Shettale Yojana Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात राबवल्या जाणाऱ्या शेततळे अनुदान योजनांची माहिती या लेखात पाहणार आहोत. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या शेततळे योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ कोण घेऊ शकतो आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा. या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि पात्र असल्यास या योजनांचा अवश्य लाभ घ्या.
Table of Contents
Shettale Anudan Yojana 2024 Maharashtra
मागेल त्याला शेततळे योजना
महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण अनिश्चित असल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर याचा विपरीत परिणाम होत असताना दिसून येतो. पाण्याच्या टंचाईमुळे आणि पावसात पडलेल्या खंडा मुळे पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. या गोष्टीचा विचार करता, दुष्काळावर मात करण्यासाठी आणि शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी राज्यातील कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे.
तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करून देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे ‘मागेल त्याला शेततळे शेततळे योजना‘ जाहीर केलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत मदत होईल.
मागेल त्याला शेततळे योजना लाभार्थी पात्रता
- ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेता येईल.
- शेतकऱ्यांनी या आधी शेततळे योजनेचा लाभ घेतलेलाअसू नये.
- तसेच लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्या करिता तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील बीपीएल किंवा त्याच्या कुटुंबातील किंवा ज्याच्या कुटुंबातील व्यक्तीची आत्महत्या झालेली असेल, अशा कुटुंबांना म्हणजे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रिया मध्ये प्राथमिकता देऊन निवड केली जाते.
फार्म मशिनरी बँक योजना महाराष्ट्र मराठी माहिती
मागेल त्याला शेततळे योजना अर्ज
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराने आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा तालुका कृषी अधिकारी यांना भेट देऊन अर्ज सादर करावेत. तसेच सदर योजनेसाठी आपले सरकार पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकतात.
पोखरा अंतर्गत सामुदायिक शेततळे अनुदान योजना
महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत म्हणजेच पोखरा अंतर्गत सामुदायिक शेततळ्यासाठी अनुदान योजना सुरू केलेली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना दुष्काळात किंवा पाण्याच्या टंचाईत सुरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जागतिक बँक अर्थसहाय्यीत संरक्षित पाण्याच्या साठवणीसाठी शेतकऱ्यांना सामुदायिक शेततळे अनुदान प्रकल्प राबवण्यात आलेला आहे.
पोखरा अंतर्गत सामुदायिक शेततळे अनुदान आणि अर्ज
या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सामुदायिक शेततळ्यासाठी १०० टक्के अनुदान देय असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी समूहाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजेच डीबीटीमहापोकरा या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळे अनुदान योजना
केंद्र पुरस्कृत अन्नसुरक्षा अभियान सन २००७-०८ पासून राबवले जात आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे या घटकासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ देशातील अनुसूचित जाती जमातीचे लोक तसेच इतर शेतकरी देखील घेऊ शकतात.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सर्व GR
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळे अनुदान अर्ज
या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यासाठी त्यांना महाडीबीटी पोर्टल ला भेट द्यावी लागेल आणि त्या ठिकाणी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. तसेच अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क करावा लागेल.
गट शेती अंतर्गत सामूहिक शेततळे योजना
गट शेतीस प्रोत्साहन आणि सबलीकरणासाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये सामूहिक शेततळे योजनेचाही समावेश आहे. सामूहिक शेततळे या घटकासाठी १ कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून १०० टक्के अनुदान देय आहे. तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून या घटकासाठी असलेले १०० टक्के अनुदान मर्यादित जिल्ह्यांसाठी उपलब्ध आहे.
गट शेती अंतर्गत सामूहिक शेततळे योजना अनुदान
या जिल्ह्यातील गटांना शंभर टक्के अनुदान सामूहिक शेततळे योजनेतून घेता येईल. लक्षांकाअभावी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून अनुदान उपलब्ध होत नसेल, तर गट शेती योजनेतून ६० टक्के अनुदान शेतकऱ्याला मिळवता येईल.
Karj Mafi Maharashtra | महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना यादी
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेततळे अनुदान योजना
एकात्मिक फलोत्पादन विकास अंतर्गत सिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शेततळे अनुदान योजना राज्यात राबवली जाते. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेततळे अनुदान अर्ज
अर्ज करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्याला महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज सादर करावा लागेल आणि अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी कार्यालयाला संपर्क करावा लागेल.
- अपंग प्रमाणपत्र online: फॉर्म , स्मार्ट कार्ड, शासन निर्णय जीआर, अपंग प्रकार, नियम
- SBI Loan Information In Marathi | स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजना मराठी
- महिला बचत गट कर्ज (Loan) योजना संपूर्ण माहिती: कर्ज, कागदपत्रे, व्याजदर, फायदे
- Kadba Kutti Machine Subsidy Maharashtra: 100% अनुदान करा ऑनलाईन अर्ज
- आर्थिक दुर्बल घटकांतील तरुणांना उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज !! करा ऑनलाईन अर्ज
म्हणजे आता पात्र होण्यासाठी कुटुंबातील एका व्यक्तीला आत्महत्या करावी लागेल…..