TFWS Scheme in Maharashtra for Engineering 2022 : नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ट्यूशन फी माफी योजना 2022 (TFWS Scheme in Maharashtra for Engineering ) संबंधित संपूर्ण माहिती आज या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये ट्युशन फी माफी योजनेचे फायदे कोणते, आवश्यक पात्रता, अटी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अधिक माहितीसाठी संपर्क इत्यादी सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण नक्की वाचा.
Table of Contents
TFWS Scheme in Maharashtra for Engineering 2022
ही योजना सरकारी महाविद्यालये किंवा संस्था, अनुदानित महाविद्यालये किंवा संस्था आणि AICTE, नवी दिल्ली द्वारे मंजूर विनाअनुदानित महाविद्यालये किंवा संस्थांमधील अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या सर्व मंजूर जागांसाठी लागू होईल. 2007 मध्ये महाराष्ट्र सरकार (मानव संसाधन विकास मंत्रालय) द्वारे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी, महिला आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग विद्यार्थ्यांना उच्च अनुदानित तांत्रिक शिक्षण देण्यासाठी ट्यूशन फी माफी योजना सुरू करण्यात आली आहे.
ट्यूशन फी माफी योजनेचे फायदे (TFWS Benefits)
- लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत तांत्रिक शिक्षण मिळेल, म्हणजे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
- ट्यूशन फी माफी योजना उच्च अनुदानित तांत्रिक शिक्षण प्रदान करण्याच्या रूपात फायदे प्रदान करते. म्हणजे कॉलेजद्वारे घेतलेल्या इतर फीशिवाय कोणतेही शिक्षण शुल्क भरण्याची गरज नाही.
- ट्यूशन फी माफी योजना एकूण जागांच्या 5% आणि AICTE द्वारे मान्यताप्राप्त सर्व महाविद्यालयांना अनिवार्य केली आहे. ज्यात खाजगी विनाअनुदानित संस्थांचा समावेश असणार आहे.
TFWSआवश्यक पात्रता आणि अटी (TFWS Eligibility)
- फक्त तेच उमेदवार ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व संभाव्य स्त्रोतांकडून 6 लाख रु.पेक्षा कमी आहे TFWS योजनेद्वारे अर्ज करण्यास पात्र आहेत.
- CAP राऊंड मधून सुरक्षित असलेल्या जागा विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी आवश्यक उत्पन्नाशी संबंधित कागदपत्रे महाराष्ट्र राज्याच्या योग्य सक्षम अधिकाऱ्याकडून सत्यापित करणे आवश्यक आहे.
- OBC/SC/ST/GENERAL श्रेणीतील उमेदवार सर्व योजनेसाठी पात्र आहेत.
- माफी केवळ ट्यूशन फीपर्यंत मर्यादित आहे.
- ट्यूशन फी वगळता इतर सर्व फी लाभार्थी विद्यार्थ्याने भरावी लागतील.
Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra 2022 Marathi
फी माफी योजना आवश्यक कागदपत्रे (TFWS Documents)
- तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र रु. 6 लाख पर्यंत
- जात प्रमाणपत्र
- नॉन-क्रिमी लेयर (फक्त त्यांच्यासाठी)
- जात वैधता
- प्रवेश परीक्षेचे स्कोअर कार्ड
- HSC आणि SSC मार्कशीट
TFWS Scheme Apply अर्ज करण्याची प्रक्रिया (TFWS Scheme in Maharashtra for Engineering )
- ट्यूशन फी माफी योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर किंवा कॅप फेरीसाठी अर्ज करताना पात्रता तपासावी लागेल.
- जेव्हा उमेदवार एआरसी केंद्राद्वारे प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करतो. तेव्हा त्याला TFWS योजना निवडावी लागते. म्हणजे नोंदणी करताना पर्याय येतो उदा. तुम्हाला TFWS साठी अर्ज करायचा आहे आणि उमेदवाराला होय बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ऑपशन फॉर्म भरताना उमेदवाराला ऍडमिशन घेतलेल्या संबंधित महाविद्यालयाचा TFWS कोड भरावा लागेल.
अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?
उमेदवार खाली नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा ARC केंद्रावर संपर्क करू शकतो. जेथे उमेदवार प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करत आहे.
पत्ता
महापालिका मार्ग,
मेट्रो सिनेमाच्या माघे,
धोबी तलाव,
छत्रपती शिवाजी टर्मिनस एरिया,
मुंबई, महाराष्ट्र 400001
- अपंग पेन्शन योजना महाराष्ट्र 2024 संपूर्ण माहिती: फॉर्म PDF, कागदपत्रे
- Kisan Credit Card Yojana In Marathi: KCC पीक कर्ज योजना माहिती
- अपंग कर्ज योजना 2024: अर्ज, लाभ, संपर्क कार्यालय संपूर्ण माहिती
- पिक कर्ज योजना Online अर्ज 2024 l Online Crop Loan Application
- शेळी पालन ऑनलाईन अर्ज 2024: महाराष्ट्र पशुपालन अनुदान शेळी पालन कर्ज योजना