Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP योजने संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा व कुठे करावा,ठळक वैशिष्ट्ये पात्रता,अटी सहयोगी संस्था, योजनेची अंमलबजावणी कशी केली जाते, इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.
Table of Contents
CMEGP Maharashtra Marathi
राज्यातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या आणि उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत आहे.त्यामुळे स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नवनवीन संधी विचारात घेऊन, उद्योजकतेला चालना देणारी सर्वसमावेशक योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने १ ऑगस्ट २०१९ रोजी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली.
सद्यस्थितीत शेतीमध्ये कार्यरत असलेल्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच PMEGP या केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार प्रोत्साहन योजनेचे मर्यादित उद्दिष्ट आहे. होतकरू युवक-युवतींचे स्वयंरोजगार उभारणीसाठी प्राप्त होणारे मोठ्या प्रमाणातील प्रस्ताव विचारात घेणे. तसेच राज्याची नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूतक्षमता विचारात घेऊन राज्याची महत्त्वाकांक्षी अशी स्वतंत्र मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (Chief Minister Employment Generation Scheme) सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षापासून राज्यात कार्यान्वित करण्यासाठी शासनाच्या नवीन औद्योगिक धोरण २०१९ मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र CMEGP योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातुन सुलभतेने स्थापित करणे.
- तसेच पुढील ५ वर्षात सुमारे १ लाख सूक्ष्म लघु उपक्रम स्थापित करणे आणि त्या माध्यमातून एकूण १ रोजगार संधी राज्यांमध्ये उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- प्रथम वर्ष २०१९-२०२२ साठी एकूण १०,००० लाभार्थी घटक हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
उद्दिष्टांसाठी संदर्भ
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्हानिहाय मागील ३ वर्षातील उपलब्धी विचारात घेऊन त्यानुसार समप्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागासाठी जिल्हा निहाय उद्दिष्ट उद्योग संचालक संचालनालयाकडून निश्चित करण्यात येणार आहे.
योजना स्तर
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, सीएम राज्यस्तरीय योजना तसेच कार्यक्रमाअंतर्गत म्हणून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
राज्य स्तरावर उद्योग विभागाच्या अधिपत्त्याखालील उद्योग संस्थालनालय, मुंबई योजनेचे प्रमुख अंमलबजावणी संस्था म्हणून कार्यवाही करतील
Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra योजनेअंतर्गत पात्र घटक
- कायदेशीररित्या पात्र असणारे उत्पादन सेवा उद्योग
- कृषी पूरक व्यवसाय
- कृषीवर आधारित उद्योग
- वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय
- एकाच नाम मुद्रेवर (ब्रँड आधारित संघटित साखळी)
- विक्री केंद्रे
- फिरते विक्री केंद्र किंवा खाद्यान्न केंद्र इत्यादी घटक क्रमांक कार्यक्रमाअंतर्गत पात्र असतील. याविषयी गठीत राज्यस्तरीय संयंत्रात समिती आवश्यकतेनुसार पात्र आणि अपात्र घटकांची यादी जाहीर करेल.
Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra लाभार्थी पात्रता
कार्यक्रमाअंतर्गत पात्रतेसाठी खालील प्रमाणे अटी राहतील.
वयोमर्यादा
- कुठलेही स्थायी उत्पन्न असलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण असेल.
- जास्तीत जास्त वयोमर्यादा ४५ वर्ष असेल.
- त्यामध्ये अनुसूचित जाती/जमाती/महिला/अपंग/ माजी सैनिक यांच्यासाठी पाच वर्ष शिथिल
पात्र मालकी घटक
वरील पात्रता धारण करणारे वैयक्तिक मालकी भागीदार वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट या कार्यक्रमा अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असतील
CMEGP शैक्षणिक पात्रता
- रुपये १० लाखावरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- रुपये २५ लाखावरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल कुटुंब म्हणजे पती-पत्नी.
