Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना शेळी/मेंढी गट वाटप योजना GR PDF

Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2023: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण शेळी किंवा मेंढी गट वाटप तसेच 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनात द्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे. या योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना गट खरेदी किंवा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कालावधी निश्चित करण्याबाबतचा दिनांक 24 जून 2022 रोजी चा शासन निर्णय माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

maharashtra shasan nirnay gr

Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2023

शासन निर्णयान्वये राज्यात राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजना 2022 अंतर्गत अनुक्रमे 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनात द्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवणे. आणि 10 शेळ्या/मेंढ्या+ एक बोकड/नर मेंढा वाटपाच्या योजनेस प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. आणि या दोन्ही योजना महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येत आहेत.

या दोनही योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्याचप्रमाणे शेळी किंवा मेंढी गटाची प्रत्यक्ष खरेदी करण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आलेला नसल्यामुळे सदर कालावधी विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासनाने दिनांक 24 जून 2022 रोजी खालील शासन निर्णय घेतला आहे.

शेळी पालन ऑनलाईन अर्ज: महाराष्ट्र पशुपालन अनुदान शेळी पालन कर्ज योजना

शासन निर्णय GR 24 जून 2022

वर नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन खालील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत.

राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनात द्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याकरिता पायाभूत सुविधा पुरवणे. या योजनेअंतर्गत संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून लाभार्थ्यांची निवड झाल्या बाबत पत्राद्वारे कळविले जाईल. त्या दिनांकापासून तीन महिने कालावधीत शंभर टक्के पायाभूत सुविधा उभारणे बंधनकारक राहील. जर असे नाही केले तर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी संबंधितास 30 दिवसांची अंतिम मुदत द्यावी. या कालावधीत संबंधित आणि पायाभूत सुविधांची उभारणी केली नाही, तर या योजनेचा लाभ त्यांना घ्यावयाचा नाही असे गृहीत धरले जाईल. आणि प्रतीक्षा यादी मधील पुढील लाभार्थ्याला लाभ देण्याची कार्यवाही केली जाईल.

नाविन्यपूर्ण योजना 2021-22 पूर्वी लाभ मंजूर

या योजनेअंतर्गत सन 2021-22 पूर्वी लाभ मंजूर करण्यात आलेल्या ज्या लाभार्थ्यांनी काही अपरिहार्य कारणास्तव अद्याप पायाभूत सुविधांची उभारणी केलेली नाही. अशा लाभार्थ्यांना अखर्चित निधी शिल्लक असल्यास अशा प्रकरणी शेवटची संधी म्हणून 30 दिवसांची अंतिम मुदत देण्यात येईल. आणि याही कालावधीत संबंधितांनी पायाभूत सुविधांची उभारणी न केल्यास संबंधितांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा नाही असे गृहीत धरले जाईल. आणि पुढील लाभार्थ्याला लाभ दिला जाईल.

संबंधित लाभार्थी यांनी पायाभूत सुविधांची पूर्णपणे उभारणी केल्यानंतर तसे संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांना कळवावे.

राज्यातील नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत 10 शेळ्या/मेंढ्या आणि 1 बोकड/नर मेंढा टपाच्या योजनेअंतर्गत संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून लाभार्थ्यांची निवड झाल्याबाबत पत्राद्वारे कळविले जाईल. यांच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या कालावधीत संबंधितांनी लाभार्थी स्वहिश्‍श्‍याची रक्कम किंवा बँक कर्ज द्वारे उभारलेली रक्कम संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. असे केले नाही, तर संबंधितांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा नाही असे गृहीत धरून प्रतीक्षायादी मधील पुढील लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू केली जाईल.

मातोश्री पाणंद रस्ता शासन निर्णय PDF महाराष्ट्र मराठी माहिती

असा हा शासन निर्णय दिनांक 24 जून 2022 रोजी घेण्यात आला. या शासन निर्णयाची सत्यप्रतता जाण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील खालील लिंकवर जावा. आणि तो सविस्तरपणे पहा. https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202206241506125401.pdf

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top