Soyabean Lagwad Marathi Mahiti: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन लागवड पद्धती, बीज प्रक्रिया, योग्य वाणाची निवड, सोयाबीनचे एकरी बियाणांचे प्रमाण, खत व्यवस्थापन, आंतरपीक पद्धत, आंतरमशागत, रासायनिक तण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, सोयाबीन फवारणी वेळापत्रक इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.
Table of Contents
सोयाबीन पिक
सोयाबीन पिकाची गुणवत्ता लक्षात घेता, त्याची नियोजनपूर्वक पेरणी केली, तर ते शेतीत एक आशावादी ठरेल. सोयाबीन मध्ये 20% तेलाचे प्रमाण आणि 40% प्रथिनांमुळे विविध उपयोगी सोयाबीनला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा मध्ये सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कमी कालावधीत येणारे पीक, पीक कापसाला पर्यायी पीक, रब्बीमध्ये दुसरे पीक घेता येत असल्यामुळे दोन पिके एका हंगामामध्ये होतात. मजुरांची आवश्यकता व द्विदल पीक व झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्याने हवेतील नत्र स्थिरीकरण होऊन जमिनीचा पोत सुधारतो. म्हणून सोयाबीनचा सर्व पिकांमध्ये चांगले मानले जाते. महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये सोयाबीन घेतले जाते. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
Best Soybean variety in Maharashtra
मराठवाडा आणि विदर्भ महाराष्ट्र | MAUS-158, NRC-77, MACS-1188, Dsb-21, NRC-86 (ahilya-6), KPS-344, Raj Soya-24, JS-20-29, JS-20-34, |
बीजप्रक्रियेचे महत्व
- सोयाबीन बियाणाला बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते. त्यामुळे बियाणांद्वारे प्रसार होणाऱ्या बुरशीला नियंत्रित करता येते.
- त्यासाठी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम + एक ग्रॅम कार्बेन्डाझिम या प्रमाणात बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
- मागील काही वर्षांमध्ये चक्र भुंगा व खोडकिडा या खोडातील किडीमुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. ही कीड पेरणीनंतर बारा ते पंधरा दिवसात खोडात शिरल्यामुळे व खोड पोखरत असल्यामुळे फवारणीद्वारे इथे नियंत्रण करणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी 2 मिलि रिहांश अवश्य लावावी.
- सोयाबीन हे द्विदल वर्गीय असल्यामुळे त्याला रायझोबियम जापोनिकम 20 ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास पेरणीपूर्वी 2 ते 3 तास अगोदर लावून सावलीत सुकवावे.
- थोडक्यात प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम व एक ग्रॅम कार्बेन्डाझिम लावल्यानंतर दोन मिली रेहांश व शेवटी वीस ग्रॅम रायझोबियम लावावे. जिवाणू खते ही चांगल्या गुणवत्तेची आणि फ्रेश असावीत.
सोयाबीन बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी
- बीज प्रक्रिया करताना बियाणे जोरात घासू नये. त्याचे टरफल नाजूक असल्यामुळे उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
- प्रथम बुरशीनाशकाची व कीटकनाशकाची प्रक्रिया करून नंतर जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.
- सर्व बीजप्रक्रियेमुळे बियांद्वारे किंवा जमिनीतून होणाऱ्या बुरशीच्या प्रसाराला आळा बसतो. रायझोबियममुळे मुळावरच्या गाठीमध्ये वाढ होऊन हवेतील नत्राचे स्थिरीकरणामध्ये वाढ होते.
मिरची लागवड माहिती । Mirchi Lagwad Mahiti in Marathi
सोयाबीन योग्य वाणाची निवड
- सोयाबीनची जेएस -350 ही जात आजपर्यंत उत्कृष्ट ठरलेली आहे. तसेच मागील काही वर्षांमध्ये जे. एस. 9305 ही जात सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पसंत येत आहे.
- या व्यतिरिक्त इतर काही जाती जसे 228, 71, 162 किंवा खाजगी कंपन्यांची संशोधने सुद्धा आहेत.
- 335 फार जुनी जात असल्याने कीड आणि रोगास बळी पडणे सुरू झालेले आहे. काही क्षेत्रात इतर जातींची लागवड करून त्यापैकी चांगली जात निवडून पुढे वापरावी.
- अनुवंशिक शुद्धता असलेले बूस्टर 335 किंवा बूस्टर 9305 मिळाल्यास त्याचा वापर नक्की करावा.
