100% अनुदान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, कोणत्या फळबागेसाठी अनुदान किती मिळते, आवश्यक पात्रता काय, लाभार्थी कोणते, आवश्यक कागदपत्रे कोणती,अर्ज कुठे करायचा, फळझाड लागवडीसाठी मुदत किती, पूर्वसंमतीनंतरची प्रक्रिया काय या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या लेखांमध्ये मिळणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

राज्यात सन 2018-19 पासून फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत येणारी लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाहीत. अश्या लाभार्त्यांना लाभ देण्यात येतो. हि योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जात आहे.

Note: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती आणि इतर शेतकऱ्यांना घेता येईल.

mahaDBT portal shetkari yojana

अनुदान किती दिले जाते?

योजनेत अर्ज केलेल्या शेतकरी लाभार्थ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50 टक्के दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के असे तीन वर्षात अनुदान दिले जाते. असे एकूण मिळून 100 टक्के अनुदान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जाते.

अनुदान मिळण्यासाठीच्या अटी

लाभार्थ्याला दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी त्याने लागवड केलेली झाडांचे प्रमाण पाहिले जाते. ते प्रमाण बागायती झाडांसाठी 90 टक्के तर कोरडवाहू झाडांसाठी 80 टक्के असणे आवश्यक आहे. जर हे प्रमाण कमी झाले, तर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडे झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे गरजेचे आहे.

लाभार्थी क्षेत्र मर्यादा किती?

या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागात कमीत कमी दहा गुंठे आणि जास्तीत जास्त दहा हेक्‍टर क्षेत्र मर्यादित लाभ घेऊ शकतात. तसेच इतर विभागासाठी कमीत कमी वीस गुंठे आणि जास्तीत जास्त सहा हेक्‍टर क्षेत्र मर्यादेतच लाभार्थी शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

फार्म मशिनरी बँक योजना महाराष्ट्र मराठी माहिती

प्राधान्य

फळबाग लागवड अनुदानासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी पात्र असणार आहेत. अशा लाभार्थ्यांना प्रथम त्या योजनेतील निकषानुसार लाभ घेणे आवश्यक आहे उर्वरित क्षेत्रासाठी लाभार्थी वरील क्षेत्र मर्यादित मध्ये राहून या योजनेतुन लाभ घेऊ शकतात.
अल्प व अत्यल्प भूधारक महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य असेल.

फळबागांसाठी अनुदान किती?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना पात्रता

  • लाभार्थ्यास फळबाग लागवड करताना ठिबक सिंचन संच बसवणे आवश्यक आहे.
  • लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना दिला जाईल. संस्थात्मक शेतकऱ्यांना शेतकरी लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार नाही.
  • सर्व प्रवर्गाअंतर्गत जी शेतकरी कुटुंब शेतीवर अवलंबून आहेत, त्यांना प्राधान्याने लाभ दिला जाईल. (कुटुंब म्हणजे पती-पत्नी व अज्ञात मुले)
  • शेतकऱ्याच्या स्वताच्या नावावर शेत जमिनीचा सातबारा उतारा असणे आवश्यक आहे.
  • संयुक्त मालकीची जमीन असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यांला स्व हिश्श्याच्या क्षेत्र मर्यादेत लाभ घेता येईल.
  • सातबारा वर कुळाचे नाव असेल, तर कुळाची संमती घेणे आवश्यक आहे.
  • परंपरागत वननिवासी अधिकार मान्‍यता अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभार्थी लाभ घेण्यास पात्र असतील.
  • इतर सरकारी योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसार क्षेत्र मर्यादेतच लाभार्थ्याला लाभ घेता येईल.

फळबाग फळझाड लागवडीसाठी मुदत

फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा कालावधी प्रतिवर्षी 1 मे ते 30 नोव्हेंबर पर्यंत असेल. योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक राहील.

Karj Mafi Maharashtra | महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना यादी

फळबाग लागवड योजना आवश्यक कागपत्रे

  • आवश्यक कागदपत्रे
  • ७/१२ व 8-अ उतारा
  • हमीपत्र
  • संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)

अर्ज कुठे करावा

अर्ज सादर करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या .अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा.

फळबाग लागवड योजना पूर्वसंमतीनंतरची प्रक्रिया काय

  • पूर्व संमती दिल्यानंतर कृषी सहाय्यक सात दिवसात अंदाजपत्रक तयार करतात.
  • मंडळ कृषी अधिकारी यांनी अंदाजपत्रकाची छाननी करून 30 दिवसाच्या आत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे शिफारसी सह मंजुरीसाठी पाठवले जाते. 1 हेक्टर क्षेत्रापर्यंत फळबाग लागवड अंदाजपत्रकास तालुका कृषी अधिकारी प्रशासकीय मान्यता देतात.
  • एक हेक्‍टर क्षेत्र पेक्षा अधिक क्षेत्राकरिता फळबाग लागवड अंदाजपत्रकात उपविभागीय कृषी अधिकारी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देत देतात. अंदाजपत्रक प्राप्त झालेल्या दिनांकापासून एक आठवड्याच्या आत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान होते. तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांना हे बंधनकारक असते.
  • प्रत्येक अर्जदार लाभार्थ्यांसाठी फळबाग लागवड स्वतंत्र प्रकल्प समजण्यात येतो.
  • अशा प्रकल्पांसाठी प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता देखील स्वतंत्रपणे दिली जाते.
  • लागवडीची अंदाजपत्रके तयार करून त्याला सक्षम प्राधिकरण कार्याच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी फळबाग लागवड करतात.

पिक कर्ज योजना online अर्ज l online crop loan application

कलमांचा किंवा रोपांचा पुरवठा

फळबाग लागवड करता कलम किंवा नारळ रोपांची निवड लाभार्थ्यांनी स्वतः करावयाची असूनत्यांनी खालील रोपवाटिकांना प्राधान्य द्यावे.

  • कृषी विभागाच्या रोपवाटिका
  • कृषी विद्यापीठांच्या रोपवाटिका
  • राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत नामांकित खाजगी रोपवाटिका

राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत नामांकित खाजगी रोपवाटिकेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या रोपांच्या दर्जाबाबत जबाबदारी संबंधित रोपवाटिका धारकांची असेल. अशा रोपवाटिकांमधून कलमे किंवा रोपांच्या दर्जाबाबत खातरजमा करून लाभार्थ्याने त्याची खरेदी करावी.

ठिबक सिंचन संच

लाभार्थ्याला फळबाग लागवड करताना ठिबक सिंचन संच बसवणे अनिवार्य असणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्‍यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिता शंभर टक्के अनुदान द्यावयाचे असते. याकरिता ठिबक सिंचन संच उभारणीसाठी प्रचलित असलेल्या सर्व केंद्र व राज्य योजनांच्या निधीतून अनुज्ञेय असणारे अनुदान प्रथम अनुदान अदा करावे लागते. त्यानंतर आवश्यक असल्यास असल्यास भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा निधीतून उर्वरित अनुदान अदा केले जाते. फळबाग लागवडीसाठी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी ठिबक सिंचन संच याकरिता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी ठिबक प्रणालीवर अर्ज भरून द्यावेत. या यादीला प्राधान्याने पूर्वसंमती देली जाते. ठिबक सिंचन संच हा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत निवडलेल्या कंपन्यांमार्फत व मान्य दर्जाप्रमाणे बसवणे आवश्यक आहे.

अश्याच नवीन योजनांची परिपूर्ण माहिती घेत राहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा.

1 thought on “100% अनुदान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top