Mahila Bachat Gat Karj Yojana: नमस्कार मित्रांनो आज आपण महिला बचत गट कर्ज योजना 2022 (Mahila Bachat Gat Loan in Marathi) बाबत या लेखांमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये महिला बचत गट कर्ज योजना कोणती, त्याची पात्रता काय, आवश्यक कागदपत्रे (bachat gat loan documents) फायदे कोणते, कर्ज किती मिळणार, व्याजदर किती, परतफेड कालावधी किती, अर्ज कसा करावा अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखात तुम्हाला मिळतील. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.
Table of Contents
महिला समृद्धी कर्ज योजना २०२२
कर्ज योजनेअंतर्गत महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ही योजना महिला व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणजेच समाज कल्याण विभागामार्फत महिलांसाठी राबवली जाते. महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांच्या व्यवसायाला चालना दिली देऊन त्यांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवले जाते. महिला व्यावसायिक तसेच समाजातील उपेक्षित घटक घटकांमधील महिला जसे की, मागासवर्गीय महिला यांना आर्थिक मदत दिली जाते. महिलांना बचत गट च्या स्वरूपात व्यवसाय कर्ज देखील दिले जाते.
महिला समृद्धी कर्ज योजनेचे उद्दिष्ट काय?
MSY कर्ज राज्यातील मागासवर्गीय महिलांना त्यांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय मार्फत दिले जाते. भारतातील शेकडो महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरलेली आहे. महिलांच्यायोजना म्हणजे मोठा प्रतिसाद आहे
महिला बचत गट कर्ज योजनेचा व्याजदर किती आहे?
योजनेअंतर्गत लागू केलेल्या खर्चापैकी ९५ टक्के कर्ज दिले जाईल आणि शिल्लक ५ टक्के कर्ज राज्य वाहिनी एजन्सी (एससीए) किंवा स्वतः लाभार्थी देणार आहेत. असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेले आहे. कर्ज दिल्याच्या तारखेपासून घेतलेल्या कर्जाचा उपयोग चार महिन्याच्या कालावधीत लाभार्थी महिलेने करावा.
महिला समृद्धी कर्ज योजना पात्रता
- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला लाभार्थ्याचे वय कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त ५० वर्षापर्यंत असावे.
- लाभार्थी अर्जदार महिला बीपीएल श्रेणीतील असणे गरजेचे आहे.
- अर्जदार वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी ९८,०००/- पर्यंत असावे, तर शहरी भागासाठी १,२०,०००/- पर्यंत असावे.
- अर्जदार महिलेचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये.
- बचत गट कर्जाचा मागासवर्गीय समाजातील महिला उद्योजक लाभ घेऊ शकतात.
- अर्जदार महिला मागासवर्गीय जाती मधील किंवा अनुसूचित जातीतील असणे आवश्यक आहे.
महिला समृद्धी कर्ज योजना योजनेसाठी अर्ज कसा करावा?
इच्छुक आणि पात्र महिलांनी महिला समृद्धी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून हा कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयांमध्ये सादर करावा.
महिला बचत गट कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्ज
- जात प्रमाणपत्र
- बँक खाती
- उत्पन्न प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवासी पुरावा (वीज बिल किंवा रेशन कार्ड)
- ओळख पुरावा – मतदार ओळखपत्र
- सेल्फ-ग्रुप मेंबरशिप आयडी कार्ड
महिला कर्ज योजना 2022 महाराष्ट्र संपूर्ण मार्गदर्शक
महिला समृध्दी कर्ज योजना (एमएसवाय) योजनेचे स्वरुप
- व्याज दर ४%
- परतफेडीचा कालावधी ३ वर्षे
- बचत गटांमार्फत राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज देऊन आर्थिक मदत
- प्रकल्प मर्यादा रु.५ लाखापर्यंत आहे. त्यामध्ये बचत गटातील २० सभासदांना प्रत्येकी रु.२५,०००/-
- राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग – ९५%
- राज्य महामंडळाचा सहभाग – ५%
- लाभार्थीचा सहभाग निरंक
एमएसवाय वैशिष्ट्ये आणि फायदे
- महिलांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन मिळते.
- महिलांना सशक्त आणि स्वावलंबी बनण्यास मदत होते.
- कमीत कमी कागदपात्रांमध्ये लवकर कर्ज
- महिलांचा आत्मविश्वास वाढतो.
- लाभार्थीची सामाजिक-आर्थिक स्थिती बदलते.
- रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात मदत करते.
महिला समृद्धी कर्ज योजने विषयी अधिक माहिती
महिला कर्ज योजनेचे वितरण
लाभार्थी महिलांना राज्य चॅनेलिझिंग एजन्सी (एससीए), प्रादेशिक ग्रामीण बँका आणि राष्ट्रीय बँकांद्वारे कर्ज वितरित केले जाईल केले जाते.
बचत गट स्वयंसहायता गट
ज्या महिलांच्या बचत आणि योगदान देऊन एक गट तयार करतात. अशा बचत गटांना महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेता येईल.
चॅनल पार्टनर
हे चॅनल पार्टनर एक शेत्रातील सक्षम व्यवसायिकांना परिभाषित केले आहे. हे ग्रुप आणि त्यांच्या सदस्यांना आर्थिक कार्यात तसेच एमएसवाय कर्ज घेण्यासाठी मदत करतील.
रेशन सदस्य
नियम आणि कायद्यानुसार जास्तीत जास्त महिला सदस्य गटास अनुमती आहे. त्यामध्ये ७५ टक्के महिला सदस्य मागासवर्गीय जे पात्रता अटी मध्ये समाविष्ट असतील आणि उर्वरित २५ टक्के इतर दुर्बल महिला असणे आवश्यक आहे. किंवा अनुसूचित जाती अपंग महिलांना या कर्ज योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेता येईल.
- महा-एग्रीटेक प्रकल्प: 30 कोटी 38 लाख किमतीसह 2022-23 ते 2024-25 मुदतवाढ
- कुसुम सोलार पंप योजना पेमेंट भरण्यासाठी मुदत वाढली !! ही आहे शेवटची तारीख
- सोयाबीन लागवड तंत्रज्ञान: जाती, वाण, खत, औषधे, फवारणी वेळापत्रक संपूर्ण माहिती
- अर्ज सुरू प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र 2024: Online Form, कागदपत्रे
- 40 लाख व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी PMEGP प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम