आर्थिक दुर्बल घटकांतील तरुणांना उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज !! करा ऑनलाईन अर्ज

राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना स्वताच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग व्यवसाय करता यावा. याकरिता राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाची स्थापना केलेली आहे. या मंडळामार्फत बँकेकडून कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केली, तर त्या कर्जाचे सव्वा चार लाखापर्यंत चे व्याज हे आर्थिक मागास विकास मंडळ भरते. अर्थात हे कर्ज बिनव्याजी दुर्बल घटकातील तरुणांना मिळते. महामंडळाची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत 4509 बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ घेता आलेला आहे. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन व्यवसाय सुरु करायचा असेल, तर हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

binvyaji karj yojana

बिनव्याजी कर्ज 2022 साठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • पती-पत्नीच्या उत्पन्नाचा दाखला
  • व्यवसाय संबंधित कागदपत्र

बिनव्याजी कर्ज अर्ज कुठे करावा?

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालाची मदत अर्जदारांनी घेऊ नये. इच्छुक युवकांनी थेट महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून कागदपत्रे अपलोड करावीत. कोणतीही अडचण येत असेल, तर तात्काळ जिल्हा समन्वय एक कार्यालयात संकल्प संपर्क साधावा. 2022 पासून ही कर्ज मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत केली गेलेली आहे. या वाढलेल्या मर्यादेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी महामंडळाच्या कर्ज परतावा योजनेमधून लाभ घ्यावा.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना संपूर्ण माहिती: अर्ज, पात्रता, कागदपत्रे

285 कोटी 64 लाख कर्जाचे वाटप

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा मार्फत जिल्ह्यातील 4 हजार 509 बेरोजगार तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देऊन त्यांना सक्षम बनवले आहे. या तरुणांना विविध बँकांनी तब्बल 285 कोटी 64 लाख 98 हजार 386 रुपये इतक्या कर्जाची वाटप केले आहे.

कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कुठे करावा?

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांची किंवा मध्यस्थाची कोणतीही गरज नाही. असे महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रवीण आगवन पाटील यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी https://www.udyog.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.

संपर्क पत्ता

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
जी. टी हॉस्पिटल कंपाऊंड, बद्ड्रुद्दीन तय्यबजी मार्ग,
जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मागे, मुंबई 400 001.
दूरध्वनी. 22657662,
फॅक्स क्रमांक.22658017
ईमेल:[email protected]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top