Maza Baap Shetkari Kavita | शेतकरी बाप कविता

नमस्कार मित्रांनो, आज आपण बालभारती पुस्तकातील माझा शेतकरी बाप ही कवी इंद्रजीत भालेराव यांची कविता आज या लेखामध्ये पाहणार आहोत. या कवितेमध्ये शेतकऱ्याचे वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटलेले आहे. त्याचे कष्ट या कवितेमध्ये इंद्रजित भालेराव यांनी अतिशय सुंदर रीतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाप या कवितेमध्ये शेतकऱ्याची जीवनसरणीची वास्तविकता पाहायला मिळेल. तो काय खातो, कस राहतो, कसं आणि काय काम करतो याचे कवीने सुंदर रेखाटन या कवितेमध्ये केलेलं आहे.

बाप

शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप

लेतो अंगावर चिंध्या
खातो मिरची भाकर
काढी उसाची पाचट
जगा मिळाया साखर
काटा त्याच्याच का पाई
त्यानं काय केलं पाप?

माझा बाप शेतकरी
उभ्या जगाचा पोशिंदा
त्याच्या भाळी लिहिलेला
रातदिस कामधंदा
कष्ट सारी त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप

बाप फोडीतो लाकड
माय पेटविते चुल्हा
पिठामागल्या घामाची
काय सांगू तुला
आम्ही कष्टाचंच खातो
जग करीहा हापाहाप!

इंद्रजीत भालेराव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top