एकरी बियाणांचे प्रमाण
- सोयाबीनची एकरी 30 किलो बियाणे पेरणीची शिफारस आहे. ही शेतकऱ्यांचा अनुभवानुसार 75 टक्क्यांपेक्षा जास्त उगवणक्षमता असल्यास एकरी 25 किलो बियाणे पेरून उत्पादनामध्ये वाढ होते.
- घरचे बियाणे वापरायचे असल्यास त्याची उगवण क्षमता तपासून पहावी. 1 लाख 70 हजारांच्या जवळपास एकरी झाडांची संख्या असावी. घरचे बियाणे ठेवायचे असल्यास, ते बियाणी मळणी यंत्राचा वेग कमी करून काढावे किंवा गंजीच्या खालचे दाणे ठेवावेत.
- बियाणे एखाद्या वेगळ्या जागी ठेवावे. त्याला जास्त हाताळू नये. त्यावर जास्त वजन ठेवू नये.
- घरचे चांगले बियाणे असल्यास त्याची उगवण शक्ती 70 टक्केपेक्षा जास्त असल्यास बियाणे पेरण्यास उत्तम आहे.
- उगवणक्षमता तपासण्यासाठी माती मोकळी करून त्यामध्ये दहा बियांच्या १० लाईनमध्ये शंभर दाणे जमिनीत लावून त्याला वेळेवर पाणी टाकावे.
- त्यापैकी जेवढे दाणे उगवतील , तेवढे टक्के बियाण्याची उगवणक्षमता समजावे.
- उगवणशक्ती तपासण्याच्या इतरही काही पद्धती आहेत. त्यापैकी कोणत्याही पद्धतीने उगवणक्षमता तपासावी. बॅगच्या किमतीमध्ये व घरच्या सोयाबीनच्या किंमतीमध्ये जास्त फरक असल्यास घरचे बियाणे पेरण्यास फायद्याचे ठरू शकते.
सोयाबीन खत व्यवस्थापन
- एकरी 12 किलो नत्र व 30 किलो स्फुरद वापरण्याची शिफारस आहे. म्हणजेच डीएपी एकरी 60 ते 70 किलो दिल्यास शिफारशीत मात्रा दिली जाते. काही ठिकाणी सुपर फॉस्फेट पेरणी पूर्वी वापरतात. हे चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे.
- ज्या जमिनीमध्ये पालाशचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी 12:32:16 किंवा 14:35:14 ही खते सुद्धा उपयुक्त ठरतात. सोयाबीनला खताची मात्रा पेरतानाच द्यावी, दुसऱ्या पिकांप्रमाणे नंतर नत्राची दुसरी मात्रा देऊ नये.
- त्याचप्रमाणे सोयाबीनला एकरी दहा किलो सल्फर दाणेदार किंवा एक किलो सल्फर WDG + पाच किलो ह्युमिक ऍसिड दाणेदार जसे रायझर-जी किंवा ह्यूमॉल किंवा ह्युमिसील पेरणी बरोबर दिल्यास चांगला फायदा होतो.
चुनखडी जमिनीसाठी सोयाबीन खत व्यवस्थापन
चुनखडी जमिनीमध्ये झिंक व फेरस ची कमतरता असते. अशा जमिनीत सोयाबीन पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी पाणी पिवळे होतात. त्यातच तण नाशकाची फवारणी केल्यामुळे पाने जास्त पिवळी होऊन जळतात. अशा चुनखडी जमिनीमध्ये सोयाबीन फिरताना एकरी पाच किलो झिंक सल्फेट व तीन किलो फेरस सल्फेट चा वापर करावा. 30 दिवसांनी एकरी 15 किलो युरिया सुद्धा द्यावा. सोबत झिंक व फेरस पेरल्यास 30 दिवसांनी फवारणीतून परिस स्पर्श किंवा बुस्ट झिंक व बूस्ट फेरस वापरावे. शक्यतोवर अशा जमिनीत पाने पिवळे झाल्यास त्यामध्ये तणनाशक फवारू नये.
कांदा लागवड संपूर्ण माहिती: रोग आणि कीड व्यवस्थापन, खत पाणी व्यवस्थापन
सोयाबीन आंतरपीक पद्धत
कोरडवाहू शेती मध्ये धान्य, चारा व कडधान्यांची गरज भागवण्यासाठी अधिक लाभ मिळविण्याकरिता खालील आंतरपीक पद्धती वापरावी.
- सोयाबीन+ज्वारी+तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीत 6:2:1, 9:2:1 या ओळींच्या प्रमाणात पेरणी करावी.
