Mahila Loan Scheme : नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी देण्यात येणाऱ्या कर्ज योजनांची माहिती पाहणार आहोत. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आजकाल काम करत आहेत. महिलांच्या स्वावलंबी आणि त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी भारत सरकार महिलांसाठी विविध योजना नेहमीच सुरू करत असते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट असते. यामध्ये महिलांना विविध गोष्टींकरिता विविध घटकांकरिता कर्ज देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जाते.
या कर्जा मध्ये व्यवसाय कर्ज, गृहकर्ज, विवाह कर्ज, इत्यादी प्रकारची कर्ज योजना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये सरकारने सुरू केलेले काही प्रमुख क्षेत्रे आहेत. त्यामध्ये आपण आज महिलांसाठी दिल्या जाणाऱ्या व्यवसाय कर्ज योजनांची सविस्तरपणे माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत. या माहितीमध्ये महिलांना कोणकोणत्या योजना अंतर्गत कर्ज दिले जाते तसेच त्या कर्जाची रक्कम किती असणार आहे या गोष्टीची माहिती आज तुम्हाला या लेखात मिळणार आहे.
Table of Contents
महिला व्यवसाय कर्ज योजना महाराष्ट्र
महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करून सक्षम बनवण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये मुद्रा योजना, महिला उद्योग निधी योजना, स्त्री शक्ती पॅकेज, देना शक्ती योजना, भारतीय महिला बिजनेस बँक कर्ज, सेंट कल्याणी योजना, उद्योगिनी योजना अशा काही योजना राबवून महिलांना व्यवसाय कर्ज दिले जाते. केंद्र आणि राज्य सरकारने महिलांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून या योजना राबविल्या आहेत.
मुद्रा Loan योजना
मुद्रा योजना टेलरिंग, ब्युटी पार्लर, ट्युशन इत्यादींसारख्या लहान उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी कर्ज देते. मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना ५० हजार ते १० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. यामध्ये तीन योजना येतात त्या खालील प्रमाणे –
- स्टार्टअप शिशु योजना – याअंतर्गत व्यवसाय स्टार्टअप साठी महिलांना ५० हजारापर्यंत चे कर्ज दिले जाते.
- सुस्थापित उद्योगांसाठी किशोर योजना – या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायाकरिता ५० हजार ते ५ लाख यादरम्यान कर्ज दिले जाते.
- व्यवसाय विस्तार तरुण योजना – याअंतर्गत महिलांना व्यवसायाकरिता ५ लाख ते १० लाख रुपयांच्या दरम्यान कर्ज दिले जाते.
महिला उद्यम निधी योजना
महिला उद्याम निधी योजना स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया द्वारा ऑफर केली गेलेली योजना आहे. या योजने अंतर्गत महिलांना व्यवसायाकरता आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये कोणत्याही नवीन लघु स्टार्टअप साठी महिला उद्योग निधी योजनेअंतर्गत दहा लाख रुपये हे चालू असलेल्या प्रकल्पांच्या सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. कर्ज परतफेडीची वेळ मर्यादा दहा वर्षांची आहे.
स्त्री शक्ती पॅकेज
स्त्री शक्ती पॅकेज योजना केंद्र सरकारकडून आयबीएस बँकेच्या मदतीने सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत देशातील सर्व महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास आर्थिक सहाय्य केले जाते स्त्री शक्ती पॅकेज अंतर्गत बँकांकडून बँकेकडून कमी व्याजदरात सहज कर्जाची सोय करून महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट पार पाडले जाते या योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया या योजनेचा लाभ स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे दिला जातो या योजनेसाठी अर्ज तुम्ही स्टेट बँकेकडून ऑफलाइन पद्धतीने करू शकता
देना शक्ती योजना
देना शक्ती योजना ही देना बँकेची महिलांसाठी कर्ज योजना आहे. जी महिलांसाठी आर्थिक दृष्ट्या प्रोत्साहन करून महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने राबवली जाते. या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना व्याजदरात २५ टक्के सवलत दिली जाते. तसेच कर्जाच्या परतफेडीचा कालावधी दहा वर्षापर्यंत असू शकतो. कृषी संबंधित क्षेत्रात कार्य करत असलेल्या शेती व्यवसायासाठी मायक्रो क्रेडिट आणि रिटेल स्टोअर्स देना शक्ती योजनेसाठी पात्र आहेत.
या योजने अंतर्गत महिला शेती, लघु उद्योग, मायक्रो क्रेडिट, किरकोळ व्यापार, गृहनिर्माण, शिक्षण, सुक्ष्म लघु उपक्रम इत्यादी व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात.
भारतीय महिला व्यवसाय बँक कर्ज
भारतीय महिला व्यवसाय बँक कर्ज हे महिला उद्योजकांसाठी दिली जाणारी आर्थिक मदत कर्ज योजना आहे. ज्यांना किरकोळ नवीन उपक्रम सुरू करायचा आहे, अशा महिला उद्योजकांना १ लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते. रकमेवरील व्याज दर सामान्य १०.१५ किंवा त्याहून अधिक असतो.
या योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यास कर्जाची सात वर्षाच्या आत परतफेड करावी लागते. ही योजना बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत १ कोटी पर्यंतचे कर्ज कोणत्याही तारणा शिवाय घेतले जाऊ शकते आणि महिला त्या रकमेवर स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनू शकतात.
सेंट कल्याणी कर्ज योजना
सेंट कल्याणी कर्ज योजना ही महिला उद्योजकांसाठी शाश्वत रोजगाराची संधी निर्माण करून देण्यासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत व्यवसायाकरिता १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला पात्र असतील. सेंट कल्याणी कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रुपये १०० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जाची परतफेड सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीत कालावधीत सह कमाल ७ वर्ष केली जाऊ शकते.
उद्योगिनी योजना
उद्योगिनी योजनेअंतर्गत समाजातील सर्व घटकातील महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाते. ज्याच्या मदतीने महिला स्वतःचा लघु उद्योग सुरू करू शकतील. उद्योगिनी योजनेअंतर्गत अर्जदाराला सर्वाधिक दिलेली रक्कम ही ३ लाख रुपये असू शकते. इच्छुक महिला उद्योजक अर्जदाराचे वय २५ ते ६५ वर्ष यांदरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदार महिलेचे कौटुंबिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
या योजनेमध्ये अपंग, विधवा यासारख्या विशेष श्रेणी मध्ये येणाऱ्या महिलांसाठी उत्पन्नाची कमाल मर्यादा लागू असणार नाही. उद्योगिनी योजनेंतर्गत महिलांना कमीत कमी व्याजदरात कमाल 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या योजनेअंर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (SC-ST) आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जाते.