नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना GR 2022 संबंधित चालू आर्थिक वर्षातील जीआर संबंधित माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

Table of Contents
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना GR 2022
सन 2019-20 या वर्षांमध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना चालू ठेवण्यासाठी दिनांक 15-12-2019 रोजी च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आलेली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक 8-12-2019 पासून लागू करणे आवश्यक होते. परंतु प्रशासकीय कारणास्तव सदर योजना दिनांक 8-12-2019 पासून लागू होऊ शकली नाही आणि ती दिनांक 10-12-2019 पासून सुरू करण्यात आली. कृषी आयुक्तालयाने प्रस्तावित केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दिनांक 8-12-2019 ते दिनांक 10-12-2019 या खंडित कालावधीमध्ये प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी शासन स्तरावरून मंजुरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने दिनांक 2 जून 2022 रोजी खालील शासन निर्णय घेण्यात आला.
शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय दिनांक 2 जून 2022
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दिनांक 8 डिसेंबर 2019 ते दिनांक 9 डिसेंबर 2019 या दोन दिवसांच्या कालावधीत प्रशासकीय कारणास्तव पडलेल्या खंडास खंडित कालावधी म्हणून घोषित करण्यात आले. तसेच सदर खंडित कालावधीतील पात्र विमा दाव्यांना मंजुरी देण्यास याद्वारे शासनाने मान्यता दिली आहे.
- या कालावधीतील प्राप्त विमा दावे मंजूर करण्यासाठी आयुक्त कृषी यांना अधिकृत करण्यात येत आहे.
- या कालावधीतील दावे तपासून त्यांच्या पात्र किंवा अपात्रतेबाबत सखोल आणि काळजीपूर्वक छाननी करायची आहे.
- या शासन निर्णयानुसार लाभार्थींना दिनांक 31-8-2019 नुसार शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास रुपये 2 लाख व अपंगत्व आल्यास प्रकरणपरत्वे रुपये 1 लाख ते 2 लाख याप्रमाणे नुकसान भरपाई रक्कम दिली जाईल.
- उपरोक्त समिती मार्फत प्राप्त प्रस्तावांची छाननी करून निधी वितरणाचा प्रस्ताव आयुक्त कृषी यांनी शासनास सादर करावा.
- शासनाने वितरीत केलेला निधी आयुक्त कृषी यांच्यामार्फत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल. यासाठी किंवा विमा लाभ पात्रतेसाठी शासन निर्णय परिपत्रकातील अटी व शर्ती बंधनकारक असून कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असेल.
- याप्रकरणी अदा करावयाच्या रकमेबाबत पात्र विमा यांना मंजुरी देण्यासाठी आयुक्त कृषी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना GR
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन २०२०-२१ या वर्षाकरिता दिनांक 10-12-2020 ते 9-10-2021 या कालावधीसाठी लागू करणे आवश्यक होते. तसेच प्रशासकीय काही कारणास्तव प्रस्तुत योजना दिनांक 10-12-2020 पासून लागू होऊ शकली नाही. व ती दिनांक 6-4-2021 पासून सुरू करण्यात आली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दिनांक 10-12-2020 ते दिनांक 6-4-2021 या खंडित कालावधीमध्ये प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विशेष बाब म्हणून संदर्भ क्रमांक ६ नुसार मान्यता देण्यात आली आहे.
यानुसार योजनेच्या अटी आणि शर्ती नुसार पहिल्या टप्प्यात मागणीनुसार प्राप्त ठरलेल्या 1185 प्रस्तावांसाठी 168 मृत्यू आणि 17 अपंगत्व याकरिता रुपये 23. 53 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. योजनेच्या अटी आणि शर्ती नुसार पात्र ठरलेल्या प्रस्तावासाठी आयुक्त कार्यालयाने केलेल्या मागणीस अनुसरून आणि योजनेसाठी मंजूर सुधारित अंदाज विचारात घेता रुपये 7.28 कोटी इतकी रक्कम गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासनाने दिनांक 31 मार्च 2022 रोजी च्या बैठकीमध्ये खालील शासन निर्णय घेण्यात आला.
कृषी यांत्रिकीकरण योजना सर्व GR 2022
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना GR शासन निर्णय 31 मार्च 2022
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दिनांक10-12-2020 ते 9-10-2021 या 118 दिवसांच्या खंडित कालावधीमध्ये दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी प्राप्त ठरलेले दावे निकाली काढण्यासाठी रुपये 7. 28 कोटी इतकी रक्कम सन 2021- 22 या वर्षासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी अर्थसंकल्पीय केलेल्या रकमेतून वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना GR संबंधित अधिक माहितीसाठी आणि त्याची सत्यप्रतता जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन दिनांक 2 जून 2022 रोजी चा शासन निर्णय पाहू शकता. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने संबंधित अधिक जीआरच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत चला.
- TFWS Scheme in Maharashtra for Engineering | ट्यूशन फी माफी योजना 2023
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना |Old Pension Scheme Maharashtra
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोजगार प्रोत्साहन योजना 2023 महाराष्ट्र GR संपूर्ण माहिती
- महाराष्ट्र शिधापत्रिका यादी 2023 | mahafood.gov.in Online Application
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 | Swavalamban yojana in marathi