पोकरा योजना महाराष्ट्र (Pokhara Yojana Maharashtra): नमस्कार मित्रांनो, आज आपण पोखरा योजना विषयी माहिती पाहणार आहोत.ही योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या नावानेही ओळखली जाते. या लेखामध्ये आपण पोखरा योजना Online फॉर्म, पोखरा योजना यादी, तसेच पोखरा योजना माहिती PDF संबंधित संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून लाभ घेऊ इच्छित असाल, तर हा लेख संपूर्ण वाचा. चला तर मित्रांनो पाहुयात, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने मध्ये कोणकोणत्या अनुदान योजनांचा समावेश आहे.
Table of Contents
Pokhara Yojana Maharashtra
1. पोखरा अंतर्गत विहीर पुनर्भरण योजना
राज्यात सद्यस्थितीत पाण्याची टंचाई पाहता आणि शेतकऱ्यांकडे पिकास संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या विहिरींद्वारे पाण्याची उपलब्धता करून देण्याच्या अनुषंगाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्पांतर्गत विहीर पुनर्भरण योजना राबविण्यात आलेली आहे. ही योजना जागतिक अर्थ जागतिक बँक अर्थसहाय्यित आहे.
या योजनेचे उद्दिष्ट हे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सक्षम बनवणे हे आहे. या योजनेचा लाभ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यामुळे विहिरीच्या भूजलाच्या स्थितीत वाढ होणे शक्य होईल आणि लोकांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा सुधारेल.
Pokhara Yojana Village List: पहा तुमचे गाव पोखरा योजनेत आहे का !
2. पोखरा अंतर्गत मधुमक्षिका पालन अनुदान योजना
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मधुमक्षिका पालन अनुदान योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समाविष्ट असणाऱ्या गाव समूहांना मधुमक्षिका पालन अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मधील समाविष्ट असलेल्या गावातील भूमिहीन व्यक्ती किंवा शेतकऱ्यांना देण्यात येईल. या अनुदान योजनेअंतर्गत ग्रामीण भागात मधुमक्षिका पालन करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. याअनुषंगाने ग्रामीण भागात देखील एक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय स्त्रोत तयार करून देणे हे या अनुदानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
3. पोखरा अंतर्गत सामुदायिक शेततळे अनुदान योजना
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सामुदायिक शेततळ्यासाठी शंभरटक्के अनुदान देण्यात येत आहे.सदर अनुदान कृषी संजीवनी समितीने मान्य केलेल्या शेतकरी समूहांना दिले जाणार आहे. या शेतकऱ्यांमध्ये दोन किंवा अधिक शेतकरी असणार आहेत. लाभार्थी समूहाकडे जेवढे क्षेत्र असेल तेवढ्या क्षमतेचे सामुदायिकशेततळ्याचा लाभ त्या संबंधित समूहाला घेता येणार आहे.
सामुदायिक शेत तळ्याच्या लाभ घेण्यासाठी अर्ज करणारे शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावे. ते वेगवेगळ्या कुटुंबातील असणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे जमीन धारणे बाबत उतारे देखील वेगवेगळे असणे आवश्यक आहेत.
4. पोखरा अंतर्गत हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक टनेल अनुदान योजना
फलोत्पादन क्षेत्रांमध्ये राज्यात शेती पद्धतीचा अवलंब केल्याने उच्च दर्जाचे उत्पादन घेणे शेतकऱ्याला नफा मिळवून देणारे ठरू शकते. या गोष्टीचा विचार करता, शेडनेट हाऊस किंवा हरित गृह यांच्या वापरामुळे भाजीपाला, फळे, फुले इत्यादी उत्तम गुणवत्ता पूर्ण पिकांचे उत्पादन हे कमी क्षेत्रात घेऊन अधिक नफा मिळवला जाऊ शकतो. त्यासाठी शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक टनेल इत्यादी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून रोपवाटिका तयार केल्या जाऊ शकतात आणि शेतकऱ्याला कमीत कमी क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण व अधिक उत्पन्न घेऊन ननफा मिळवून देणे. हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अशाच उच्च प्रतीचा निर्यातक्षम आणि उच्च दर्जाच्या पिकांच्या लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य करण्यात आलेले आहे.
