अर्ज सुरू कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2024

PM Kusum Yojana Maharashtra 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये महाराष्ट्र कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन 2023 (Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply) www.mahaurja.com registration संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे कुसुम योजनेचे उद्दिष्ट काय आहे, त्याचे लाभ कोणते, योजनेसाठी आवश्यक पात्रता काय, फी किती, आवश्यक कागदपत्रे कोणती, अनुदान किती, कुसुम योजना अर्जाची यादी कशी तपासायची, www.mahaurja.com Kusum Registration, हेल्पलाईन क्रमांक काय इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या लेखामध्ये मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्णपणे नक्की वाचा.

pm kusum solar pump yojana

Table of Contents

कुसुम योजना महाराष्ट्र उद्दिष्ट

कुसुम योजना वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. महाराष्ट्र कुसुम योजना सुरु करण्यामागचे उद्दिष्ट राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर उर्जेवर चालणारे सौर पंप उपलब्ध करून देणे हे आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेल सिंचन पंपाचे सौर ऊर्जा पंप मध्ये रूपांतर करणारा आहे. यामुळे देशातील शेतकरी जे डिझेल किंवा पेट्रोलच्या सह्याने सिंचन पंप चालवतात, ते पंप आता महाराष्ट्र कुसुम योजना 2023 अंतर्गत सौर उर्जेवर चालवले जातील. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात डिझेल आणि पेट्रोल वर चालणारी देशातील 1.75 लाख पंप आता सौर पॅनल च्या मदतीने सौरऊर्जेवर ते चालवले जातील.

अर्ज सुरू Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Registration

महाऊर्जामार्फत राज्यातील महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसूम घटक-बी योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषीपंपाकरीता महाऊर्जाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल दिनांक 17 मे 2023 रोजीपासून सुरू करण्यात आलेला आहे. पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटींनुसार 3 , 5 आणि 7.5 HP DC क्षमतेची पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा खाली दिलेल्या जाहिरातीप्रमाणे असणार आहे.

Mahaurja Kusum Registration 2023

PM कुसुम सोलर पंप योजना 2023 महाराष्ट्र Online Application | www.mahaurja.com Kusum Registration

नोट: महाऊर्जा पोर्टल वर शेतकरी बांधवांच्या अर्ज करण्याच्या गर्दीमुळे हे पोर्टल बंद पडत आहे. परंतु रात्रीच्या वेळी हे पोर्टल सुरु असू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी हे पोर्टल चालू आहे कि नाही हे चेक करत राहावे आणि आपला फॉर्म भरून घ्यावा.

कुसुम सोलार पंप योजना पेमेंट भरण्यासाठी मुदत वाढली !! ही आहे शेवटची तारीख

New Update कुसुम योजना 2023

कुसुम योजना महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या दहा वर्षात 17.5 लाख डिझेल पंप आणि ३ कोटी कृषी उपयोगी पंपांचे सौर पंपा मध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य सरकारने ठेवलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. सौर पंप बसवण्यासाठी आणि सौर उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे.

PM कुसुम योजनेच्या नावाने फसव्या वेबसाइट्सपासून सावध रहा.

मंत्रालयाच्या असे निदर्शनास आले आहे की, पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधान मंत्री-कुसुम योजना) च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सौर कृषी पंप अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासह नोंदणी फी व पंपाची किंमत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जात आहे. तर अश्या अनेक बनावट फसव्या वेबसाइट पासून सावध राहा.
त्यापैकी काही बनावट वेबसाइट्स * .org, * .in, * .com अशा डोमेन नावांमध्ये नोंदणीकृत आहेत जसे की www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusamyojana.org.in, www.pmkisankusumyojana . com आणि इतर अशा अनेक वेबसाइट.
म्हणूनच PM कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकारऱ्यांना फसव्या वेबसाइट्सवर कोणतीही देय रक्कम भरून ऑनलाइन पायमेन्ट देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. हि योजना राज्य सरकारच्या विभागांमार्फत प्रधानमंत्री-कुसुम योजना राबविली जात आहे.

महाराष्ट्र घरकुल योजना संपूर्ण माहिती | रमाई आवास योजना

कुसुम योजना अर्ज फी

या योजनेअंतर्गत, अर्जदाराला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अर्ज करण्यासाठी रु. 5000 प्रति मेगावॅट दराने अर्ज शुल्क आणि GST भरावा लागेल. हे पेमेंट राजस्थान रिन्युएबल एनर्जी कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावाने डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात केले जाईल. अर्ज करण्यासाठी, 0.5 MW ते 2 MW साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

मेगा वॅटअर्ज फी
0.5 मेगावॅट₹ 2500+ GST
1 मेगावॅट₹5000 + GST
1.5 मेगावॅट₹7500+ GST
2 मेगावॅट₹10000+ GST

कुसुम योजना महाराष्ट्र अनुदान किती?

कुसुम योजना महाराष्ट्र २०२२ एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.

 • सरकार शेतकर्‍यांना ६०% अनुदान देईल
 • ३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
 • शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.
 • या योजनेअंतर्गत सौर पॅनेल मधून तयार होणारी वीज शेतकरी विकू शकतो.
 • वीज विक्री करून मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय/धंदा सुरु करू शकतो.

