Gharkul Yojana Maharashtra 2023 List | घरकुल योजना महाराष्ट्र | घरकुल योजना ऑनलाईन अर्ज | घरकुल योजना ऑनलाईन लाभार्थी यादी | घरकुल योजना नवीन यादी | घरकुल योजना अर्ज PDF | घरकुल योजना कागदपत्रे 2023 संपूर्ण माहिती | रमाई घरकुल योजना महाराष्ट्र List, अर्ज PDF, कागदपत्रे, अनुदान
Maharashtra Gharkul Yojana: नमस्कार मित्रांनो, या लेखांमध्ये आपण रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2023 या महाराष्ट्र घरकुल योजना संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये त्याचे फायदे कोणते, उद्दिष्ट काय, पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या लेखांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा. आपल्या देशामध्ये असे अनेक नागरिक आहेत, ज्यांना स्वतःचे घर नाही. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने घरकुल योजना सुरू केलेली आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाबद्दल त्या संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 2023
महाराष्ट्रातील नागरिकांना घरकुल योजना 2023 मधून शासनाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. घरकुल योजने अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांना राज्य सरकारकडून घरे दिली जाणार आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना या घरकुल योजनेअंतर्गत आत्तापर्यंत १.५ लाख घरे देण्यात आली असून, घरकुल योजनेच्या यादीमध्ये 51 लाख घरे उपलब्ध करून देण्याचे सरकारने उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेअंतर्गत घर मिळवू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना रमाई आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचून माहिती घ्यावी लागेल.
आवास योजनेअंतर्गत १,१३,००० हुन अधिक घरे बांधण्यात येणार
महाराष्ट्र शासनाने रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये १ लाख १३ हजार ५७१ घरे आणि शहरी भागांमध्ये २२ हजार ६७६ घरे बांधण्यासाठी मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी दिली आहे. याबाबतचा अध्यादेश सामाजिक न्याय विभागाने जारी केलेला आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ही मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नागरिकांना या योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ रमाई आवास योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच भविष्यामध्ये घरबांधणीचे उद्दिष्टही वाढविण्यात येणार आहे.
बचत गट कर्ज व्याज परतावा योजना: Online अर्ज, कागदपत्रे, बँक, व्याजदर
रमाई आवास योजना 2023 यादी
घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यलय किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क करावा लागेल. रमाई आवास योजने मध्ये सर्व लाभार्थ्यांची नावे महाराष्ट्र सरकारने अधिकृत वेबसाइटवर अपडेट केलेली आहेत. तुम्हाला लाभार्थी यादी मध्ये तुम्हाला तुमचे नाव तपासायची असेल, तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे नाव तपासण्यासाठी यादी ची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव यादीमध्ये तपासू शकता. लाभार्थ्यांचे नाव यादी मध्ये असेल, अशा सर्व नागरिकांना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार कडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
घरकुल योजनेचे उद्दिष्ट काय?
रमाई आवास योजना 2023 चे मुख्य उद्दिष्ट हे राज्यातील गरीब लोकांना स्वतःचे घर मिळवून देणे. जे आर्थिक दुर्बलतेमुळे स्वतःचे घर बांधू शकत नाहीत. रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील गरीब लोकांना घरे उपलब्ध करून दिली जाते जातात.
घर बांधणे मंजुरीची जिल्हा निहाय यादी
जिल्ह्याचे नाव | ग्रामीण भाग | शहरी क्षेत्र |
नागपूर | ११६७७ | २९८७ |
औरंगाबाद | ३०११६ | ७५६५ |
लातूर | २४२७४ | २७७० |
अमरावती | २१९७८ | ३२१० |
नाशिक | १४८६४ | ३४६ |
पुणे | ८७२० | ५७९२ |
मुंबई | १९४२ | ८६ |
महाराष्ट्र घरकुल योजनेचे फायदे काय कोणते?
- या योजनेचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती बौद्ध आणि आर्थिक दृष्ट्या घटकातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील नागरिकांना देण्यात येणार आहे.
- राज्यातील नागरिकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर दिले जाते दिले जात आहे.
रमाई आवास योजनेअंतर्गत अनुदान कसे मिळते?
या योजनेअंतर्गत नवीन घरकुल बांधण्यासाठी सर्वसाधारण १,५३,४२०/- एवढे अनुदान दिले जाते आणि हे अनुदान आपल्या कामाच्या टप्प्याटप्प्याने आपल्या बँक खात्यावर जमा केले जाते
अनुदान किती मिळते?
- घर बांधकाम अनुदान – १,२०,०००/-
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय – १२,०००
- नरेगा रोजगार हमी योजना मधून मजुरी – २१,४२०/-
घरकुल योजना कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र (तहसीलदारांचे)
- पक्के घर नाही यासाठी ग्रामपंचायत प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलदाराचे)
- लाभार्थी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण २०११ च्या प्राधान्यक्रम यादी निकषांच्या बाहेर आहे असे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
घरकुल योजना पात्रता
- अर्जदार लाभार्थी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती किंवा नवबौद्ध या प्रवर्गातील असावा.
- लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य कमीत कमी पंधरा वर्षाचे असावे.
- लाभार्थी बेघर किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
- लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत असणे गरजेचे आहे.
- सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण २०११ च्या प्राधान्यक्रम निकषांच्या यादी बाहेर असावा.
रमाई आवास घरकुल योजना अर्ज कसा व कुठे करावा?
- सर्वप्रथम तुम्हला मिळवावा लागेल.
- त्या मध्ये तुम्हाला तुमचे नाव नमूद करावे लागेल.
- तुमचा पत्ता नमूद करावं लागेल.
- त्यानंतर जात, संवर्ग भरावे लागेल.
- अर्जदाराचे नाव, पूर्ण पत्ता आणि व्यवसाय तुम्हाला भरावा लागेल.
- त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची नावे, लाभार्थ्यांची नाते व व्यवसाय कॉलम मध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे द्यायचे आहेत.
- अर्जाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात तुम्हाला तुमची सही करायची आहे.
- तुमची ग्रामपंचायत शिफारस पत्र, ग्रामसेवक यांची सही शिक्का, पंचायत समितीकडे शिफारस,विस्ताराधिकारी आणि गट विकास अधिकारी यांची तुम्हाला एक सही घ्यावी लागेल.
- अशा पद्धतीने फक्त दोन पेजेस तुम्हाला हा अर्ज आहे अर्ज भरायचा आहे आणि आपल्या ग्रामपंचायत मध्ये वरील कागदपत्रांसोबत जमा करायचा आहे.
- त्यानंतर हे अर्ज तुमचे पंचायत समितीकडे जातात आणि त्यानंतर तुम्हाला घरकुल योजनेच्या अटी आणि शर्ती पाहून त्याचा लाभ दिला जातो. त्यानंतर तुम्हला रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत याचा लाभ दिला जातो.
- महिला किसान योजना 2023 महाराष्ट्र संपूर्ण माहिती
- Election Commission Maharashtra Voter List ऑनलाइन तपासणी
- Mahadbt Farmer Scheme List | महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2023
- Tractor Loan Online Apply: ट्रॅक्टर कर्ज योजना रु. 2500000/- कर्ज करा अर्ज
- Pik Karj: प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान खात्यात जमा !! कोणते शेतकरी पात्र??