- अर्जदार व्यक्तीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEGP किंवा तत्सम केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य विभागाकडील किंवा महामंडळाकडील अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र प्रकल्पाची किंमत
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांमध्ये पात्र उद्योग किंवा व्यवसायात अंतर्गत प्रकल्प किंमत कमाल मर्यादा सेवा उद्योग तसेच कृषीपूरक उद्योग किंवा व्यवसाय यांसाठी रुपये १० लाख असेल.
- तसेच उत्पादन प्रकारच्या प्रवर्गातील प्रकल्पासाठी प्रकल्प किंमत मर्यादा रुपये ५० लाख एवढी राहील.
मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र प्रकल्प खर्चाचे वर्गीकरण
रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत प्रकल्प उभारणीचा खर्च वर्गीकरण पुढील प्रमाणे असेल.
- बँक कर्ज ६०% ते ७५%, अर्जदाराचे स्वभांडवल ५% ते १०%, शासनाचे आर्थिक सहाय्य अनुदान स्वरूपात मार्जिन मनी १५% ते ३५%, प्रवर्ग निहाय व संवर्गनिहाय बँक कर्ज अनुदान मार्जिन मनी व घटकांचे स्वगुंतवणूकीचे प्रमाण राहील.
- सेवा उद्योग आणि कृषीपूरक उपक्रमांसाठी व उत्पादन प्रकारातील उपक्रमांसाठी प्रकल्प किमती अंतर्गत इमारत खर्च २०% च्या मर्यादित असेल. त्याच प्रमाणे खेळते भांडवल प्रकल्प खर्चाच्या ३०% मर्यादेत असेल.
योजनेअंतर्गत उद्दिष्ट आणि तरतूद
- या कार्यक्रमाद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
- कार्यक्रम कालावधी पुढील ५ वर्ष एकूण १ लाख घटक स्थापित करण्याचे आहे.
- आणि सुरुवातीचे वर्ष म्हणजेच २०१९-२०२२ साठी एकूण १०,००० घटक लाभार्थ्याचे उद्दिष्ट असेल.
- एकूण उद्दिष्टाच्या ३०% उद्दिष्ट महिला प्रवर्गासाठी आणि २०% उद्दिष्ट अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
- यासाठी शासनाने संबंधित विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्याकडून उद्दिष्टांच्या प्रमाणात तरतूद उद्योग विभागास उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- उर्वरित तरतूद शासनाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करण्यात येईल.
मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र प्रशिक्षण संस्था आणि प्रशिक्षण कालावधी
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या उत्कृष्ट उपलब्धीसाठी कर्ज मंजूर झालेल्या उमेदवारांसाठी निवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राज्यात उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम देणाऱ्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र किंवा राज्यातील नामवंत संस्थांच्या सहयोगाने आयोजित करण्यात येईल.
- हे प्रशिक्षण उत्पादन प्रवर्गातील उद्योग घटकासाठी २ आठवडे मुदतीचे आणि सेवा व कृषिपूरक उद्योगासाठी १ आठवडे मुदतीचे असेल.
CMEGP Documents List आवश्यक अपलोड करावयाची कागदपत्रे
सर्व कागदपत्रांची फाईल साईज ३०० केबी च्याआत असणे गरजेचे आहे.
- फोटो
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- पॅनकार्ड
- मार्कशीट किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र
- विशेष प्रमाणपत्र
- अंडरटेकिंग फॉर्म
- प्रकल्प अहवाल
- इतर दस्तावेज त्यामध्ये तांत्रिक अनुभवी परवाना अपलोड
CMEGP Online Form अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला चीफ मिनिस्टर एम्पलोयमेंत गनरेशन प्रोग्रम च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल.
- फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खालील लिंक वर क्लिक करावे लागेल.
- CMEGP Online Form
- आत्ता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.
- त्या फॉर्म मध्ये तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल.
- माहिती भरून झाल्यावर तुम्हाला सेव्ह बटनावर क्लिक करावे लागेल.