5. पोखरा अंतर्गत गांडूळखत, नाडेप, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट याकरिता अनुदान योजना
शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतिजन्य पदार्थापासून सेंद्रिय खत निर्माण करणे. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस आणि जलधारणा शक्ती वाढवून उत्पादनात देखील चांगली वाढ होऊ शकते. या योजनेचे उद्दिष्ट हे कमी खर्चामध्ये उत्पादनात वाढ करणे. तसेच शेत जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवणे आणि पौष्टिक अन्नधान्याचे उत्पन्न करणे हे आहे.
या अनुषंगाने जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत गांडूळ खत, नाडेप, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट अनुदान योजना राबवली जाते जात आहे.
6. पोखरा अंतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचन अनुदान योजना
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यामध्ये राज्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्र वाढवून कृषी फलोत्पादन पिकांचा विकास करण्यासाठी चालना दिली जात आहे. यामुळे जल वापर कार्यक्षमतेमध्ये वाढ देखील होईल. या अनुषंगाने जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचन अनुदान योजना राबवली जाते जात आहे.
7. पोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य पालन अनुदान योजना
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मध्ये सामाविष्ट केल्या गेलेल्या गाव समूहातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच शेतीसोबत जोडधंदा म्हणून गोड्या पाण्यातील मत्स्य पालन केल्याने शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यात देखील मदत होईल. नैसर्गिक साधनांचा प्रत्यक्ष उत्पादनासाठी कार्यक्षमतेने वापर करून शेतकऱ्यांचे रोजगार वाढवणे शक्य होईल हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या गोड्या पाण्यातील मत्स्य पालन अनुदान योजनेचे उद्दिष्ट आहे.
8. पोखरा अंतर्गत शेतकरी, उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी / शेतकरी उत्पादक संघ / शेतकरी / महिला / भूमीहीन व्यक्तींचे इच्छूक गट / बचत गट यांच्या व्यवसायिक प्रस्तावांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यामध्ये खालील प्रकल्प उभारण्यास पोखरांतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- भाडे तत्वावर कृषी औजारे सेवा केंद्र(CHC)
- कृषी उत्पादनाचे संकलन केंद्र/एकात्मिक पैक हाऊस
- पैक हाऊस
- गोदाम बांधकाम व छोटे वेअर हाऊस
- फळ पिकवणी केंद्र
- शीतगृह
- भाजीपाला/फळ प्रक्रिया केंद्र
- धान्य प्रक्रिया यूनिट(स्वच्छता/प्रतवारी यूनिट सह)
- अन्न प्रक्रिया यूनिट
- औषधी/सुगंधी वनस्पती प्रक्रिया यूनिट
- हळद प्रक्रिया यूनिट
- मसाले यूनिट
- दुध प्रक्रिया यूनिट
- कडधान्य मिल( दाल मिल)
- तेल गाळप यूनिट
- निंबोळी अर्क यूनिट
- रेफ्रिजरेटेड व्हँन किंवा भाजीपाला/फळे वाहतुकीसाठी वाहन/वाहन
- मार्केट आउटलेट(वातानुकूलित/कृषी मॉल)
- व्हेंडिंग कार्ट
- मूरघास यूनिट
- मधुमक्षिका पालन यूनिट
- शेळी पैदास केंद्र
- कांदा चाळ
- कृषी उत्पादनांचे विपणनास सहाय्य
- कृषी इनपुट सेल (बियाणे,खते आणि किटकनाशके इ.)
- इतर कृषी व्यवसाय
- बियाणे प्रक्रिया उपकरणे
- बियाणे प्रक्रिया शेड/सुकवणी यार्ड
- बियाण्यांची साठवण/गोदाम
- संपुर्ण बीजप्रक्रिया यूनिट(संयंत्रे, गोडावुन/शेड सह)
https://dbt.mahapocra.gov.in वर ऑनलाईन अर्ज करावा.
- पोखरा योजना GR 2024: 265 कोटी नानाजी देशमुख कृषी संजीवनीसाठी वितरित
- MahaDBT farmer Registration 2024 | महाडीबीटी पोर्टल रजिस्ट्रेशन
- प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना 2024 माहिती मराठी: फॉर्म, कागदपत्रे, अर्ज, फायदे
- ग्रामपंचायत योजना महाराष्ट्र 2024 । मनरेगा ग्रामपंचायत योजना
- 800+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | List of Marathi Mhani With PDF
HI
Sprinkler Online Application