प्रधानमंत्री पेन्शन योजना मराठी माहिती: सर्व प्रधानमंत्री पेन्शन योजनांची माहिती

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात प्रधानमंत्री पेन्शन योजनांची मराठी माहिती पाहणार आहोत. केंद्र सरकारच्या पेन्शन योजना कोणकोणत्या आहेत. त्याचे फायदे कोणते, त्यांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

प्रधानमंत्री पेन्शन योजना मराठी माहिती

प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना

अटल पेन्शन योजना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी १ जून २०१५ रोजी सुरू केलेली आहे. ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. यामध्ये वृद्ध काळात देशातील नागरिकांना निश्चित मासिक वेतन उत्पन्न उपलब्ध करून देऊन त्यांना सन्मानाने जीवन जगण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे. हे पीएम अटल पेन्शन योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या आधारावर त्यांना पेन्शनची रक्कम दिली जाते. या योजनेचा लाभ देशातील ४० ते ६० वर्ष दरम्यान घेऊ शकतात.

अटल पेन्शन योजनेचे फायदे

  • पेन्शन योजनेद्वारे देशातील नागरिकांना निवृत्तीनंतरही दरमहा पेन्शन मिळू शकते.
  • ही योजना असंघटित क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे.
  • वयाच्या ६० वर्षानंतर ही पेन्शन ची रक्कम सुरू होते.
  • या योजनेअंतर्गत १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत ची वीस वर्ष गुंतवणूक केल्यास वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन सुरू होते.

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक नागरिकाला कोणत्याही राष्ट्रीय बँकेत आपले बचत खाते उघडून नोंदणी फॉर्म भरावा लागेल. आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडून बँक व्यवस्थापकाकडे जमा करावी लागतील. त्या फॉर्मच्या पडताळणी नंतर तुमचे बँक खाते उघडले जाईल. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळील कोणत्याही राष्ट्रीय बँकेला बँकेमध्ये संपर्क करू शकता.

प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजना

भारत सरकार मार्फत प्रधानमंत्री वय वंदना योजना ही देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ मार्च २०१७ पासून सुरु केली गेलेली आहे. या योजनेअंतर्गत भारतातील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन दिले जाते. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर व्याज देऊन त्यांना पेन्शन दिली जाते. यामुळे वृद्धापकाळात देशातील गरीब नागरिकांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि ते स्वावलंबी होतील. हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

प्रधानमंत्री वय वंदना पेन्शन योजनेची पॉलिसीची मुदत १० वर्ष आहे. या योजनेअंतर्गत लाभधारकाला जीएसटी कर भरावा लागत नाही. या योजनेअंतर्गत कोणतीही वयाची मर्यादा नाही. या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. ऑफलाईन प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या एलआयसी शाखेशी संपर्क करावा लागेल आणि एलआयसी शाखेतील अधिकार्‍यास आवश्यक ती कागदपत्रे देऊन सर्व माहिती देऊन तुम्ही अर्ज करू शकता.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना देशात १५ फेब्रुवारी २०१९ पासून लागू करण्यात आलेली आहे. ही योजना मुख्यतः वीटभट्टी कामगार, रिक्षाचालक, घरगुती नोकर, मजूर, शिंपी, इत्यादी असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरू करण्यात आलेले आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असते असे असंघटित कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला दरमहा गुंतवणूक करावी लागणार आहे. ही रक्कम ही गुंतवणुकीची रक्कम रुपये ५५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत असेल.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत किती पेन्शन मिळते?

  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला त्याच्या गुंतवणुकी नुसार वयाच्या ६० वर्षानंतर प्रतिमहा ३,०००/- रुपये इतकी पेन्शन दिली जाते.
  • जर लाभार्थी या योजनेअंतर्गत पेन्शन घेताना मरण पावला, तर त्याच्या पेन्शनच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम ही त्याच्या जोडीदाराला पेन्शन म्हणून दिली जाते म्हणजेच लाभार्थ्याच्या मृत्युनंतर त्याच्या पतीला किंवा पत्नीला १,५००/- रुपये प्रतिमहा पेन्शन मिळते.

PM श्रमयोगी मानधन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रांमध्ये जावे लागेल. आपली सर्व आवश्यक कागदपत्रे अधिकाऱ्याला द्यावी लागतील. त्यानंतर सीएससी अधिकारी तुमचा या पेन्शन योजनेचा फॉर्म भरेल. अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना साठी सीएससी केंद्रा मध्ये अर्ज करू शकता.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना

पीएम किसान मानधन योजना केंद्र सरकारने ३१ मे २०१९ रोजी सुरु केली गेली. या योजनेअंतर्गत देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी इच्छुक व योगदान देणारी पेन्शन योजना सुरू केली. अल्पसंख्यांक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दर महा पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत वर्षाला ३६ हजार रुपये पेन्शन दिली जाते.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत किती पेन्शन मिळते?

  • शेतकऱ्यांना ५० टक्के प्रीमियम व उर्वरित ५० टक्के प्रीमियम शासनाद्वारे देण्यात येतो.
  • या योजनेचा लाभ देशातील गरीब छोट्या शेतकऱ्यांना वय वर्ष ६० नंतर ३,०००/- रुपये मासिक पेन्शन देऊन त्यांच्या वृद्धापकाळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी मदत केली जाते.

PM किसान मानधन योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत वृद्धापकाळातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे आणि भूमिहीन शेतकऱ्यांना सक्षम बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात म्हणजेच सीएससी केंद्रात जाऊन सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. आणि या योजनेसाठी अर्ज करून दर महा पेन्शनचा लाभ घ्यावा लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top