जीआर 2023: छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना व वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

शिष्यवृत्ती योजना व वसतिगृह भत्ता योजना 2022 GR: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 2022 आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2022 या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या निधी संबंधित जीआर शासन निर्णयाची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अनुदान 2022

सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता वित्त विभागाच्या पत्रानुसार राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना मागणी कृषी विषयक संशोधन व शिक्षण या मुख्य लेखा शीर्षकाखाली कार्यक्रमाअंतर्गत शिष्यवृत्या किंवा विद्यावेतने या उद्दिष्टाकरिता 14 टक्के च्या मर्यादेत निधी बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती साठी सन 2022-23 या चालू आर्थिक वर्षासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्याकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 2022 करिता सहाय्यक अनुदान आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेकरिता सहाय्यक अनुदान शिष्यवृत्या किंवा विद्यावेतन या बाबीखाली अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी खालील शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

TFWS Scheme in Maharashtra for Engineering | ट्यूशन फी माफी योजना 2022

शासन निर्णय दिनांक 26 एप्रिल 2022

महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती या योजनेसाठी रुपये 490 लाख आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी रुपये 210 लाख असा एकूण 7 कोटी एवढा निधी वितरित करण्यात करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

अटी व शर्ती

  • योजना निहाय व निहाय वितरीत केलेला निधी कोणत्याही कारणास्तव शिल्लक राहणार असेल, तर तो अखर्चित शिल्लक निधी इतर बाबींसाठी परस्पर वर्ग खर्च करू नये.
  • सदरचे अनुदान चालू वर्षातील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता उपयोगात आणावी. ही मंजूर अनुदान रक्कम राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात महाडीबीटी प्रणाली द्वारे वितरित करण्याची व्यवस्था संचालक (शिक्षण) महाराष्ट्र, कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्याकडून करण्यात यावी.
  • मंजूर करण्यात आलेले अनुदान महाराष्ट्र कृषी विद्यापीठे अधिनियम 1983, महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिनियम 1990 आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठे लेखा संहिता 1991 मधील तरतुदीप्रमाणे आणि प्रचलित शासन आदेश व विविध कार्यपद्धतीनुसार सक्षम अधिकाऱ्यांची प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेतल्यानंतर विहित मर्यादेत खर्च करण्यात यावे. केवळ अर्थसंकल्पीय तरतूद आहे किंवा अनुदान वितरित केले आहे म्हणून खर्च करू नये.
  • सन 2022-23 मधील अनुदानाची मागणी करताना विद्यापीठाने दरमहा 10 तारखेपर्यंत योजनानिहाय वितरित केलेले अनुदान प्रत्यक्ष खर्च व शिक्षण अनुदान या बाबतचा अहवाल सादर करावा. यापुढे अनुदानाची मागणी करताना पूर्वी वितरित केलेल्या अनुदानातील शिल्लकिची प्रस्तावित मागणीची सांगड घालून प्रत्यक्षात आवश्यक तेवढ्याच अनुदानाची मागणी करण्यात यावी.

या शासन निर्णयाच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि अधिक माहिती मिळवावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *