जमिनीची धूप म्हणजे काय: प्रकार , कारणे, उपाययोजना | Soil Erosion in Marathi

Soil Erosion in Marathi: नमस्कार मित्रांनो, आज या लेखामध्ये आपण जमिनीची धूप म्हणजे काय, जमिनीच्या धुपीचे प्रकार कोणते, धूप होण्याची कारणे कोणती, धुपेचे नियंत्रण कसे करायचे इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या लेखात मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Table of Contents

जमिनीची धूप म्हणजे काय? (Meaning of Soil Erosion in Marathi)

जमिनीच्या पृष्ठावरील मातीची एका जागेवरून दुसर्‍या जागेवर होणारे स्थलांतर म्हणजेच जमिनीची धूप होय. मुख्यतः जमिनीची धूप प्राणी व वनस्पती यांच्या हालचाली तसेच पर्जन्य यांचे परिणाम यामुळे होते. भूपृष्ठावरील मातीचे कण एकमेकांपासून विलग होतात. हे विलग झालेले कण वारा व जमिनीवरून पावसाचे वाहणारे पाणी यांच्यासोबत वाहून नेले जातात आणि अशाप्रकारे जमिनीची धूप होते.

नैसर्गिक धूप (Soil Erosion in Marathi)

जमिनीची धूप होण्याची प्रक्रिया नैसर्गिक आहे. पाऊस, वारा, थंडी, उष्णता, खडक इत्यादीच्या परिणामामुळे आणि विदारक प्रक्रियेने माती तयार होत असते. ही माती तयार होण्याची प्रक्रिया अत्यंत सावकाश गतीने चालते. साधारणपणे १ सेंमी जाडीचा मातीचा थर तयार होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. तसेच झाडे-झुडपे यांचा पडणारा पालापाचोळा कुजून त्यापासून ही माती तयार होते. पाऊस आणि वाऱ्यामुळे माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते. सखल भागातील माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन दुसर्‍या ठिकाणी गाळाच्या स्वरूपामध्ये साठवली जाते आणि तेथे उपयुक्त अशी जमीन तयार होते. तर उंच आणि उताराच्या भागात पालापाचोळा या सखल भागातून साठतो आणि त्यापासून माती तयार होऊन झालेली धूप भरून निघते. अशाप्रकारे जोपर्यंत माती तयार होण्याची प्रक्रिया आणि मातीची धूप या दोन्ही प्रक्रिया यांचा समतोल साधला जातो. तो पर्यंत विदारण व धूप एकमेकास पूरक राहत असतात. यास नैसर्गिक धूप म्हणतात व ही नैसर्गिक उपकारक असते.

गतिवृध्दीत धूप

परंतु अन्य प्राणी आणि मनुष्य यांचा वावर जमिनीवर वाढल्याने मातीचे कण मोठ्या प्रमाणावर विलग होतात. तसेच शेतीची वेगवेगळ्या प्रकारची मशागत केली जात असताना, मातीची उलथापालथ होऊन ती विस्कळीत होते. चुकीच्या मशागतीच्या पद्धतीमुळे जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या आणि जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा अनिर्बंध मार्ग तयार करून दिला जातो. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याची गती वाढून त्यातून उर्जा निर्माण होते. अशा प्रकारे होण्या धुपेला गतिवृध्दीत धूप असे म्हणतात. या प्रकारची धूप अपायकारक असते. त्यामुळे त्याचा प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

वायू प्रदूषण मराठी माहिती: प्रस्तावना, महत्व, उद्दिष्टे, कारणे, उपाय योजना

जमिनीच्या धुपीचे प्रकार कोणते? (Types of Soil Erosion in Marathi)

जमिनीच्या धुपीचे पाच प्रकार आहेत ते खालील प्रमाणे:

उसळी धूप ( Splash Erosion)

या प्रकारची धूप जेव्हा पावसाचे पाणी जमिनीवर पडते, तेव्हा फार उंचीवरून पडत असते. पावसाच्या पाण्याला अतिशय थोडे का होईना पण वजन असते. आणि ते इतक्या उंचीवरून पडत असल्यामुळे त्या प्रत्येक थेंबाची एक विशिष्ट स्थळ ऊर्जा असते. पावसाचे थेंब जमिनीवर पडत असताना ते जमिनीच्या पृष्ठभागावरती आघात करतात. या आघातामुळे मातीचे कण विलग होऊन बाजूला पडतात. अशा प्रकारे गतिवृध्दीत धुपेला प्रारंभ होतो. अशा प्रकारच्या धुपे ला उसळी धूप (स्प्लॅश इरोजन) म्हटले जाते.

ओघळी धूप (Rill Erosion)

जेव्हा पावसाचे पाणी जमिनीवर पडते, तेव्हा ते पाणी उताराच्या दिशेने वाहू लागते. त्याचबरोबर त्यांच्या आघाताने मातीचे कण विलग होऊन वाहू लागतात. वाहत असताना असे पावसाचे अनेक थेंब एकत्र येऊन त्याचा एक लहान प्रवाह तयार होतो आणि जमिनीचा उतारा मुळे या प्रवाहाला एक गती मिळते. ही गती सतत वाढत जाते. त्यामुळे त्या प्रवाहाच्या भूपृष्ठाची आणखी झीज होऊन या लहान प्रवाहाच्या जागेवर लहान ओघळ तयार होतात. येथे हा धुपेचा दुसरा टप्पा सुरू होतो त्याला ओघळी धूप (Rill Erosion) असे म्हटले जाते.

चादरी धूप (Sheet Erosion)

अशाप्रकारे वाहणाऱ्या लहान ओघळीमधून एकत्र येणारे पाण्याचा एक मोठा पाणलोट तयार होतो, त्यास अपधाव (रन ऑफ)असे म्हटले जाते. हे अपधाव पाणी भूपृष्ठावरून एखाद्या चादरी प्रमाणे वाढत जाते आणि पुन्हा त्यास जमिनीचा उतारा मुळे गती प्राप्त होऊन जमिनीची मोठ्या पृष्ठभागाची झीज होऊन ती माती या मोठ्या पाणलोटासोबत वाहत जाते. यामुळे याला चादरी धूप (Sheet Erosion) असे म्हटले जाते.

घळी धूप (Gully Erosion)

भूपृष्ठावरून वाहणारा पाणलोट पुढे जाण्यासाठी मार्ग शोधू लागतो व खोलगट भागात तो केंद्रित होवून लागतो. अशाप्रकारे घळीचे शीर्ष (गली हेड) तयार होते. त्यानंतर हे पाणी खोलगट भागाकडे वाहू लागते व प्रवाह तयार होत जातात. त्याच्या आजूबाजूच्या अन्य उंच भागावरील पाणलोट येवून मिळत असतात आणि प्रवाहाचा विस्तार होत जातो. वाढनाऱ्या पाणलोटामुळे व जमिनीच्या उतारामुळे या प्रवाहाची गती वाढून प्रवाहाच्या तळाची अधिक धूप होत जाते व त्या ठिकाणी घळ तयार होते. त्यामुळे याला घळी धूप (Gully Erosion) म्हणतात.

प्रवाहातील धूप (Stream Bank Erosion)

पाण्याचा प्रवाह वाढत असताना त्यासोबत सतत पाणलोट क्षेत्राची देखील वाढ होत जाते. त्याच्या तळाच्या उतारामुळे त्याची गती गती ही वाढत जाते आणि या वाढत्या गतीमुळे तळाची तसेच त्याच्या दोन्ही काठाची आणखीनच झीज होत जाते. यामुळे प्रवाहची खोली आणि विस्तार दोन्ही वाढत जातात.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना संपूर्ण माहिती: अर्ज, पात्रता, कागदपत्रे

धूप होण्याची कारणे कोणती? (Soil Erosion Causes)

जमिनीची धूप हवामान, मनुष्य व प्राणी, भूरचना, शेती मशागत, वृक्षतोड यामुळे होते. ते आपण सविस्तर खाली पाहू .

हवामानामुळे होणारी जमिनीची धूप

हवामानाच्या घटकांमध्ये तापमान, वारा व पाऊस यामुळे जमिनीची धूप होते. उष्ण तापमानातील फरकामुळे जमिनीचे आकुंचन आणि प्रसरण होऊन मातीचे कण एकमेकांपासून विलग होतात. जोरात वेगाच्या वाऱ्यामुळे भूपृष्ठाची होणाऱ्या घर्षणाने आणि वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत वाहून नेले जातात.

मनुष्य व प्राण्यांमुळे होणारी जमिनीची धूप

मनुष्य आणि प्राणी हे सतत जमिनीचा वापर करत असतात. जनावरे, पुर आणि माणसांच्या जमिनीवरील हालचालीमुळे जमिनीची झीज होत असते. तसेच मातीचे कण विस्कळीत होऊन त्यांच्या पाया सोबत वाहून नेले जात असतात.

भूरचनेमुळे होणारी मातीची धूप

जमिनीचा उतारा मुळे वाहणाऱ्या पाण्याला गती मिळते आणि ही गती सतत वाढत असते. त्यामुळे निर्माण होणार्‍या ऊर्जेमुळे देखील जमिनीच्या पृष्ठभागाची झीज होत असते.

शेती मशागत

शेती मशागतीमुळे देखील जमिनीच्या पृष्ठभागावरील मातीची उलथापालथ होते आणि माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यास चालना मिळते.

वृक्षतोड

भूपृष्ठावरील वनस्पती मुळे जमिनीच्या भूपृष्ठावर एक प्रकारचे आवरण म्हणजेच कवच तयार होत असते. त्यामुळे पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आघाताची तीव्रता त्यामध्ये शोषली जाते. परंतु जर हे वृक्षतोड केल्यामुळे हे आवरण नष्ट होऊन जमिनीच्या धूपेला चालना मिळते. त्यामुळे झाडांच्या आच्छादनामुळे अन्य प्रकारे सुद्धा धुपेस प्रतिबंध होत असतो. जमिनीच्या मुळांना मातीचे कण घट्ट धरून ठेवले जातात. त्यामुळे सहजासहजी मातीची धूप होऊ शकत नाही. दुसरे म्हणजे जमिनीत सूक्ष्म जीव निर्माण होतात. ते लहान नलिका जमिनीमध्ये तयार करत असतात. त्यामुळे जमिनीत पाणी शोषले जाते आणि भूपृष्ठावरील पाणलोट कमी होतो. यामुळे धुपेला काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होते.

