Janani Suraksha Yojana in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये जननी सुरक्षा योजना मराठी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे जननी सुरक्षा योजना, त्याचे फायदे कोणते(Janani Suraksha Yojana benefits), लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन कुठे करावे, या योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता काय आहे, अशा कार्यकर्तींची कामे कोणती, रेजिस्ट्रेशन कुठे करायचे, लाभ कोणते, इत्यादी सर्व माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.
Table of Contents
जननी सुरक्षा योजना | Janani Suraksha Yojana in Marathi
जननी सुरक्षा योजना ही भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय द्वारे राबवली जाणारी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांच्या प्रसूतीसाठी १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना भारत सरकारने 12 एप्रिल 2005 पासून सुरू केलेली आहे. या योजनेवर दरवर्षी सरकार सुमारे 1600 कोटी रुपये खर्च करत आहे. या योजनेचा लाभ सुमारे १ कोटी गर्भवती महिलांना घेता येत आहे.
Janani Suraksha Yojana Highlights
योजनेचे नाव | जननी सुरक्षा योजना |
कधी सुरु केली | 12 एप्रिल 2005 |
योजनेचा प्रकार | केंद्र सरकार योजना |
लाभार्थी | गरीब अनुसूचित जाती जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील गर्भवती महिला |
योजनेचा दरवर्षी खर्च | 1600 कोटी रुपये |
कोणाद्वारे राबवली जाते | भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय |
उद्दिष्ट्य | गर्भवती महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक मदत |
जननी सुरक्षा योजना उद्दिष्ट्य काय? Janani Suraksha Yojana in Marathi
देशातील दारिद्र रेषेखालील गर्भवती महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी राबवली जाणारी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमुळे गर्भवती महिला च्या गर्भधारणेदरम्यान तसेच बाळाच्या जन्मा दरम्यान आणि बाळाच्या जन्मानंतर संरक्षण होते. आणि बाळाचे चांगली उपचार होऊ शकतील. ज्यामुळे स्त्री निरोगी राहण्यास आणि निरोगी बाळाला जन्म देण्यास मदत होईल. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार गर्भवती महिलांना आर्थिक मदत करते. ज्यामध्ये गर्भवती महिला च्या प्रसूतीनंतर ही आर्थिक मदत थेट तिच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. जेणेकरून त्या महिलेला आणि तिच्या बाळाला पुरेसे पोषण मिळेल. या योजनेतून सुरक्षित प्रसुतीचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. ही योजना मुख्यतः गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबातील महिलांसाठी राबवली जाते.
महाराष्ट्र घरकुल योजना संपूर्ण माहिती | रमाई आवास योजना
जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
- दारिद्र रेषेखालील असणाऱ्या 19 वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या गर्भवती महिला या योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचा लाभ घेऊ शकतात.
हा लाभ त्या महिलेला दोन बाळांच्या जन्मापर्यंतच घेता येऊ शकतो. - या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील गर्भवती महिलांना घेता येईल.
- ग्रामीण आणि शहरी भागातील आशा कार्यकर्ता यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेमार्फत आर्थिक मदत केली जाते.
जननी सुरक्षा योजनेचे फायदे कोणते? Janani Suraksha Yojana Benefits in Marathi
- सुरक्षित प्रसूती केल्याने बाळ आणि माता या दोघांच्या जीवनाचा धोका कमी होण्यास मदत होते.
- दारिद्र्यरेषेखालील महिलांच्या सुरक्षित प्रसूती ला प्रोत्साहन देणे या योजनेअंतर्गत शक्य झाले आहे.
- महिलेची सामान्य किंवा सिझेरियन प्रसुती झाली असेल तर मदत. त्यामध्ये तिची सर्व उपचार पद्धती, सर्व औषधे, हॉस्पिटल मध्ये राहणे, जेवण, पिणे सर्वकाही तिला विनामूल्य दिले जाते.
- ही योजना गरोदर मातांच्या गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर बाळाची चांगली काळजी घेण्यासाठी त्या स्त्रीची मदत करते.
- या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना 1400/- रुपये तर शहरात राहणाऱ्या महिलांना 1000/- रुपये दिले जातात.
- याव्यतिरिक्त जर बाळाला जन्मानंतर समस्या उद्भवली, तर त्याच्यावर विनामूल्य उपचार केले जातात.
- या योजनेमुळे महिलांचे दवाखान्यात प्रसुतीचे प्रमाण वाढवणे शक्य होईल.
- ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब अनुसूचित जाती-जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना मातामृत्यू आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
जननी सुरक्षा योजनेसाठी नोंदणी कुठे करावी?
- ज्या महिलेला या योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा आहे, त्या महिला या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.