बांधकाम कामगार योजना: फायदे, अर्ज, लाभ, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती
ऑनलाइन CMEGP अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे
आधार कार्ड क्रमांक :
अर्जदाराचा १२ अंकी आधार क्रमांक भरावा.
अर्जदाराचे नाव :
(i) यादीतून नावाचा उपसर्ग निवडा, (ii) अर्जदाराने त्याचे नाव आधार कार्डमध्ये जसे दिसते तसे भरावे. प्रविष्ट केलेल्या नावात काही जुळत नसल्यास, अर्जदार पुढे फॉर्म भरू शकणार नाही.
प्रायोजक एजन्सी :
एजन्सी निवडा (DIC, KVIB) ज्यामध्ये तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे.
जिल्हा :
यादीतून जिल्हा निवडा
अर्जदाराचा प्रकार:
हा फॉर्म वैयक्तिक अर्जदाराशी संबंधित आहे.
लिंग :
लिंग निवडा (म्हणजे पुरुष, स्त्री, ट्रान्सजेंडर)
श्रेणी :
यादीतून अर्जदाराची सामाजिक श्रेणी निवडा (म्हणजे सामान्य, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती)
विशेष श्रेणी :
यादीतून विशेष श्रेणी निवडा (म्हणजे माजी सैनिक, शारीरिकदृष्ट्या आव्हानित)
जन्मतारीख:
(i) जन्मतारीख (mm-dd-yyyy) उदा 12-15-1991 च्या फॉरमॅटमध्ये भरणे आवश्यक आहे.
(ii) वय :
वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे (SC/ST/महिला/विशेष श्रेणीसाठी 5 वर्षे सूट).
पात्रता :
यादीतून पात्रता निवडा (म्हणजे 8वी, 8वी पास, 10वी उत्तीर्ण, डिप्लोमा, 12वी उत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर, PHD)
संपर्कासाठी पत्ता:
अर्जदाराने तालुका, जिल्हा, पिन कोड, मोबाईल क्रमांक, ईमेल आणि पॅन क्रमांकासह अर्जदाराचा संपूर्ण पोस्टल पत्ता भरावा.
युनिट स्थान :
युनिट स्थान निवडा (म्हणजे ग्रामीण किंवा शहरी)
प्रस्तावित युनिट पत्ता :
अर्जदाराने तालुका, जिल्हा, पिन कोड यासह युनिटचा संपूर्ण युनिट पत्ता भरला पाहिजे ( प्रस्तावित युनिट पत्ता आणि संपर्क पत्ता समान असल्यास कृपया “संवाद पत्त्याप्रमाणेच” चेक बॉक्सवर क्लिक करा)
क्रियाकलापाचा प्रकार :
क्रियाकलाप सूचीमधून निवडा (म्हणजे सेवा किंवा उत्पादन)
उद्योग/क्रियाकलाप नाव :
(i) उद्योग: उद्योगाच्या सूचीमधून उद्योग निवडा
(ii) उत्पादनाचे वर्णन: विशिष्ट उत्पादनाचे वर्णन टाइप करा.
EDP प्रशिक्षण पूर्ण झाले :
सूचीमधून होय किंवा नाही निवडा.
प्रशिक्षण संस्थेचे नाव :
ईडीपी प्रशिक्षण पूर्ण झाल्यास, प्रशिक्षण संस्थेचे नाव (MCED किंवा इतर) निवडा.
कर्ज आवश्यक:
(i) भांडवली खर्च (CE): तपशीलवार प्रकल्प अहवालात प्रस्तावित केल्यानुसार CE कर्ज रुपयांमध्ये प्रविष्ट करा.
(ii) कार्यरत भांडवल (WC): तपशीलवार प्रकल्प अहवालात प्रस्तावित केल्यानुसार WC कर्ज रुपयांमध्ये प्रविष्ट करा.
