मातोश्री पाणंद रस्ता शासन निर्णय PDF महाराष्ट्र मराठी माहिती

मातोश्री पाणंद रस्ता शासन निर्णय PDF: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना शासन निर्णय PDF संबंधित माहिती पाहणार आहोत.

maharashtra shasan nirnay gr

पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना

शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाचा उपलब्धतेमुळे त्याचप्रमाणे कृषीयांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी ,मळणी आणि इतर कामे ही यंत्रामार्फत करण्यात येत आहेत. शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता व यंत्रसामुग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही रस्त्यांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने योजनांच्या अभिसरणमधून ‘पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना‘ महाराष्ट्र राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या योजनेत तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता रिभाषित केलेली नसल्यामुळे बर्‍याच ठिकाणी शेत रस्त्याची कामे होऊन देखील रस्त्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाहीत. रस्त्यांची गुणवत्ता परिभाषेत नसल्यामुळे काही ठिकाणी अतिक्रमण काढून रस्त्यांवर फक्त माती टाकली जाते. यामुळे रस्ता रुंद झालेला दिसून येतो. मात्र मात्र पाऊस पडल्यावर तेथे चिखल होतो आणि रस्ता वापरणे असाह्य होते. अधिक पाऊस पडला तर असे मातीचे रस्ते वाहून जातात व केलेल्या कामांचा परिणाम शून्य होतो.

पिक कर्ज योजना online अर्ज l online crop loan application

मातोश्री पाणंद रस्ता योजनेची गरज काय?

महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध होईल. यासाठी राज्यात ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध‘ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध‘ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यासाठी शेत रस्ते सुद्धा अन्य महामार्ग तेवढेच महत्त्वाचे आहेत. शेतात पीक तयार होताच ते योग्य ठिकाणी काढून साठवणे किंवा बाजारात विकले गेले पाहिजे. रस्त्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेत असे करणे शक्य होत नाही. राज्याने ‘विकेल ते पिकेल‘ असे घोषवाक्य दिलेले आहे. पावसाळ्यामध्ये निघणारी पिक मग आर्थिकदृष्ट्या कितीही फायदेशीर असली, तरी रस्त्या अभावी ती विकण्याचा विचार करता येत नाही. पाणंद रस्त्याची अनुपलब्धता मोठा अडथळा निर्माण करते.

राज्यात सर्वदूर शेतकरी लोकप्रतिनिधींकडे शेत रस्त्याची मागणी करत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात या कामाकडे लक्ष दिले गेलेले आहे. त्यामुळे हळूहळू या कामाला चळवळीचे स्वरूप येत असताना दिसून येते. त्यातच आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबास लखपती करण्याचे उद्दिष्ट सुद्धा सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये शेत/पाणंद रस्ते उच्च गुणवत्ता पूर्ण आणि बारामाही वापर करणे योग्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना राबवणे बाबतचा शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2018 रोजी घेण्यात आला. याबाबतचा प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यानुसार शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

शेळी पालन ऑनलाईन अर्ज: महाराष्ट्र पशुपालन अनुदान शेळी पालन कर्ज योजना

मातोश्री पाणंद रस्ता शासन निर्णय PDF

विविध योजनांच्या माध्यमातून पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना राबवण्यासाठी शासन शुद्धीपत्रक का द्वारे अधिक्रमित करण्यात आलेलं आहे.

महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक शेतकरी तसेच सर्व गावकरी समृद्ध व्हावा या दृष्टिकोनातून ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध‘ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध‘ ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेतरस्ते हे प्रामुख्याने शेतीतील कामाकरिता आवश्यक असणाऱ्या साधनांची करण्याकरिता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये विविध कामे जसे की पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी आणि इतर कामे यंत्र मार्फत केली जातात. या यंत्रसामुग्रीची वाहतूक करण्यासाठी बारमाही वापराकरिता शेत रस्ता सुयोग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत रस्ते तयार करण्याकरिता ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ता योजना‘ राबविण्यास मान्यता दिलेली आहे.

या योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी आणि या शासन निर्णयाची सत्यप्रतता जाणण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा आणि मातोश्री पाणंद रस्ता शासन निर्णय PDF पहा.

पाणंद रस्ता शासन निर्णय PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top