5.25 कोटी पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) योजना करिता वितरित

कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) योजना 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अंमलबजावणी करिता रुपये 5.25 कोटी एवढा निधी वितरीत करण्याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत

कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) योजना 2022

प्रमुख पिकांवरील कीड आणि रोगांचे व्यवस्थापनाच्या दृष्टीने पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण सल्ला (क्रॉपसॅप) योजना राबवण्यासाठी सन 2022-23 मध्ये रुपये 25 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. आयुक्त कार्यालय यांनी सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून सदर योजनेअंतर्गत रुपये 5.25 कोटी एवढा निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालील शासन निर्णय दिनांक 14 जून 2022 रोजी घेतला आहे.

Pokhara Yojana Village List: पहा तुमचे गाव पोखरा योजनेत आहे का !

शासन निर्णय दिनांक 14 जून 2022

सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, मका, ज्वारी व ऊस तसेच फळपिके आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्री, चिक्कू, काजू, भेंडी व टोमॅटो या प्रमुख पिकांवरील कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने राबवण्यात येणाऱ्या पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) योजनेअंतर्गत रुपये 5.25 कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने दिनांक 14 जून 2022 रोजी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

maharashtra shasan nirnay gr

नियंत्रण, आहरण व संवितरण अधिकारी

कृषी आयुक्त यांना नियंत्रण अधिकारी म्हणून व आयुक्तालय स्तरावरील खर्चासाठी सहाय्यक संचालक लेखा एक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच

  • विभागीय कृषी सहसंचालक स्तरावर – विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील लेखा अधिकारी
  • जिल्हास्तरावर – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
  • उपविभाग स्तरावर – उपविभागीय कृषी अधिकारी
  • तालुका स्तरावर – तालुका कृषी अधिकारी

यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेला निधी तरतुदींच्या अधीन राहून खर्च करण्याची जबाबदारी कृषी आयुक्त यांची असेल.

या शासन निर्णय GR च्या अधिक माहितीसाठी आणि या शासन निर्णयाची सत्याप्रतता जाणण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202206141455357301.pdf

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top