Kharip Pik Vima Anudan Yojana Online Apply: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम संबंधित ची संपूर्ण माहिती, शासन निर्णय GR आणि पीक नुकसान भरपाईसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती पाहणार आहोत.
Table of Contents
Update खरीप पिक विमा योजना Online Appy
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022-23 योजनेत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत मुदत आहे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रासाठी अधिसूचित पिकांसाठी राबवली जाणार आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी या योजनेचा लाभ ऐच्छिक आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना
PM पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून महाराष्ट्र राज्यात राबवण्यात आलेले आहे. ही योजना खरीप हंगाम 2020 पासून पुढील तीन वर्षांसाठी राबवण्यास मान्यता देण्यात आलेली होती. या योजनेच्या अंमलबजावणी करिता केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. त्या मान्यतेनुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 व रब्बी 2022-23 हंगामासाठी एक वर्षाच्या कालावधी करिता राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचारधन होती. त्या अनुषंगाने शासन निर्णय घेण्यात आला.
शेततळे अनुदान योजना : शेततळे अनुदान योजनांची संपूर्ण माहिती
पीक नुकसान भरपाई योजना उद्दिष्ट
- नैसर्गिक आपत्ती कीड रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले तर त्यांना विमा संरक्षण देणे.
- शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण आणि सुधारित शेतमशागतीचे तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यास प्रोत्साहित करणे.
- पिकांच्या नुकसानीच्या कठीण काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवण्यास मदत करणे.
- कृषी क्षेत्रासाठी च्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे. जेणेकरून उत्पादनातील जखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणासंबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविध ठिकाणी मानव विकास करून स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.
पिक विमा योजनेची प्रमुख वैशिष्ट्य
- ही योजना शासनाच्या आदेशानुसार अधिसूचित केलेल्याक्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल.
- प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक नाही.
- अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत.
- शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के आणि रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के तर खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे.
- या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022 23 या एक वर्षा करिता सर्व अधिसूचित जोखीम स्तर पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आलेला आहे.
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुणुले त्या जोखीमस्तर पिकाचा विचार घेऊन विचारात घेऊन निश्चित केले जाईल.
पीक विमा योजनेत समाविष्ट पिके
पीक वर्गवारी | खरीप हंगाम | रब्बी हंगाम |
तृणधान्य व कडधान्य पिके | भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका | गहू (बागायत), रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात |
गळित धान्य पिके | भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन | उन्हाळी भुईमूग |
नगदी पिके | कापूस, खरीप कांदा | रब्बी कांदा |
Kharip Pik Vima Farmer Online Application
विमा संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता
राज्यांमध्ये सन 2022-23 साठी जिल्हास्तरीय पीक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या पीक कर्जदराप्रमाणे विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे पीक कर्जदरामध्ये तफावत असून राज्य पीक कर्ज समितीच्या दरापेक्षा काही जिल्ह्यांमध्ये जास्त दराने पीक कर्जदारास मान्यता देण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यात पीक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या कमाल कर्जापेक्षा जादा दर निश्चित केलेला आहे. त्या जिल्ह्यांचे विमा संरक्षित रक्कम ही राज्य पीक कर्ज दर समितीने त्या पिकासाठी निश्चित केलेली मर्यादा राहील.
राज्यात 1 जुलै पासून पीक विमा योजना करिता अर्ज सुरू झाले आहेत. पिक विमा भरत असताना शेतकरी दोन पद्धतीने पिक विमा भरू शकतो. ज्यामध्ये शेतकरी स्वतः पीक विमा भरू शकतो. त्याचप्रमाणे सीएससी केंद्रात जाऊन देखील शेतकरी हा पीक विमा भरता येतो. त्याची लिंक खाली दिलेली आहे. खरीप पीक विमा योजना Online अर्ज
या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा खालील जीआर पाहू शकता. https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202207011732453801.pdf