पोखरा योजना GR 2025 महाराष्ट्र: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजना 2025 साठी आर्थिक वर्षात मंजूर निधी संदर्भातील शासन निर्णयाची माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत.
पोखरा योजना 2025 (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प)
हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या मराठवाडा आणि विदर्भ विदर्भातील 4210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोर्यातील खारपाणपट्ट्यातील 932 गावे अशी एकूण 5142 गावांमध्ये 6 वर्ष कालावधीत जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने सुमारे 4000 कोटी रुपये अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये आर्थिक वर्ष 2025-23 मध्ये पूर्ण झालेल्या कामांच्या बाबींची देयके अदा करण्यासाठी प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांचेकडून संदर्भ क्रमांक दोन च्या पत्रान्वये प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यानुसार सन 2025-२३ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतूदीतून रुपये 265 कोटी एवढा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालील निर्णय घेतला आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना माहिती | पोखरा योजना Online Form

पोखरा योजना शासन निर्णय दिनांक 20 एप्रिल 2025 | पोखरा योजना GR 2025 महाराष्ट्र
सण 2025-23 या आर्थिक वर्षाकरिता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना रुपये 265 कोटी 54 लाख एवढा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. सदर निधीपैकी बाह्य व राज्य शासनाच्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे असेल:
- सदर मंजूर निधीपैकी बाह्य हिश्श्याची रक्कम 70 टक्के म्हणजेच 185 कोटी 40 लाख एवढी असणार आहे.
- राज्य निधी रक्कम एकूण मंजूर निधीपैकी 30 टक्के म्हणजेच 80 कोटी 14 लाख असणार आहे.
- असा एकूण मिळून वितरित करण्यात येणारा निधी 265 कोटी 56 लाख एवढा असणार आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प करिता राज्य हिस्सा रुपये 80.14 कोटी म्हणजेच 80 कोटी 14 लाख एवढा निधी बाब निहाय वितरित करण्यात येत असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे
बाब | वितरीत निधी (रुपये कोटीत) |
01-वेतन | 7.20 |
06-दूरध्वनी, वीज व पाणी देयक | 0.05 |
10-कंत्राटी सेवा | 12.60 |
11 -देशांतर्गत प्रवास खर्च | 0.45 |
12- परदेश प्रवास खर्च | 0.12 |
13-कार्यालयीन खर्च | 1.80 |
14- भाडेपट्टी व कर | 0.96 |
17- संगणक खर्च | 0.60 |
26-जाहिरात व प्रसिद्धी | 1.20 |
28- व्यावसायिक सेवा | 6.00 |
30- इतर कंत्राटी सेवा | 0.06 |
33- अर्धसहाय्य | 49.07 |
50- इतर खर्च | 0.03 |
एकूण | 80.14 |
या शासन निर्णयाचा अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊ शकता आणि या शासन निर्णयाची सत्यप्रतता जाणून घेऊ शकता.