SBI Loan Information In Marathi | स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजना मराठी

SBI Home Loan in Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज (SBI Loan) योजनेविषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आपण एसबीआय बँकेकडून तुम्हाला कोणते लोन मिळू शकते, कोणकोणत्या कारणासाठी लोन मिळू शकते, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, एसबीआय लोन व्याजदर किती टक्के आहे, आवश्यक पात्रता काय, अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक अशा प्रकारची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

SBI Bank Loan Information in Marathi

SBI Home Loan in Marathi

स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना विविध सेवा प्रदान करते आणि वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. काही वेळा कर्ज पास होत नाही, कारण कर्ज देण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक घटक वापरले जातात. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल आणि तुम्ही कर्जासाठी अर्ज केलेला असेल तर बँका कोणत्या आधारावर कर्ज देतात हे तुम्हाला माहित असायला हवे. जर तुमचे कर्ज मंजूर होत नसेल तर काय करावे. तसेच स्टेट बँकेतून कर्ज घेण्याची प्रक्रिया काय आहे हे आपण आज या लेखामध्ये जाणून घेऊ.

एसबीआय कोणकोणत्या कारणासाठी कर्ज देते?

देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच SBI बँक ऑफ इंडिया लोकांना त्यांच्या आवश्यक परिस्थितीनुसार कर्ज देते. त्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

  • प्रवास व्यवसाय सुरू करणे
  • वैद्यकीय उपचार
  • लग्न करणे
  • अभ्यासासाठी
  • घर खरेदी करण्यासाठी इत्यादी कारणासाठी एसबीआय बँकेकडून तुम्ही कर्ज घेऊ शकता

SBI कर्ज योजना साठी लागणारी कागदपत्रे –

  • कर्ज साठीच स्वाक्षरी केलेला अर्ज
  • ओळख पुरावा- पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स इ.
  • प्रक्रिया शुल्क
  • 6 महिन्यांचे बँक पासबुक स्टेटमेंट किंवा तुमच्या शेवटच्या 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • पगारदार व्यक्तींसाठी नवीनतम वेतन स्लिप
  • स्वयंरोजगार व्यक्तींसाठी नवीनतम बँक स्टेटमेंट
  • फॉर्म 16 नवीनतम ITR

महिला कर्ज योजना २०२२ महाराष्ट्र संपूर्ण मार्गदर्शक

स्टेट बँक ऑफ इंडिया SBI कर्ज योजना व्याज दर

SBI चे व्याज दर, प्रत्येक लोन साठी वेगळे असू शकतात, जसे कि –

  • पर्सनल लोन साठी – 9.60% टक्के
  • बिझनेस लोन साठी – 11.20% – 16.30%
  • होम लोन साठी – 6.80% ते 7.50%

संपूर्ण माहिती साठी तुम्ही तुमच्या जवळच्या SBI बँक शाखेला भेट देऊ शकता आणि पूर्ण माहिती घेऊ शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया SBI कर्ज योजना पात्रता

  • ज्यांचे SBI मध्ये वेतन खाते असेल.
  • किमान मासिक उत्पन्न 15,000 रुपये पाहिजे.
  • केंद्र / राज्य सरकार / सेमी सरकार, केंद्रीय PSUs, नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी देखील यासाठी पात्र आहेत.

SBI बिझनेस लोन योजना

SBI मधून किती बिझनेस लोनची रक्कम तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि EMI परतफेडीच्या आधारे दिली जाईल.

SBI बिझनेस लोनचे फायदे कोणते?

  • कमी व्याज दर
  • कमी प्रक्रिया शुल्क
  • हिडन चार्जेस नाही
  • प्रशासकीय शुल्क नाही
  • दीर्घ परतफेड कालावधी 48 महिन्यांपर्यंत
  • सुरक्षा आवश्यक नाही

10 लाखांपर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: Online अर्ज, कागदपत्रे, अनुदान

एसबीआय बिझनेस लोन मिळवण्याची पात्रता –

  • कोणताही पगारदार व्यक्ती
  • अभियंता
  • डॉक्टर
  • आर्किटेक्ट
  • चार्टर्ड अकाउंटंट किंवा 2 वर्षांचा एमबीए धारक व्यवसाय कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकतो.

SBI बिझनेस लोनसाठी आवश्यक कागदपत्रे –

  • पासपोर्ट आकार फोटो
  • आयडी पुरावा
  • पत्ता पुरावा
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड

SBI घर कर्ज योजना फायदे (SBI Home Loan Scheme)

  • SBI सध्या देशातील सर्वात स्वस्त गृह कर्ज (Home Loan) देत आहे.
  • गृह कर्जाचा व्याजदर 6.70 टक्क्यांपासून सुरू होतो.
  • एसबीआय गृह कर्जावरील व्याज दर कमी आहे. तसेच इतर बँकांच्या तुलनेत प्रक्रिया शुल्क कमी आहे.
  • प्री-पेमेंटसाठी कोणताही दंड नाही.
  • कर्जदार 30 वर्षात कर्जाची परतफेड करू शकतो, यामुळे EMI कमी होतो.
  • व्याजावर महिलांना अतिरिक्त लाभ मिळतो.
  • या सर्व कारणांमुळे SBI होम लोन सर्वात उत्तम मानले जाते.

अपंग कर्ज योजना 2022: अर्ज, लाभ, संपर्क कार्यालय संपूर्ण माहिती

SBI बँकेकडून त्वरित कर्ज कसे मिळवू शकतो?

SBI मधून मिस्ड कॉल देऊन लगेच कर्ज घेऊ शकतात. SBI ने त्वरित वैयक्तिक कर्ज मंजुरीसाठी सेवा सुरू केलेली आहे. त्याचे नाव एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोन सुविधा आहे.ज्या ग्राहकांचे SBI मध्ये वेतन खाते आहे आणि किमान मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, ते यासाठी अर्ज करू शकतात.

SBI पर्सनल लोन त्वरित कसे मिळवावे?

एसबीआय ने ट्विटर द्वारे दिलेल्या माहितीनुसार आत्ता फक्त एका एसएमएसद्वारे तुमची वैयक्तिक कर्ज (Personal Loan) प्रक्रिया सुरू करा. यासाठी 7208933145 वर लिहून पाठवा. बँक तुमच्याशी संपर्क साधेल. एसबीआयच्या एक्स्प्रेस पर्सनल लोन सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मिस्ड कॉल किंवा संदेश पाठवावा लागेल.

अश्या प्रकारे तुम्ही SBI बँकेकडून पर्सनल लोन, होम लोन, बिझनेस लोन, इन्स्टंट लोन घेऊ शकतात. SBI Home Loan in Marathi तुम्हाला या लेखाद्वारे दिली गेलेली स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजना बद्दल सर्व माहिती समजली असेल, जर अद्याप काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या SBI बँक शाखेला भेट देऊ शकता आणि तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top