विधवा पेंशन योजना महाराष्ट्र: कागदपत्रे, Application Form, अर्ज, पात्रता

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये महाराष्ट्र विधवा पेंशन योजना योजने संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये विधवा पेन्शन योजनेची पात्रता काय, विधवा पेन्शन योजनेचे फायदे कोणते, विधवा पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय, इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखांमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

पेंशन योजना महाराष्ट्र2023

महाराष्ट्र विधवा पेंशन योजना जानेवारी २०२० पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील गरीब कुटुंबामधील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ६००/- रुपये दिले जाणार आहेत. जर त्या विधवा महिलेला मुले असतील, तर त्यांना ९००/- रुपये पेन्शन म्ह्णून दिले जातील. या योजनेअंतर्गत १८ वर्षावरील विधवा महिला आणि विधवा मुली यांना ही विधवा पेन्शन दिली जाणार आहे. विधवा महिलांसाठी ६५ वर्षापर्यंतची वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. ही पेन्शनची रक्कम प्रत्येक महिन्याला त्या महिलेच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. ज्याचा गरीब कुटुंबातील महिलेला आर्थिक मदत होऊ शकेल आणि त्यांचे जीवनमान उंचावू शकेल.

विधवा पेन्शन योजनेचे उद्दिष्ट

पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोला आणि मुलांना दुसरा कोणताच आधार नसतो आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होते. यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे तिला एकटीला ते शक्य होत नाही. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने विधवा पेंशन योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत कोणताही आधार नसलेल्या राज्यातील गरीब निर्धन विधवा महिलांना आर्थिक मदत म्हणून दरमहा ६००/- रुपये पेन्शनची रक्कम दिली जाते. जेणेकरून त्या विधवा महिलेच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील आणि या माध्यमातून ती स्वावलंबी बनेल.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना |Old Pension Scheme Maharashtra

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचे फायदे कोणते?

एखाद्या गरीब कुटुंबातील स्त्रीला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर दुसरा कोणताही आधार नसतो. ज्यामुळे ती बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगत असते. त्याचे फायदे खालीलप्रमाणे असतील.

  • विधवा महिलांना या योजनेअंतर्गत प्रतिमहा ६००/- रुपये पेन्शन देणार आहे.
  • जर त्या विधवा महिलेला मुले असतील, तर तिला दरमहा ९००/- रुपये पेन्शन दिली जाईल. जेणेकरून ती आपल्या मुलांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकेल.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वार्षिक कुटुंब उत्पन्न २१,०००/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शन ही तिच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
  • महाराष्ट्र सरकारने विधवा पेन्शन योजनेसाठी २३ लाखांचा अर्थसंकल्प तयार केलेला आहे.
  • गरीब विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

महिला किसान योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती

पेन्शन योजनेसाठी आवश्यक पात्रता

  • ती विधवा महिला मूळ महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. .
  • जर त्या विधवा अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न २१,०००/- रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ती या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाही.
  • दारिद्र्य रेषेखालील सर्व विधवा महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्ज करणाऱ्या विधवा महिलेचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार महिलेकडे स्वतःचे बँक खाते असणे अनिवार्य आहे कारण ही रक्कम तिच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.

विधवा पेंशन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • महिलेकडे आधार कार्ड किंवा कोणतेही इतर ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  • विधवा महिलेच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • महिलेचे बँक खाते आणि पासबुक
  • महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • जर अर्जदार महिला अनुसूचित जाती मागासवर्गीय असेल, तर जात प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाईल नंबर

विधवा पेंशन योजना अर्ज कसा करावा?

  • पेंशन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला दिलेला अर्ज पीडीएफ तेथून मिळवावा लागेल.
  • यानंतर त्या फॉर्म ची प्रिंट काढून घ्यावी लागेल.
  • त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल.
  • आवश्यक ती वरील सर्व कागदपत्रे त्या फॉर्मसोबत जोडावे लागतील.
  • नंतर तुम्हाला तुमचा हा फॉर्म तुमच्या जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयामध्ये जमा करावा.
  • त्यानंतर अर्ज आणि कागदत्रांच्या पडताळणीनंतर विधवा महिलेच्या बँक खात्यामध्ये पेन्शन येणे सुरू होईल.

महिला कर्ज योजना महाराष्ट्र संपूर्ण मार्गदर्शक

महाराष्ट्र विधवा पेंशन योजना कधी सुरू झाली?

महाराष्ट्र सरकारने विधवा पेंशन योजना जानेवारी २०२० मध्ये सुरू केलेली आहे.

विधवा पेंशन योजना अंतर्गत किती वर्षापर्यंत लाभ मिळू शकतो?

या योजनेअंतर्गत विधवा महिलांना १८ ते ६५ वयोगटातील विधवा महिलांना पेन्शनची रक्कम दिली जाते. यामध्ये दरमहा त्यांना ६००/- ते ९००/- रुपये पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित केली जाते.

विधवा पेन्शन योजनेसाठी कोणत्या महिला अर्ज करु शकतात?

दारिद्र रेषेखालील विधवा महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा महिला या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहेत.

विधवा पेंशन योजना म्हणजे काय?

ही एक विधवा महिलांसाठी महाराष्ट्र सरकार मार्फत राबविली जाणारी योजना आहे. ज्यामध्ये विधवा महिलांना पेन्शन देऊन सशक्त आणि स्वावलंबी बनण्यासाठी तिची आर्थिक मदत केली जाते. जेणेकरून ती तिचे आयुष्य चांगल्या प्रकारे घालवू शकेल. पतीच्या मृत्यूनंतर देखील तिच्या लहान मुलांची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top