- किंवा सोयाबीन+तुर 6:1 किंवा 5:1 अशी पेरणी करावी किंवा तूर प्रकरणांमध्ये दिल्यानुसार तुरीमध्ये आंतरपीक घ्यावे.
आंतरमशागत
- सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना मुळीच डवरणी करू नये.
- पहिली डवरणी 15 ते 20 दिवसांनी तणनाशकाचा फवारणीपूर्वी व दुसरी 30 ते 35 दिवसांनी किंवा फक्त एकच डवरणी केली तरी चालेल.
- दुसऱ्या वेळेस दोरी बांधल्यास रोपांच्या ओळीवर मातीची भर पडून सरा पडतात व पाणी संग्रहित होतील. किंवा डवरणी करताना तीन ओळींनंतर सरी काढावी किंवा पट्टा पद्धतीने ( सहा ओळी सोयाबीन व त्यानंतर एक ओळ रिकामी) अशी पेरणी करावी. नंतर रिकाम्या ओळीत सरी पाडावी. यापैकी कोणतीही एक पद्धत केल्यास पाणी मुरण्यास मदत होते.
- 50 ते 60 दिवसांनी दोन टक्के युरियाची फवारणी केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.
रासायनिक तण नियंत्रण
दिवसेंदिवस मजुरांची उपलब्धता कमी होत असल्याने तणनाशकाच्या माध्यमातून तणनियंत्रण करणे हा एक चांगला पर्याय आहे. सोयाबीन मधील बरीच तणनाशके आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी इमॅझिथॉपर या तणनाशकाचा वापर वाढत आहे.
- पेरणीनंतर 7 ते 21 दिवसांनी एकरी 300 मिली इमॅझिथॉपर (परस्युट किंवा तत्सम) + 300 मिली अमोनियम सल्फेट +225 मिली स्टिकर फवारणी तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे तंतोतंत फवारणी करावी. किंवा स्ट्रॉंगआर्म उत्कृष्ट तणनाशक बाजारात आले आहे. आणि त्याचा वापर पेरणीच्या मागेच किंवा पेरणीच्या पहिला दिवस धरल्यास तिसऱ्या दिवसापर्यंत करू शकाल.
- एकरी पेरणी 12.4 ग्रॅम आहे. दहा ग्लास पाण्यात 12.4 ग्रॅम स्ट्रॉंगआर्म मिसळून एका एकरामध्ये वापरावे.
- मध्ये तुरीचे आंतरपीक असल्यास 12.4 ग्रॅमचे 12 पंप करावेत. म्हणजेच 1 एकराचे औषध साधारण दहा सव्वा एकरामध्ये वापरावे. हे उत्कृष्ट तणनियंत्रण करते. स्ट्रॉंग आर्म वापरायचे असल्यास जमिनीत चांगला ओलावा असणे आवश्यक आहे. व त्यानंतर सोयाबीन मध्ये इतर तननाशक वापरू नये. नसता पिकाला जास्त शॉक लागून पीक करपू शकते.
सोयाबीन फवारणी वेळापत्रक
सोयाबीनच्या फवारणीचे वेळापत्रक खाली दिलेल्या तक्त्यात दर्शवले आहे. त्यातील घटकांमध्ये बदल करू नका. पिकांच्या अवस्थेनुसार व गरजेनुसार फॉर्मुला शिफारस केला आहे. औषधांचे प्रमाण दहा लिटर चा साधा पंप किंवा दहा लिटर च्या पेट्रोल पंपाचे आहे. पंप बदलल्यास प्रमाण बदलावे. (शेंगा भरण्याच्या अवस्थेत बिग-बी किंवा ताण पडल्यास 13:00:45 फवारा.)
सोयाबीन पाणी व्यवस्थापन
- खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास सोयाबीनला एक किंवा दोन वेळा संरक्षणात्मक पाणी द्यावे.
- फुलोरा अवस्था व दाणे भरण्याची अवस्था यातून नाजूक अवस्था असून फुलारा अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते.
आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला सोयाबीन लागवड संबंधित सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कंमेंट मध्ये विचारू शकता.
- कुसुम सोलार पंप योजना पेमेंट भरण्यासाठी मुदत वाढली !! ही आहे शेवटची तारीख
- सोयाबीन लागवड तंत्रज्ञान: जाती, वाण, खत, औषधे, फवारणी वेळापत्रक संपूर्ण माहिती
- अर्ज सुरू प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र 2024: Online Form, कागदपत्रे
- 40 लाख व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी PMEGP प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना माहिती | पोखरा योजना Online Form
उत्तम माहिती!