Sheli Palan Karj Yojana Online Form(Maharashtra Kukut Palan yojana): नमस्कार मित्रांनो, आज आपण शेळी पालन कर्ज योजना महाराष्ट्र अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची पशुपालन कर्ज योजना महाराष्ट्र (Pashupalan Yojana) माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या योजना अंतर्गत शेळीपालन आणि पशुपालन अनुदान दिले जाते याची माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळणार आहे.
Table of Contents
पशुपालन कर्ज योजना महाराष्ट्र
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान कोरडवाहू क्षेत्र विकास
या महाडीबीटी अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत फलोत्पादन शेती, हरितगृह, शेळी-मेंढी खरेदी किंवा कुकूटपालन, मुरघास युनिट, गाय म्हशी खरेदीसाठी अनुदान, मधुमक्षिका संच, हिरवळीची खत निर्मिती, गांडूळ खत युनिट, शेडनेट हाऊस, इत्यादी घटकांवर दोन हेक्टर मर्यादेत अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती तसेच इतर प्रवर्गातील शेतकरी यांना घेता येतो.
शेळी पालन कर्ज योजना खालील घटकांवर अनुदान देय असेल
- कुकुट पालन ,शेळी मेंढी खरेदी करण्यासाठी अनुदान
- मुरघास युनिट
- फलोत्पादन शेती हरितगृह, शेडनेट हाऊस
- मधुमक्षिका संच इत्यादी गोष्टींसाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते.
अर्ज कुठे करायचा?
या योजनेसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट http://www.hortnet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून लाभ घ्यावा. नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे ऑनलाइन अर्जाच्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
शेळी पालन कर्ज योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अनुसूचित जातीचा किंवा जमातीचा असल्यास जातीचा दाखला
- आधार लिंक असलेल्या बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स
- सातबारा व आठ प्रमाणपत्र
नाविन्यपूर्ण योजना
ही 10 शेळ्या आणि 2 बोकड गट वाटप योजना आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान देय आहे. या योजनेअंतर्गत शेळी बोकड जात वाटप राबविण्यास मान्यता दिलेले जिल्हे मराठवाड्यात मधील उस्मानाबाद, यवतमाळ, सातारा हे पहिल्या टप्प्यात तर बीड व भंडारा हे दुसऱ्या टप्प्यात आहेत. या जिल्ह्यांमध्ये गट वाटप योजना 2017-18 पासून राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली होती.
या योजनेअंतर्गत 20 शेळ्या खरेदी साठी दर प्रति शेळी 6,000/- रुपये अशा प्रकारे गटाची अपेक्षित एकूण किंमत 1 लाख 20 हजार एवढी असणार आहे. दोन बोकड खरेदी करण्यासाठी प्रति बोकड दर 8,000/- रुपये अशा प्रकारे दोन बोकडांची एकूण किंमत 16,000/- रुपये असणार आहे. शेळ्यांसाठी बांधण्यासाठी 450 चौरस फुटाचा प्रति शेळी किंवा बोकड 212 रुपये प्रति चौरस फूट या दराने साठी शेड बांधणे ची किंमत 95,400/- एवढी असेल.
अशाप्रकारे एकूण खर्च 2 लाख 31 हजार एवढा असेल. यामधील 50 टक्के म्हणजेच 1 लाख 15 हजार 700 एवढे अनुदान या योजनेअंतर्गत देय असेल. या योजनेचा लाभ इच्छुक शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा.
नाविन्यपूर्ण योजना शेळी/मेंढी गट वाटप योजना शासन निर्णय GR PDF
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना
माननीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, 12 डिसेंबर 2020 रोजी पासून महाराष्ट्रात शरद पवार समृद्धी योजना सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने हि योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्थलांतरण रोखण्यासाठी ही योजना राबवली आहे. मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अंतर्गत अनुदान
- कुकुट पालन किंवा पोल्ट्री शेड बांधण्यासाठी
- शेळीसाठी शेड बांधणे
- भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
- गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी
NLM उद्योजगता योजना
शेळीपालन कर्ज योजना आहे. ज्यामध्ये ग्रामीण पोल्ट्री फार्म च्या स्थापनेसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. या योजने अंतर्गत विविध घटकांसाठी अनुदान मर्यादा 25 लाख ते 50 लाख पर्यंत आहे.
या योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकते?
- कोणतीही व्यक्ती
- शेतकरी उत्पादक संस्था
- बचत गट
- शेतकरी सहकारी संस्था
- संयुक्त गट
- कलम आठ कंपन्या या योजनेसाठी अर्ज करू शकतात
उद्योजकता योजनेमध्ये शेळी आणि मेंढी यांकरिता प्रकल्प अनुदान 50 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. तसेच पोल्ट्री प्रकल्पासाठी 25 लाखांपर्यंत अनुदान मिळते. या प्रकल्पाची उर्वरित 50 टक्के रक्कम ही अर्जदाराला बँक कर्जाद्वारे किंवा संस्थेकडून कर्जाद्वारे किंवा स्वतः उभी करावी लागेल.
प्रकल्प अनुदानाची मर्यादा
- पोल्ट्री प्रकल्प- रु. 25 लाख
- मेंढी आणि शेळी- रु. 50 लाख
- डुक्कर- रु. 30 लाख
- चारा – रु.50 लाख
शेळी पालन कर्ज योजना साठी कोणत्या बँकांना संपर्क करावा लागेल?
अर्जदाराला कोणत्याही शेड्युल्ड बँका किंवा संस्थांकडून कर्ज मिळू शकते. तसेच ऑनलाइन प्रक्रियेदरम्यान देखील अर्जदार लिस्ट मधून आपल्या आवडीची बँक निवडू शकतो आणि त्या बँकेकडून उद्योजकता योजने अंतर्गत कर्ज घेऊ शकतो.
7/12 Online Maharashtra: ऑनलाइन गाव नमुना नंबर, सातबारा व ८- अ पाहणे
ऑनलाईन अपलोड करावयाची कागदपत्रे
- प्रकल्पात अर्जदाराच्या वाट्याचा पुरावा
- प्रकल्पात जोडलेल्या शेतकऱ्यांची यादी
- अर्जदाराचा पत्ता पुरावा
- शेवटच्या 3 वर्षांचे ऑडिट केलेले आर्थिक विवरण (कंपनीच्या बाबतीत)
- मागील 3 वर्षांचे आयकर विवरण
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मुख्य प्रवर्तकाचे पॅन/आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- प्रशिक्षण प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- स्कॅन केलेला फोटो
- स्कॅन केलेली स्वाक्षरी
शेळी पालन कर्ज योजना ऑनलाईन अर्ज कुठे करायचा?
अर्जदाराने www.nlm.udyamimitra.in द्वारे NLM उद्योजकता योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून अर्ज भरून सबमिट करू शकतात.
- TFWS Scheme in Maharashtra for Engineering | ट्यूशन फी माफी योजना 2024
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना |Old Pension Scheme Maharashtra
- विधवा पेंशन योजना महाराष्ट्र Form: कागदपत्रे, अर्ज, पात्रता
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोजगार प्रोत्साहन योजना 2024 महाराष्ट्र GR संपूर्ण माहिती
- महाराष्ट्र शिधापत्रिका यादी 2024 | mahafood.gov.in Online Application
शेती.मेढी
शेळी
शेळी
Anil baleeram hupade
क्षणभर
At/post Dhandri Tal Baglan District Nashik
At, salebardi th, tirora . Di.gondia ms.
सर आम्हाला शेळी पालन करायचं आहे आपण आम्हाला शासनाकडून शेळी मेंढी पालन ही एक अनुदान व शेळी मेंढी द्यावी
नाव . जया बाळासाहेब शिरसाठ
गाव . म्हसले ता.नेवासा. जि. अहमदनगर
पिन कोड 414603
दहा शेळ्या
एक बोकड
शेड
गौरव शिरसाट यांनी अर्ज केला
नाव.जया बाळासाहेब शिरसाठ
गाव. म्हसले. ता. नेवासा. जि. अहमदनगर
पिन . 414603
Shirsathgaurav135@gmail.com