करणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. केंद्र शासनाच्या दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून दिव्यांग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र मिळणे सोपे व्हावे. याकरिता दिव्यांग व्यक्तींना अर्जासोबत जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे पुरावा सादर करावयाचा बाबींमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने दिनांक 6 ऑगस्ट 2018 रोजी शासनाने खालील शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

मागासवर्गीयांसाठी 1 लाखापर्यंत थेट कर्ज योजना: अर्ज, पात्रता,कागदपत्रे, हप्ते, व्याजदर

अपंग प्रमाणपत्र शासन निर्णय दिनांक 6 ऑगस्ट 2018

दिव्यांग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/बँक पासबुक/पॅन कार्ड/पारपत्र टेलिफोन किंवा विद्युत देय/ ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका आणि मंडळाने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र किंवा निवासी अपंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र. तसेच आधार ओळख पत्राची सत्यप्रत सादर करणे बंधनकारक आहे.

तथापि केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन, दिव्यांग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे. याकरिता दिव्यांग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून अन्य पुराव्या सोबत आधार ओळखपत्र सादर करण्याची अट बंधनकारक करण्याची या आदेशानुसार वगळण्यात आलेली आहे.

या शासन निर्णयाची सत्यप्रत अदा जाण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खालील जीआर पहा या बटणावर क्लिक करा आणि तू सविस्तरपणे पहा

अपंग प्रमाणपत्र शासन निर्णय GR पहा –

https://www.maharashtra.gov.in/site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201808061150304117.pdf

2 thoughts on “अपंग प्रमाणपत्र online: फॉर्म , स्मार्ट कार्ड, शासन निर्णय जीआर, अपंग प्रकार, नियम”

  1. अपंग आहे मोठे साहेब मला करंगळी नाही मला काम करता यत नाही आनी माझा करंगळी लेटचा बोटाच ओपरेशन होयल आहे तुम्ही याची नोंद घ्यावी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top