Old Pension Scheme Maharashtra in Marathi: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना 2022 (Old Pension Scheme Maharashtra) संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय अटी काय आहेत, आवश्यक पात्रता काय, पेन्शन किती मिळेल, योजनेसाठी अर्ज कुठे करावा, अधिक माहितीसाठी संपर्क कुठे करावा या सर्व प्रश्नांची उत्तरेआणि माहिती या लेखामध्ये तुम्हाला आज मिळणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
Old Pension Scheme Maharashtra 2022
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना ही एक केंद्र पुरस्कृत राबवली जाणारी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन (समाज कल्याण विभाग) अंतर्गत राबवली जाते. या योजना राज्यातील वृद्धपकाळातील लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी राबवली जात आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना चे उद्दिष्ट काय?
या केंद्रपुरस्कृत योजनेचे उद्दिष्ट म्हणजे राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा पेन्शन उपलब्ध करून देणे. त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवणे हे आहे. या योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील लोकांना होणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्राची सर्व नागरिक पेन्शन मिळण्यासाठी पात्र असतील.
महाराष्ट्र विधवा पेंशन योजना: कागदपत्रे, एप्लीकेशन फॉर्म, अर्ज, पात्रता
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना 2022 च्या प्रमुख अटी
- दारिद्र रेषेखालील 65 वर्षावरील सर्व नागरिक या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
- या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रुपये 200/- प्रतिमहा प्रति लाभार्थी पेन्शन देण्यात येते.
- तसेच याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून रुपये 400/- प्रतिमहा निवृत्ती वेतन मिळते.
- यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये 400/- प्रतिमहा आणि केंद्र शासनाकडून रुपये 200/- प्रति महा असे मिळून एकूण रुपये 600/- प्रति लाभार्थी पेन्शन दिली जाते.
अर्जदार लाभार्थ्याला किती पेन्शन मिळेल?
लाभार्थ्याला प्रतिमहा प्रति लाभार्थी पेन्शन म्हणून 600/- रुपये मिळतील.
Old Pension Scheme Maharashtra | पेन्शन योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांना जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार/तलाठी कार्यालय या ठिकाणी पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत पेन्शनच्या रकमेचा दरमहा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क कार्यालय
या योजनेच्या अधिक माहितीसाठी आणि तुमचा काही शंका-कुशंका असतील. तर तुम्ही तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला किंवा तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क करू शकता.
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सर्व GR 2023
- दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना 2023 मराठी माहिती
- फार्म मशिनरी बँक योजना 2023 महाराष्ट्र मराठी माहिती
- पीएम हेल्थ आयडी कार्ड 2023 मराठी संपूर्ण माहिती
- नाविन्यपूर्ण योजना GR 2023: गाई म्हशींचे गट वाटप 6000 लाख निधी मंजूर