पसंतीची बँक:
(i) पसंतीची बँक निवडा
(ii) निवडलेल्या बँकेची शाखा निवडा, बँक IFSC कोड आणि इतर तपशील अर्जावर प्रदर्शित केले जातील.
पर्यायी बँक :
(i) पर्यायी बँक निवडा
(ii) निवडलेल्या बँकेची शाखा निवडा, बँक IFSC कोड अर्जावर प्रदर्शित होईल
योग्य फील्डमध्ये सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर तपशील सेव्ह करण्यासाठी “सेव्ह” बटणावर क्लिक करा.
Karj Mafi Maharashtra | महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना यादी
Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra नोडल संस्था प्रमुख अंमलबजावणी संस्था
रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणीसाठी प्रमुख अंमलबजावणी संस्था नोडल संस्था म्हणून उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, मुंबई असेल.
कार्यक्रम अंमलबजावणी संस्था
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कार्यक्रम अंमलबजावणी संस्था म्हणून उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालयाच्या अंतर्गत कार्यरत जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या अंतर्गत कार्यरत जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय कार्यक्रम अंमलबजावणी संस्था म्हणून कामकाज करतील.
- ग्रामीण भागासाठी २०,००० लोकसंख्येच्या आतील क्षेत्रासाठी/गावासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ व उर्वरित भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र हे कार्यक्रम अंमलबजावणी संस्था म्हणून कामकाज करतील.
Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra सहयोगी संस्था
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत बँक
- नोडल बँक
- उद्योजकीय प्रशिक्षण संस्था
- ऑनलाईन प्रक्रियेसाठी सहाय्यभूत संस्था
- अंमलबजावणी संस्था
- केंद्र शासनाच्या संस्था त्यांचे साहाय्य घेण्यात येईल. विविध संस्थांचा तपशील व कामकाज केले जाईल.
वित्तीय संस्था बँक
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यबल समितीच्या मंजुरीने संबंधित बँकाकडे कर्ज मंजुरीसाठी शिफारस करण्यात येतील.
- सहकारी बँका तसेच खाजगी क्षेत्रातील (CMEGP Bank List ) – शेड्युल्ड बँका त्यामध्ये यस बँक(Yes Bank), एचडीएफसी बँक(HDFC Bank), आयसीआयसीआय बँक(ICICI Bank) प्रमुख बँका इत्यादी प्रमुख सहयोगी संस्था म्हणून कार्यरत राहतील.
- सदर बँकांमार्फत जिल्हा कार्यबल समितीकडून शिफारस करण्यात आलेल्या कर्ज प्रस्तावांवर कार्यक्रमाचे निकष विचारात घेऊन कर्ज मंजुरी बाबत निर्णय घेण्यात येईल.
- कर्जमंजुरी निश्चित केलेल्या प्रकल्प किमतीच्या अनुषंगाने कार्यक्रमातील तरतुदीप्रमाणे राज्य शासनाचे अनुदान मार्जिन मनी दावे क्लेम संबंधित बँक शाखा सादर करेल.
- सादर क्लीनचिट आवश्यक तपासणी करून उद्योग संचालनालयात अंतर्गत विशेष CMEGP कक्षामार्फत राज्य शासनाचे अनुदान संबंधित बँक शाखेला नोडेल बँकेच्या द्वारे जमा होईल.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची सुलभ अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनाने कर्ज प्रस्ताव असून, अनुदान वितरण पर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
- यासाठी उद्योग संचालनालय याच्या संयंत्रनाखाली महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या संस्थेच्या सहयोगानेच्या सहयोगातून उद्योग संचालनालय अंतर्गत विशेष आयटी व समन्वय कक्ष स्थापन करण्यात येईल.