सौर कृषी पंप अर्ज कसा भरावा | How to Fill Up Kusum Yojana Application Form

कुसुम महाऊर्जा मेडा अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे या व्हिडिओद्वारे सर्व शेतकऱ्यांना अर्ज कसा भरावा त्यामध्ये काय करावे काय नाही करावे या सर्वांची माहिती या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे. कृपया करून या व्हिडिओ नुसार अर्ज भरावा. या व्हिडिओमध्ये दिलेल्या अडचणी व्यतिरिक्त काही अडचण असल्यास आपल्या जवळच्या महाऊर्जा मेडा कार्यालयामध्ये संपर्क साधावा किंवा https://www.mahaurja.com/meda/en/cont… वरती संपर्क साधावा

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र | कुसुम योजना 2023 चे लाभ

 • भारतातील सर्व शेतकरी कुसुम योजनेचा लाभ घेऊ शकतात.
 • अनुदानित किमतीत सौर सिंचन पंप उपलब्ध करून दिला जातो.
 • 10 लाख ग्रिड जोडलेल्या कृषी पंपांचे सौरीकरण या योजनेअंतर्गत केले जात आहे.
 • कुसुम योजना 2022 अंतर्गत पहिल्या टप्प्यात 17.5 लाख डिझेलवर चालणारे सिंचन पंप सौर ऊर्जेवर चालवले जातील. त्यामुळे डिझेलचा वापर कमी होईल.
 • आता शेतात सिंचन करणारे पंप सौरऊर्जेवर चालतील, शेतकऱ्यांच्या शेतीला चालना मिळणार आहे.
 • या योजनेतून मेगावॅट अतिरिक्त वीजनिर्मिती होणार आहे.
 • या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून ६०% आर्थिक मदत दिली जाईल आणि बँक 30% कर्ज सहाय्य देईल आणि फक्त शेतकऱ्याला 10% रक्कम भरावी लागेल.
 • ज्या शेतकऱ्यांमध्ये राज्यात दुष्काळ आहे आणि जिथे विजेची समस्या आहे, अशा शेतकऱ्यांसाठी कुसुम योजना फायदेशीर ठरणार आहे.
 • सोलर प्लांट बसवल्यास 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात सहज सिंचन करू शकतात.
 • सोलर पॅनलद्वारे निर्माण होणारी अतिरिक्त वीज, शेतकरी ती वीज सरकारी किंवा निमसरकारी वीज विभागांना विकू शकतो, तेथून शेतकऱ्याला 1 महिन्यासाठी 6000 रुपयांची मदत मिळू शकते.
 • कुसुम योजनेंतर्गत जे काही सोलर पॅनल बसवले जातील, ते ओसाड जमिनीत बसवले जातील, त्यामुळे नापीक जमिनीचाही उपयोग होईल, तसेच नापीक जमिनीतून उत्पन्नही मिळेल.

बांधकाम कामगार योजना 2022: फायदे, अर्ज, लाभ, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र पात्रता

 • अर्जदार लाभार्थी हा भारत देशाचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • कुसुम योजनेअंतर्गत, अर्जदार ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अर्ज करू शकतो.
 • अर्जदार त्याच्या जमिनीच्या प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी/ वितरण महामंडळाने अधिसूचित केलेल्या क्षमतेसाठी जे कमी असेल त्याच्यासाठी अर्ज करू शकतो.
 • प्रति मेगावॅटसाठी सुमारे २ हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
 • या योजनेअंतर्गत, स्वत:च्या गुंतवणुकी सह प्रकल्पासाठी कोणत्याही आर्थिक पात्रतेची आवश्यकता असणार नाही.
 • जर अर्जदार विकासकामार्फत प्रकल्प विकसित करत असेल, तर विकासकाला प्रति मेगावॉट 1 कोटी रुपये संपत्ती असणे आवश्यक आहे.

कुसुम योजना 2023 लाभार्थी

 • शेतकरी
 • सहकारी संस्था
 • शेतकर्‍यांचा गट
 • जल ग्राहक संघटना
 • शेतकरी उत्पादक संस्था

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • शिधापत्रिका
 • नोंदणीची प्रत
 • अधिकृतता पत्र
 • जमिनीच्या जमाबंदीची प्रत
 • चार्टर्ड अकाउंटंटने जारी केलेले नेट वर्थ प्रमाणपत्र (प्रकल्प विकासकाद्वारे विकसित झाल्यास)
 • मोबाईल नंबर
 • बँक खाते विवरण
 • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

PM कुसुम योजना 2023 महत्वाची संकेतस्थळ | www.mahaurja.com Kusum Registration

महाराष्ट्र कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

 • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल .
 • आता मुख्यपृष्ठावर, तुम्हाला कुसुम योजनेसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर अर्ज तुमच्यासमोर उघडेल.
 • तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व महत्त्वाची माहिती भरावी लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाची वरील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • त्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र कुसुम योजनेअंतर्गत अर्ज करू शकाल.

महाराष्ट्र विधवा पेंशन योजना: कागदपत्रे, एप्लीकेशन फॉर्म, अर्ज, पात्रता

कुसुम योजना अर्जाची यादी तपासा

 • कुसुम योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी निवडलेल्या अर्जदारांची नावे पाहण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला सौर योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • त्यानंतर “ KUSUM नोंदणीकृत अर्जांची यादी ” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • तुम्ही या पर्यायावर क्लिक करताच निवडक अर्जदारांची यादी तुमच्या समोर उघडेल आणि आता तुम्ही या यादीतील कोणत्याही व्यक्तीचे नाव सहजपणे शोधू शकता.

कुसुम योजना हेल्पलाइन क्रमांक

या लेखात आम्ही तुम्हाला कुसुम योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. तरीही तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कुसुम योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता जो खालीलप्रमाणे आहे.

 • संपर्क क्रमांक- 011-243600707, 011-24360404
 • टोल-फ्री क्रमांक- 18001803333

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top