जमिनीचा धुपेचे परिणाम (Effects of Soil Erosion in Marathi)

जमिनीची धूप मातीचा नाश करते. रेती, दगड-गोटे इत्यादींचा साठा, पाण्याची टंचाई, पुराच्या समस्या, जमिनीचे विभाजन हे धुपे चे परिणाम आहेत.

मातीचा नाश

जमिनीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या स्तरांमध्ये पिकांना पोषक अशी अन्नद्रव्ये यांचा साठा असतो. जर हा वरचा स्तर मातीचा धुपेमुळे वाहून गेला, तर जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता कमी होते आणि त्याचा विपरीत परिणाम शेतीच्या उत्पादनावर होतो.

रेती दगड-गोटे इत्यादींचा साठा

जमिनीच्या वरच्या भागातील किंवा डोंगर उतारावरील धूप होऊन त्यातील मुरूम, दगड, गोटे, रेती, इत्यादी प्रवाहासोबत वाहत नेले जाऊन सखल भागातील सुपीक जमिनीवर पसरतात व या सुपीक जमिनी निकामी होतात.

पाण्याची टंचाई

जमिनीची धूप झाल्याने पाण्याबरोबरच माती, गोटे इत्यादी वाहत येऊन तो धरणाच्या जलाशयात साठवले जातात. त्यामुळे पाणी साठवण्याची किंवा पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. याचे कारण कालांतराने पाण्याची टंचाई निर्माण होते आणि पाण्याचे जलाशय धरणे, कालवे यांच्या बांधकामाचे आयुष्य कमी होते.

पुराच्या समस्या

धुपेमुळे वाहून जाणारी माती पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात साठवून त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्यामधील लहान कण पावसाचे पाणी जर वाढले, तर ते अशा प्रवाहातून पूर्णपणे वाहून जाऊ शकत नाहीत आणि ते आजूबाजूच्या प्रदेशात पसरून तेथे पूर येतात. यामुळे जीवित आणि वित्त मालमत्तेची हानी होते.

जमिनीचे विभाजन

जमिनीच्या धूप झाल्यामुळे जमिनीमध्ये घळी निर्माण होतात. त्यामुळे जमिनीचे लहान लहान तुकडे पडतात. अशा जमिनीमध्ये मशागत करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. अशा जमिनीत रस्ते, इमारती, पूल इत्यादी बांधकामांना सुद्धा धोका निर्माण होतो.

7/12 Online Maharashtra: ऑनलाइन गाव नमुना नंबर, सातबारा व ८- अ पाहणे

जमिनीच्या धुपेचे नियंत्रण (Soil Erosion can be prevented by)

जमिनीची धूप रोखण्यासाठी सर्व उपायांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे

  • धूप प्रतिबंधक कृषि मशागत पध्दत
  • धुप प्रतिबंधक यांत्रिकी उपाय योजना
  • जैविक उपचार

धुपेचे नियंत्रण करण्यासाठी धूप प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. धूप प्रतिबंधक उपाययोजना करताना खालील घटकांचा विचार करावा लागेल.

  • जमिनीच्या पृष्ठभागावरुन वाहणा-या पाण्याची गती न धूप होवू देणा-या गतीपर्यन्त मर्यादित ठेवणे. साधारणपणे पाण्याचा वेग 1 मीटर प्रती सेकंदपेक्षा कमी असल्यास जमिनीची धूप होत नाही. जमिनीच्या भूपृष्ठावरुन वाहणा-या पाण्याची गती जमिनीच्या उताराबरोबर अधिक वाढत जाते. यासाठी ज्या ठिकाणी पाण्याला गती प्राप्त होते. अशा ठिकाणी हे पाणी अडवून जमिनीत मुरविणे अथवा संथ गतीने बाहेर काढून देणे यासाठी उपाययोजना कराने गरजेचे आहे.
  • जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरविले जाईल किंवा शोषले जाईल. तसेच भूपृष्ठावरुन वाहणा-या पाण्याचे प्रमाण कमी होईल अशी व्यवस्था करणे.
  • वाहत येणाऱ्या पाण्याबरोबर वाहत येणा-या गाळाचे स्थापन करून आणण्याची व्यवस्था करणे.
  • जमिनीत माती, पाणी व ओलावा धरुन ठेवतील. ज्यामुळे मातीचे कण एकमेकांशी निगडित राहून धुपेस प्रतिबंध करता येईल अशी व्यवस्था तयार करणे.
  • वरील घटकांच्या वेगवेगळया धुप प्रतिबंध उपायांच्या योजना करता येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top