Mahadbt Farmer Scheme List in Marathi (maha dbt shetkari yojana): नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाडीबीटी पोर्टल वरती राबवल्या जाणाऱ्या Shetkari Yojana Maharashtra 2023 ची माहिती या लेखात पाहणार आहोत. चला तर मित्रांनो पाहुयात, महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या अनुदान योजना राबवल्या जात आहेत. तसेच महाडीबीटी शेतकरी योजना 2023 अंतर्गत कोणत्या घटकांसाठी अनुदान देय आहे. मित्रांनो तुम्हाला या शेतकरी अनुदान योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Table of Contents
Mahadbt Farmer Scheme List
1. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन या सूक्ष्म सिंचन घटकांसाठी अनुदान दिले जाणार आहे. प्रधानमंत्री कृषी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के अनुदान देय असेल तर इतर शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस टक्के अनुदान देय असणार आहे.
2. कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना
कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना या महाडीबीटी पोर्टल वरती राबवल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाचे प्रोत्साहन दिले जाणार आहे . तसेच शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण दोन किलो वॅट पर हेक्टर पर्यंत वाढवणे शक्य होणार आहे. या योजनेचा लाभ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पर्यंत पोचवणे. तसेच शेतीमध्ये उर्जेचा कमी वापर करून जास्त उत्पादकता वाढवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेचे धोरण हे कृषी यंत्र किंवा अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देऊन कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन करणे हे आहे.
या योजनेअंतर्गत या कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अनुदान योजनेअंतर्गत खालील अवजारांच्या खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येत आहे.
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
- बैल चलित यंत्र/अवजारे
- मनुष्य चलित यंत्र/अवजारे
- प्रक्रिया संच
- काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र/अवजारे
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- स्वयं चलित यंत्रे
भाडे तत्वावरील सुविधा केंद्र
- कृषि अवजारे बँकेची स्थापना
- उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
3. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (अन्नधान्य, तेलबिया, ऊस आणि कापूस)
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन (औषधे, जैविक घटक, तणनाशके), वैयक्तिक शेततळे, पाईप, पंप संच विविध कृषी अवजारे या घटकांसाठी अनुदान देण्यात येते.
4. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उपयोजना किंवा आदिवासी उप योजना बाह्य)
जमिनीत ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेली आहे.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत वेगवेगळ्या खालील बाबींसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येते.
- नवीन विहिरीसाठी – रुपये २.५० लाख
- जुनी विहीर दुरुस्तीसाठी – रुपये ५० हजार
- बोरिंग साठी – रुपये २० हजार
- पंप संचासाठी – रुपये २० हजार
- वीज जोडणी साठी – रुपये १० हजार
- शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी – रुपये १ लाख
- सूक्ष्म सिंचन संच यामध्ये ठिबक सिंचनासाठी – रुपये ५० हजार किंवा तुषार सिंचन संचासाठी – रुपये २५ हजार
- पीव्हीसी पाईप साठी – रुपये ३० हजार
- परसबागेसाठी – रुपये पाचशे
अशाप्रकारे अनुदान देय असणार आहे. राज्यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे राबवण्यात येत आहे.
5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही राज्यातील अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत खालील घटकांसाठी अनुदान देण्यात येईल.
