औपचारिक पत्र लेखन मराठी | How to write formal letter in marathi

Formal Letter in Marathi: नेमकं पत्रलेखन म्हणजे काय? आपल्या मनातील भावना, विचार, मत  अभिव्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे बोलणे. हे आपल्याला माहीतच आहे. ही अभिव्यक्ती अधिक मुद्देसूदपणे चांगल्या पद्धतीने सुबद्ध पद्धतीने अपेक्षित व्यक्तींपर्यंत उत्तमरित्या पोहचवण्याचे माध्यम म्हणजेच पत्रलेखन.

पत्र लेखनाची गरज काय?

आपण प्रत्यक्ष बोलताना काहीतरी विषयासंदर्भात एखादा मुद्दा राहून जाण्याची शक्यता असू शकते. परंतु पत्रलेखन करताना ते लिहिण्याआधी वैचारिक पातळीवर आपली पूर्व तयारीही होत असते. त्यासाठी वेळ मिळत असतो आणि यामुळेच पत्रलेखन हे अधिक मुद्देसूद नेमकी सुसंगत आणि परिणामकारक होत असते.

जल प्रदूषण मराठी माहिती: उद्दिष्टे, विश्लेषण, समस्या, कारणे, कार्यपद्धती

पत्र लेखनाचे प्रकार

पत्रलेखनाचे प्रामुख्याने औपचारिक म्हणजेच व्यावहारिक आणि अनौपचारिक म्हणजे घरगुती किंवा कौटुंबिक. असे दोन प्रकार पडतात.

1. औपचारिक पत्र (Formal Letter Writing in Marathi)

औपचारिक पत्रामध्ये कोणत्या पत्रांचा समावेश होतो?

याप्रकारच्या पत्रांमध्ये निमंत्रण, आभार,  चौकशी,  मागणी, विनंती, तक्रार इत्यादि. पत्रांचा समावेश होतो.

औपचारिक पत्र का लिहिली जातात?

अशा प्रकारची पत्रे ही बहुतेक वेळा आपण काहीशा अपरिचित व्यक्तीला लिहीत असतो. या पत्रातून आपले काम करून घेण्याचा किंवा कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्याच्या भूमिकेतून आपण अशा प्रकारची पत्रे लिहीत असतो. त्यामुळे या पत्रांचे लेखन हे ठरलेल्या संकेतानुसारच होणे गरजेचे असते.

1. मागणी पत्र

मागणी पत्राद्वारे आपल्याला आवश्यक ते उपलब्ध करून देण्याच, साहित्य विनंतीच आपण करत असतो.

2. तक्रार पत्र

तक्रार पत्रातून आपल्याला होणारा त्रास. संबंधित व्यक्तीला आपण करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्या अपेक्षा आहेत तेदेखील कळवत असतो आणि तो त्रास दूर व्हावा आणि आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून विनंती करत असतो.

3. चौकशी पत्र.

चौकशी पत्रात आपण आपल्याला काही माहिती जर जाणून घ्यायची असेल तर ती करण्यासाठीची विनंती आपण. चौकशी पत्रातून करत असतो.

त्यामुळे हे सगळे विनंती पत्राचे प्रकार होऊ शकतात. भेद खूपच. पुसट आहेत.

औपचारिक पत्र कोणती?

औपचारिक पत्रामधील भाषा कशी असावी?

पत्र लिहिताना त्यामधील भाषा म्हणूनच साधी सरळ आणि सोपी असणं गरजेचं आहे. जास्त पाणी न लावतां आपले म्हणणे योग्य त्या शब्दात आणि स्पष्ट शब्दांत सांगण हे या पत्राचे उद्दिष्ट असते. तेवढीच भाषा असली तरी ती नम्र आणि संयमी असणे गरजेचे आहे.

पत्राची मांडणी कशी असावी? (Formal Letter Format New) हे.

 • पत्राच्या सुरुवातीला त्याच्या उजव्या कोपऱ्यामध्ये पत्र लिहिणारेचे नाव, हुद्दा (म्हणजेच पत्र कोणत्या नात्याने लिहीत आहोत याचा उल्लेख) उदाहरणार्थ विद्यार्थी प्रमुख, नागरिक इत्यादी. आणि पत्ता असावा.
 • पत्ता झाल्यानंतर योग्य तो दिनांक आणि ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर लिहावा.
 • त्यानंतर डाव्या साइडला योग्य तो मायना असावा. त्यामध्ये संबंधित व्यक्तीचं नाव हुद्दा आणि थोडक्यात पत्ता लिहावा.
 • विशेषनाम पत्रात असेल, तरच ते लिहिणं गरजेचं आहे. अन्यथा. प्रति प्रेक्षक या ठिकाणी अ. ब. क. असा उल्लेख केला तरी चालेल.
 • विषय औपचारिक पत्रामध्येविषयीने खूप आवश्यक असते. विषयावरून पत्राचा हेतू संबंधित व्यक्तीच्या लवकर लक्षात येतो. त्यामुळे विषय थोडक्यात लिहिणं गरजेचं आहे.
 • महोदय किंवा महोदया असे लिहून औपचारिक पत्र लेखनाला सुरुवात केली जाते.
 • दोन ते तीन. परिच्छेदात मुद्देसूद लेखन असावं.
 • पत्राच्या शेवटी. आपला किंवा आपली कृपाभिलाषी किंवा. पैकी योग्य ते संबोधन वापरून. पत्राचा समारोप करावा.

अनौपचारिक पत्र. (Informal Letter Writing in Marathi)

अनौपचारिक पत्रामध्ये घरगुती मित्र मैत्रिणींना आणि कौटुंबिक लिहिलेली पत्रं असतात त्यांना अनौपचारिक पत्रे असं म्हटलं जातं. या पत्रातून आपण आपल्या भावभावना खुशालीही आपल्या मित्रांपर्यंत किंवा कुटुंबापर्यंत पोहचवत असतो.

अनौपचारिक पत्र कसे लिहावे? (Informal Letter Writing Format in Marathi)

 • अनौपचारिक पत्र लिहिताना विशिष्ट असे नियम आणि संकेत नसतात. कारण ते आपल्या. घरचांनामित्रमैत्रिणींना लिहिलेलं असतं.
 • यामध्ये उजवीकडच्या कोपऱ्यामध्ये दिनांक, गावाचे नाव, वार लिहावे.
 • मध्यभागी ओम किंवा श्री. असे लिहिण्याची प्रथा आहे.
 • डावीकडे प्रिय आदरणीय किंवा तीर्थरूप इत्यादि योग्य भावना लिहून पुढे व्यक्तीचे नाव लिहून पत्र लेखनाला सुरुवात केली जाते.
 • शेवटी व्यक्तिरूप आशीर्वाद नमस्कार लिहून तुझा किंवा तुझी किंवा तुमचा असा समारोह केला जातो.

अनौपचारिक पत्रांमध्ये भाषा कशी वापरली जाते?

अनौपचारिक पत्रामधील भाषा संवाद केल्यासारखी असते. म्हणजेच गप्पा मारल्यासारखी साधी, सोपी, मनमोकळी भाषा या ठिकाणी अशा प्रकारच्या पत्रामध्ये वापरली जाते. त्याचप्रमाणे वर्णनात्मक, खोडकर, आपलेपणाची दिलखुलास अशी भाषा या ठिकाणी आपण लिहिताना वापरतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top