शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखात राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार GR 2022 विषयी माहिती पाहणार आहोत. या केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनेसाठीचा मंत्री मंडळ बैठकीतील शासन निर्णयाची माहिती या लेखात तुम्हाला मिळणार आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार 2022
राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार ही योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुक्रमे 60:40 प्रमाणात अर्थसाहाय्याने राबवण्यात येत असून, या योजने अंतर्गत सन 2021-22 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता केंद्र शासनाने दिनांक 8 मार्च 2022 रोजी च्या पत्रान्वये केंद्र हिसक्याचा रुपये 17.28 कोटी निधी वितरित केला आहे. व त्या समरुप राज्य हिश्याचा रुपये 11.52 कोटी निधी असा एकूण 28.80 कोटी निधी वितरणासाठी उपलब्ध असून तो निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालील शासन निर्णय दिनांक 31 मार्च 2022 रोजी घेतला आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजना सर्व GR 2022
राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार शासन निर्णय GR 2022
दिनांक 31 मार्च 2022 रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये सन 2021-22 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार या योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी अनुसूचित जाती प्रवर्ग करीता केंद्र आणि राज्याचा 60:40 अर्थसहाय्याची या प्रमाणात केंद्र हिश्याचा रुपये 17.28 कोटी म्हणजेच 17 कोटी 28 लाख एवढा निधी आणि त्या समरूप राज्याचा रुपये 11.52 कोटी एवढा निधी म्हणजेच 11 कोटी 52 लाख असा एकूण 28.80 कोटी म्हणजेच 28 कोटी 80 लाख एवढा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यास दिनांक 31 मार्च 2022 रोजी मान्यता देण्यात आली आहे.
सदर वितरित रुपये 28.80 कोटी निधी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या केंद्र आणि राज्य हिश्श्याच्या पुढील सन 2021-22 मध्ये अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीतून खर्ची करण्यात यावा. या शासन निर्णयाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या योजनेच्या जीआर ची सविस्तर माहिती पाहू शकता.
- मिरची लागवड माहिती । Mirchi Lagwad Mahiti in Marathi
- Online Apply प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2023: अर्ज कुठे, कागदपत्रे, पात्रता, लाभ
- बचत गट कर्ज व्याज परतावा योजना: Online अर्ज, कागदपत्रे, बँक, व्याजदर
- 5 लाखांपर्यंतची 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना: Online अर्ज, कागदपत्रे, बँका
- 10 लाखांपर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना: Online अर्ज, कागदपत्रे, अनुदान
