Maji Kanya Bhagyashri Yojana Maharashtra Marathi Mahiti : नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र बद्दल संपूर्ण माहिती आहोत. त्यामध्ये आपण काय आहे माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र, त्याचे फायदे, लाभ, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा इत्यादी संपूर्ण माहिती आज या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख नक्की वाचा.
Table of Contents
माझी भाग्यश्री कन्या योजना
महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2016 रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी सुरू केली . माझी भाग्यश्री कन्या योजना अंतर्गत , मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत पालकांना नसबंदी करणे आवश्यक आहे आणि दुसरी मुलगी जन्मल्यानंतर 6 महिन्यांच्या आत नसबंदी करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत, पूर्वी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत होते ते या योअंजनेसाठी पात्र होते. नवीन धोरणानुसार या योजनेंतर्गत मुलींचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये आहे ते देखील या योजनेसाठी अर्ज करावयाला पात्र असतील. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकाच व्यक्तीच्या दोन मुलींनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
MKBY चे उद्दिष्ट
या MKBY च्या माध्यमातून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे आणि राज्यातील लोकांची नकारात्मक विचारसरणी बदलून मुलींचे भविष्य उज्वल बनावे यासाठी हि योजना सुरु करण्यात आलेली आहे. मुलींना ओझं मानणारे आणि मुलींना जास्त शिक्षण घेऊ न देणारे अनेक लोक आहेत. या समस्या वर विचार करून, महाराष्ट्र राज्य सरकारने माझी भाग्यश्री कन्या योजना सुरू केली आहे. ज्यामुळे राज्यातील मुलींचे प्रमाण सुधारेल, लिंग निर्धारण आणि स्त्री भ्रूणहत्या थांबेल यासाठी ही योजना सुरु केलेली आहे.
MKBY Highlights
| योजनेचे नाव | माझी कन्या भाग्यश्री योजना |
| कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकारने |
| कधीपासून सुरु | 1 एप्रिल 2016 |
| लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील मुलगी |
| उद्दिष्ट्य | लिंग निर्धारण आणि स्त्री भ्रूणहत्या थांबवणे. |
महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना फायदे
जर मुलीचे 18 वर्षे पूर्ण जाळे असतील, तर ती मुलगी पूर्ण रक्कम मिळवण्यास पात्र असेल. महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजनाचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी किमान 10 वी उत्तीर्ण झालेली आणि अविवाहित असाणे आवश्यक आहे. राज्यातील ज्या पालकांना या योजनेंतर्गत पात्र व्हायचे आहे, त्यांना अर्ज करावा लागेल.या योजनेत मुलीला व्याजाचे पैसे मिळणार नाहीत. पहिली मुलगी 6 वर्षांची आणि दुसरी मुलगी 12 वर्षांची झाल्यावर व्याजाचे पैसे पात्र कुटुंबाला मिळतील.
खात्यातच राज्य सरकारकडून वेळोवेळी मुलीच्या नावे असलेल्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केली जाईल. या योजनेअंतर्गत मुलीच्या किंवा तिच्या आईच्या नावाने बँकेत खाते उघडले जाईल.
जननी सुरक्षा योजना | Janani Suraksha Yojana in Marathi
महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना चे लाभ कोणते?
- या योजनेअंतर्गत , राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
- या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन (नसबंदी) केली तर 50 हजार रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत.
- जर 2 मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले. तेव्हा सरकारकडून दोन्ही मुलींना प्रत्येकी 25-25 हजार रुपये दिले जातील.
- महाराष्ट्रातील अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये केली आहे.
- या योजनेनुसार, मुलींच्या पालकांना एका मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा दुसरी मुलगी जन्मल्यानंतर 6 महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधनकारक असेल.
- माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावे नॅशनल बँकेत संयुक्त खाते उघडले जाईल. ज्यामध्ये दोघांना एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जाईल.
पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील, तर त्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो .
- या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना दिला जाईल.
- जर तिसरे अपत्य जन्माला आले, तर आधीच जन्मलेल्या दोन्ही मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
माझी भाग्यश्री कन्या योजना कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- निवास प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
माझी कन्या भाग्यश्री योजना साठी अर्ज कसा व कुठे करावा?
- राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या MKBY अंतर्गत अर्ज करायचा आहे , त्यांना महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज PDF मिळवावा लागेल .
- अर्ज मिळवल्या नंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. त्यामध्ये नाव, पत्ता, पालकांचे नाव, मुलीची जन्मतारीख, मोबाइल नंबर इ. सर्व माहिती भरावी लागेल.
- माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तो फॉर्म आवश्यक कागद्परित्रांसोबत जोडून घ्यावा लागेल.
- तो फॉर्म तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमचा अर्ज माझी कन्या भाग्यश्री योजना मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण होईल.
- मिरची लागवड माहिती । Mirchi Lagwad Mahiti in Marathi
- Online Apply प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023: अर्ज कुठे, कागदपत्रे, पात्रता, लाभ
- बचत गट कर्ज व्याज परतावा योजना: Online अर्ज, कागदपत्रे, बँक, व्याजदर
- 5 लाखांपर्यंतची 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना: Online अर्ज, कागदपत्रे, बँका
- 10 लाखांपर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: Online अर्ज, कागदपत्रे, अनुदान