- नवीन विहिरीसाठी – रुपये २.५० लाख
- जुनी विहीर दुरुस्तीसाठी – रुपये ५० हजार
- बोरिंग साठी – रुपये २० हजार
- पंप संचासाठी – रुपये २० हजार
- वीज जोडणी साठी – रुपये १० हजार
- शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी – रुपये १ लाख
- सूक्ष्म सिंचन संच यामध्ये ठिबक सिंचनासाठी – रुपये ५० हजार किंवा तुषार सिंचन संचासाठी – रुपये २५ हजार
- पीव्हीसी पाईप साठी – रुपये ३० हजार
- परसबागेसाठी – रुपये पाचशे
कृषी विभागाची बाबासाहेब डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येईल येत आहे. या योजनेचा लाभ हा अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
6. एकात्मिक फलोत्पादन विकास योजना | Mahadbt Farmer Scheme List
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन वाढवण्यासाठी राबवली जात आहे. यासाठी गुणवत्तापूर्वक लागवड साहित्य, नवीन फळबागांची लागवड, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सिंचनाची क्षमता वाढवणे, हरितगृह/ शेडनेट हाऊस याद्वारे नियंत्रित शेती करणे, एकात्मिक कीड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मनुष्यबळ विकास, काढणीत्तोर व्यवस्थापन या बाबीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकर्यांना खालील घटकांचा खालील घटकांसाठी अनुदानाच्या रूपाने लाभ घेता येणार आहे
- उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकांची स्थापना
- उतीसंवर्धन प्रयोगशाळा बळकटीकरण/पुनरुज्जीकरण
- नवीन उतीसंवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे
- भाजीपाला विकास कार्यक्रम
- गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य आयात करणे
- भाजीपाला, बियाणे प्रक्रिया, पॅकिंग, साठवण इ. पायाभूत सुविधा
- नवीन बागांची स्थापना करणे
- फलोत्पादन यांत्रिकीकरण
- अळिंबी उत्पादन
- पुष्प उत्पादन
- मसाला पिके लागवड
- जुन्या फळबागांचे पुनरुज्जीकरण करून उत्पादकतेत वाढ करणे (आंबा, संत्री, काजू, चिकू, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, आवळा)
- नियंत्रित शेती घटक (हरितगृह, शेडनेट हाऊस, पक्षिरोधक जाळी, प्लॅटिक आच्छादन, प्लास्टिक टनेल, पॉलीहाऊसमधील उच्च दर्जाच्या भाजीपाला लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान, पॉलीहाऊसमधील/शेडनेट हाऊस मधील उच्च दर्जाच्या फुलपिकांच्या लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान)
- सेंद्रिय शेती
- एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन
- परंपरागीकरणासाठी मधुमक्षिका पालन
- एकात्मिक काढणीपश्चात व्यवस्थापन (पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शितकरण गृह, शितखोली (स्टेजिंग), फिरते पूर्व शितकरण गृह, शितगृह (नवीन/विस्तारीकरण/आधुनिकीकरण), शितसाखळीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळीचे आधुनिकीकरण करणे, शितवाहन, प्राथमिक/फिरते प्रक्रिया केंद्र, रायपनींग चेंबर, शेतावरील कमी ऊर्जा वापरणारे थंड साठवणूक गृह, कमी किमतीचे फळ-भाजीपाला साठवण केंद्र, कमी खर्चाचे कांडा साठवून्क गृह/कांदाचाळ-२५ मे. टन, पुसा शून्य ऊर्जा आधारित शितगृह -१००किलो, एकात्मिक शितसाखळी पुरवठा प्रणाली-प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी वरील घटकांमधील घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे.)
- फलोत्पादन पिकांसाठी पणन सुविधा स्थापन करणे (शासकीय/ खासगी/ सहकारी क्षेत्र)
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे.
7. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना- महाडीबीटी शेतकरी योजना
राज्यामध्ये सन २०१८-१९ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड घटकाचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येत आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान देय असणार आहे. त्यामध्ये पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान, दुसऱ्या वर्षी ३० टक्के अनुदान आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के अनुदान दिले जाईल. अशा तीन वर्षात शेतकऱ्याला लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९० टक्के तर कोरडवाहू झाडांसाठी ८० टक्के ठेवणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला आणि दिव्यांग यांना प्राधान्याने घेता येणार आहे.
100% अनुदान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती
8. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना- महाडीबीटी शेतकरी योजना
राज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण हास प्रोत्साहन देणे आणि शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण दोन किलोवॅट प्रति हेक्टर पर्यंत वाढवणे हे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे शेतीमधील ऊर्जेचा वापर कमी करण्यास मदत होणार आहे. आणि शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवणे शक्य होईल. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्र किंवा अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. या योजेचा लाभ राज्यातील आल्या अत्यल्प आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतकऱ्यांना खालील कृषी यंत्र किंवा अवजारांसाठी अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाईल.
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
- बैल चलित यंत्र/अवजारे
- मनुष्य चलित यंत्र/अवजारे
- प्रक्रिया संच
- काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र/अवजारे
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- स्वयं चलित यंत्रे
भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:
- कृषि अवजारे बँकेची स्थापना
- उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
अनुदानास पात्र आणि इच्छुक लाभार्त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करावा.
- Maza Baap Shetkari Kavita | शेतकरी बाप कविता
- कांदा चाळ अनुदान योजना 2024 संपूर्ण माहिती: पात्रता, कागदपत्रे, अनुदान किती
- अपंग प्रमाणपत्र online: फॉर्म , स्मार्ट कार्ड, शासन निर्णय जीआर, अपंग प्रकार, नियम
- SBI Loan Information In Marathi | स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजना मराठी
- महिला बचत गट कर्ज (Loan) योजना संपूर्ण माहिती: कर्ज, कागदपत्रे, व्याजदर, फायदे
ट्रॅक्टर
Hi अनुदान योजना आहे का
Hi