- सदर कक्षामार्फत या योजनेच्या पोर्टल निर्माण देखरेख व दुरुस्ती, डाटाबेस व सादरीकरण, मार्जिन मनी, दावे व त्या संबंधित ताळमेळ राज्यातील सर्व बँक शाखा व नोडल बँक अंमलबजावणी संस्था यांच्यामध्ये समन्वय वेळोवेळी विषय प्रगती अहवाल व आढावा सनियंत्रण समितीने सादर करणे. इत्यादी कामकाज करीत सदर खर्च योजनेअंतर्गत उपलब्ध तरतुदीच्या अंतर्गत प्रशासकीय कारणासाठी राखून ठेवण्यात येणाऱ्या एकूण तरतुदीच्या २% प्रमाणे करण्यात येईल.
महाराष्ट्र घरकुल योजना संपूर्ण माहिती | रमाई आवास योजना
मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र अर्ज प्रक्रिया व प्रकल्प मंजुरी अंतर्गत कार्यवाही
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या सुलभ अंमलबजावणीसाठी संपूर्ण प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे.
- यासाठी स्वतंत्र CMEGP Portal पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे आणि त्या पोर्टल द्वारे अर्ज मागणी प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रात किंवा खादी व ग्रामोद्योग मंडळ संस्थेस सादर करण्यात येतील.
- महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय उपसमिती मार्फत अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल.
- आणि या पात्र उमेदवारांना नियंत्रित करण्यात येऊन त्याद्वारे प्राथमिक निवड यादी जिल्हा उपसमिती मार्फत तयार करण्यात येईल.
- सदर प्राथमिक यादी जिल्हास्तरीय कार्यबल समितीद्वारे अंतिम करण्यात येईल.
- सदर जिल्हा कार्यबल समितीद्वारे अंतिम मंजुरी देण्यात आलेल्या कर्ज प्रस्तावांची शिफारस पुढील मंजुरीसाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडून संबंधित बँकास सादर करण्यात येईल.
- ऑनलाइन द्वारा शिफारस करण्यात आलेल्या प्रस्तावांची बँक सरावर प्रकल्पाची व्यवहार्यता अनुषंगिक बाबी तपासून बँक कर्ज मंजुरी बाबतचा निर्णय घेईल. प्रस्तावास कर्ज मंजुरी असल्यास मंजुरी संबंधित तपशील ऑनलाइन द्वारे बँकेमार्फत महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांना सादर करण्यात येईल.
- अर्ज प्रक्रिया तपासणी समुपदेशन बँकेत कर्ज प्रस्तावाची शिफारस कर्ज मंजुरी या सर्व प्रक्रिया जिल्हास्तरावर पूर्ण होतील.
- महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र हे बँकांनी मंजूर केलेल्या तपशील यथायोग्य असल्याचे खात्री करून राज्यस्तरीय CMEGP यांना कर्ज वितरण आणि अनुदान वितरणासाठी प्रस्ताव सादर करतील.
- सीएम कडून प्रस्तावाची तपासणी होऊन मॉडल बँकेच्या मार्फत राज्य शासनाचे मार्जिन मनी अनुदान रक्कम संबंधित बँकांना वितरित करण्यात येईल.
- मार्जिन मनी रक्कम ही बँक शाखा द्वारे २ वर्ष कालावधीसाठी संबंधित कर्ज खात्याच्या नावे डिपॉझिट करेल.
- ३ वर्ष कालावधीनंतर जिल्हा समितीच्या मान्यतेने राज्य शासनाचे मार्जिन मनी अनुदान संबंधित कर्ज खात्यावर जमा होईल.
- नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना 2024 लागू महाराष्ट्र शासन GR
- महा-एग्रीटेक प्रकल्प: 30 कोटी 38 लाख किमतीसह 2022-23 ते 2024-25 मुदतवाढ
- कुसुम सोलार पंप योजना पेमेंट भरण्यासाठी मुदत वाढली !! ही आहे शेवटची तारीख
- सोयाबीन लागवड तंत्रज्ञान: जाती, वाण, खत, औषधे, फवारणी वेळापत्रक संपूर्ण माहिती
- अर्ज सुरू प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र 2024: Online Form, कागदपत्रे