Apang Karj Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, आज आपण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन मार्फत राबवली जाणारी अपंग कर्ज योजना ची माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, या योजनेसाठी कोणत्या अपंग व्यक्तींना लाभ मिळेल, त्यासाठी च्या अटी लाभाचे स्वरूप, अर्ज कसा करावे, अर्ज कुठे आणि संपर्क कार्यालयाचे नाव पत्ता इत्यादी संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
Table of Contents
अपंग कर्ज योजना
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.
ही महाराष्ट्र राज्य शासनामार्फत अपंगांसाठी आर्थिक मदत म्हणून राबवली जाणारी एक योजना आहे. जी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत राबवली जाते.

अपंग प्रमाणपत्र online: फॉर्म , स्मार्ट कार्ड, शासन निर्णय जीआर, अपंग प्रकार, नियम
अपंग कर्ज योजनेचे वैशिष्ट्य
योजनेचे नाव | अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल |
योजनेचा प्रकार | राज्य शासन |
योजनेचे उद्दिष्ट | अपंगांची आर्थिक उन्नती |
योजना कोणामार्फत राबवली जाते | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण |
अधिकृत संकेतस्थळ | https://sjsa.maharashtra.gov.in/ |
अपंग कर्ज योजनेचे उद्दिष्ट काय?
राज्यातील बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत म्हणून ही योजना राबवली जाते.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट अपंग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय, उद्योग, धंदा, शेती पूरक उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बँकेमार्फत परतफेडीच्या कर्जाच्या स्वरूपात बीज भांडवल उपलब्ध करून देणे हे आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपंगत्व पात्रता काय?
- अंध
- अल्पदृष्टी
- कर्णबधिर
- अस्थिव्यंग
- मतिमंद
वरील अपंग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक त्यांचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत घेऊ शकतात.
अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती: फॉर्म PDF, कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार अपंग व्यक्तीचे अपंगत्व किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे मासिक उत्पन्न रुपये 100000 पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावे.
अपंग कर्ज योजने अंतर्गत दिलेल्या लाभाचे स्वरूप
या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना रुपये १.५० हजार प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के अथवा कमाल तीस हजार रुपये समाज कल्याण विभागाकडून बीज भांडवल स्वरूपात अनुदान देण्यात येते. उर्वरित 80 टक्के भाग बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होतो.
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना संपूर्ण माहिती: अर्ज, पात्रता, कागदपत्रे
अर्ज कुठे करावा
विहित नमुन्यात जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करणे गरजेचे आहे.
संपर्क कार्यालयाचे नाव व पत्ता
जिल्हा समाज कल्याण अधिकारी
जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण मुंबई शहर/उपनगर व संबंधित बँक यांकडे संपर्क करावा लागेल.
- प्रधानमंत्री पेन्शन योजना मराठी माहिती: सर्व प्रधानमंत्री पेन्शन योजनांची माहिती
- महिला किसान योजना 2025 महाराष्ट्र संपूर्ण माहिती
- Election Commission Maharashtra Voter List ऑनलाइन तपासणी
- Mahadbt Farmer Scheme List | महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2025
- Tractor Loan Online Apply: ट्रॅक्टर कर्ज योजना रु. 2500000/- कर्ज करा अर्ज
मतिमंद