- स्वतःचे नाव या योजनेसाठी नोंदवण्यासाठी त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा जवळील अंगणवाडी मध्ये जाऊन त्यांचे नाव नोंदवावे लागेल. जेणेकरून या योजनेअंतर्गत त्या महिलांना लाभ मिळू शकेल
- या योजनेची नोंदणी अर्भकाच्या जन्माच्या वेळी शासकीय रुग्णालयांमध्ये देखील करता येते.
- नाव नोंदविल्यानंतर महिलेला एम सी एच आणि जननी सुरक्षा कार्ड दिले जाते आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे एम सी एच कार्ड खूप महत्त्वाचे आहे.
बचत गट कर्ज व्याज परतावा योजना: Online अर्ज, कागदपत्रे, बँक, व्याजदर
जननी सुरक्षा योजना अंतर्गत लाभ कोणते?
- या योजनेतील ग्रामीण भागातील लाभार्थी महिला सरकारी दवाखान्यांमध्ये किंवा नामांकित खासगी दवाखान्यांमध्ये प्रसूती झाली, तर लाभार्थ्यांना प्रसुतीच्या तारखेनंतर सात दिवसांच्या आत रुपये सातशे लाभ दिला जातो. ही रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे दिली जाते.
- जननी सुरक्षा योजनेतील शहरी भागातील लाभार्थी महिला जर सरकारी दवाखान्यांमध्ये किंवा नामांकित खासगी दवाखान्यांमध्ये प्रसूती झाली, तर त्या लाभार्थी महिलेला प्रसूतीच्या तारखे नंतर सात दिवसाच्या आत ६०० रुपये लाभ दिला जातो. ही रक्कम तिच्या थेट बँक खात्यामध्ये धनादेशाद्वारे जमा केली जाते.
- ग्रामीण आणि शहरी भागातील फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील लाभार्थी महिला जर घरी प्रसूती झाली, तर अशा लाभार्थी महिलेला प्रसुतीनंतर सात दिवसाच्या आत ५०० रुपयांचा लाभ दिला जातो. ही रक्कम देखील बँक खात्यामध्ये धनादेशाद्वारे दिली जाते.
- जर या योजनेचा योजनेअंतर्गत नोंदणी केलेली महिला लाभार्थी चे सिझेरियन शस्त्रक्रिया झाली, तर त्याला भारतीय महिलेला रुपये 1500 आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम तिच्या बँक खात्यामध्ये परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे दिली जाते.
जननी सुरक्षा योजना आरोग्य संस्था
या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आरोग्य संस्था कार्यरत आहेत. त्या खालील प्रमाणे –
ग्रामीण भागातील आरोग्य संस्था
- प्राथमिक आरोग्य उपकेंद्र
- प्राथमिक आरोग्य केंद्र
- ग्रामीण रुग्णालय
- उपजिल्हा रुग्णालय
- जिल्हा स्त्री रुग्णालय या योजनेकरिता नामांकित केलेली खाजगी रुग्णालय
शहरी भागातील आरोग्य संस्था
- महानगरपालिका व नगरपालिका यांच्या क्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्रे
- नागरी कुटुंब कल्याण केंद्र
- शासकीय अनुदानित रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय
- या योजनेअंतर्गत नामांकित केलेली खाजगी इस्पितळे
जननी सुरक्षा योजना आशा कार्यकर्ती ची कामे
- जननी सुरक्षा योजना नमुन्यातील कार्ड मध्ये सर्व आवश्यक माहिती भरून लाभार्थी महिलेला देणे.
- लाभार्थी महिलेकडून या योजनेकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे गोळा करणे.
- या योजनेततील लाभार्थीस बँकेमध्ये खाते उघडून देण्यासाठी आवश्यक ती मदत करणे.
- लाभार्थी महिलास प्रसूतिपूर्व तपासणी, लोहयुक्त गोळ्या आणि धनुर्वात प्रतिबंधक लस मिळवून देणे.
- शासकिय आरोग्य संस्थेमध्ये किंवा शासनामार्फत नामांकित खाजगी आरोग्य संस्थेमध्ये प्रसूती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- जर त्या गरोदर स्त्री कडे दारिद्र्यरेषेचे कार्ड नसेल, तर ते ग्रामसेवकाकडून तिला मिळवून दिलं पाहिजे.
- रुग्णालयामध्ये बाळंतपण करण्यासाठी आणि बाळंतपणा आधी चार तपासण्या करून घेण्यासाठी त्या गरोदर स्त्रीला आणि घरच्यांना प्रोत्साहन देणे.
- जननी सुरक्षा योजना 2024 | Janani Suraksha Yojana in Marathi
- TFWS Scheme in Maharashtra for Engineering | ट्यूशन फी माफी योजना 2024
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना |Old Pension Scheme Maharashtra
- विधवा पेंशन योजना महाराष्ट्र Form: कागदपत्रे, अर्ज, पात्रता
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोजगार प्रोत्साहन योजना 2024 महाराष्ट्र GR संपूर्ण माहिती