पिक कर्ज योजना Online अर्ज 2024 l Online Crop Loan Application

Pik Karj Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आज आपण खरीप पीक कर्ज च्या ऑनलाईन अर्ज संबंधातील महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. याअंतर्गत शेतकऱ्यांना सुलभ रीत्या कर्ज मिळावीत, कर्ज वाटप होत असताना होणारा भ्रष्टाचार याचप्रमाणे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेमध्ये मारावे लागणारे हेलपाटे, बँकेमध्ये होणारी गर्दी आणि शेतकऱ्यांचे वेळेचा अपव्यय ह्या सर्वांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून पीक कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात.

pik vima yojana maharashtra online apply

खरीप पीक कर्ज योजना ऑनलाईन अर्ज

खरीप पीक कर्ज वाटपासाठी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. आणि यांच्या संबंधातील परिपूर्ण अशी माहिती या चा अर्ज कसा करायचा, याच्या पुढील प्रक्रिया कशी असणा आहे हे सर्व आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण परभणी https://parbhani.gov.in/ या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर देण्यात आलेले लिंक वरून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.

पीक कर्ज योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • parbhani.gov.in परभणी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर पीक कर्ज नावाची टॅब वर क्लिक करायचे आहे.
  • या पीक कर्ज नावाच्या ट्यूब वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक लिंक देण्यात आलेली आहे. ज्यावर जाऊन आपल्याला पीक कर्जासाठी चा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

पिक कर्ज नोंदणी

  • जिल्हाधिकारी कार्यालय परभणी जिल्हा अग्रणी बँक यांच्या माध्यमातून पिक कर्ज नोंदणी साठी अर्ज देण्यात आलेले आहे.
  • त्याच्यामध्ये आपण दोन ऑप्शन पाहू शकता. नवीन कर्जसाठी येथे क्लिक करा आणि अर्जाची सध्यास्तीथी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • त्यामध्ये नवीन कर्जासाठी अर्ज यावर क्लिक करा. जर तुम्ही यापूर्वी अर्ज केलेला असेल, तर तुम्हला त्या अर्जाचा स्टेटस पाहायचा असेल तर तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती यावर क्लिक करावे लागेल.

शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती

  • यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एका अर्ज ओपन होईल. त्या अर्जाच्या माध्यमातून पीक कर्जाची मागणी करायची आहे.
  • त्या अर्जामध्ये पीकी कर्ज नोंदणी अर्ज त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे सुरुवातीला नाव, वडिलांचे नाव आणि त्यानंतर आपलं आडनाव इंटर करायचे आहे. मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर द्यावे लागतील. पॅन कार्ड नंबर असेल, तर तो पॅन कार्ड नंबर दिल्यास कर्ज तात्काळ प्राप्त होते. त्यामुळे पॅन कार्ड असेल, तर पॅन कार्ड नंबर आपण नक्की द्या.
  • याच्यानंतर राज्य ऑटोमॅटिकली सिलेक्ट केले गेल्यानंतर आपल्याला तालुका निवडायचे आहे.
  • याच्यामधून आपण जो तालुका निवड या तालुक्याच्या अंतर्गत असलेल्या गावाची यादी दाखवली जाईल.
  • आपला तालुका असेल, त्या ठिकाणी तालुका निवडायचे आपल्या गावाचं नाव निवडायचे.
  • याच्या नंतर खाली आपण पाहू शकता, आपल्या गावाचं नाव निवडल्यानंतर आपल्या गावाचे संलग्न असलेले बँक आपल्याला दाखवले जाईल. उदा. जर आपण परभणी तालुका निवडले, मांडवा गाव या ठिकाणी निवडले, तर आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया संलग्न असलेले बँक दाखवली जाईल. आणि उदा. आपण जर दुसरा गाव निवडले, तर त्या गावाशी संलग्न असलेली जी काही बँक असेल, ते बँक आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल.

बचत खात्याची माहिती

  • त्यानंतर आपल्या बचत खात्याची माहिती भरायची आहे. ज्यामध्ये आपल्याला जिल्ह्याचे तालुक्याचे नाव, बचत खात्याच्या बँकेचे नाव, त्या शाखेचे नाव आणि बचत खाते क्रमांक आपल्या निवडायचे आहे.

कर्ज खात्याची माहिती भरा

  • कर्ज खाते ज्या बँकेत आहे त्याचे नाव, कर्ज खाते बँकेच्या शाखेचे नाव, कर्ज खाते ज्या बँकेत आहे त्याचे खाते क्रमांक ही माहिती भरायची आहे.
  • याच्या नंतर आपल्याला नवीन कर्जासाठी नोंदणी करायचे आहे का किंवा आपल्याला सध्याच्या कर्जाचे नूतनीकरण करायचा आहे. याच्या मध्ये नवीन नोंदणी करायची असेल, तर नवीन नोंदणी करण्यासाठी ऑप्शन भरायचेआहे.
  • आणि जर सध्याच्या कर्जाचा नूतनीकरण करायचे असेल, तर त्याच्या बद्दलची माहिती द्यायची आहे.
  • सध्याच्या कर्जाचा नूतनीकरण करायचे असेल, तर आपल्या कर्जखात्याची माहिती आपल्याला भरावे लागेल.

शेत जमिनीची माहिती व लागवड केलेल्या पिकाची माहिती भरा

  • जर नवीन कार्जासाठी नोंदणी करायचे असेल, तर डायरेक्ट आपल्याला आपल्या शेती पिकांच्या जमिनीची माहिती भरावी लागणार आहे.
  • लागवड केलेल्या पिकांची माहिती भरायची आहे. यामध्ये शेत जमीनीचे एकूण क्षेत्र, एकर मध्ये रूपांतरित करून उत्तर आपल्याला एकर मध्ये द्यायचे आहे. याच्यानंतर पिकाचे नाव निवडायचे, पिकानुसार आपल्याला जे काही असेल ते पीक कर्ज दिले जाईल.
  • जर तुमच्याकडे सोयाबीन असेल, तर सोयाबीनच्या अंतर्गत किती क्षेत्र आहे. त्या क्षेत्र एकर मध्ये नमूद करायचे, लागवड केलेल्या जमिनीचा सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर त्याच्या मध्ये भरायचा आहे.
  • हा सर्वे नंबर भरल्यानंतर बाजूला आपल्याला पुढच्या अधिक चिन्हावर क्लिक करायचे आहे. जेणेकरून तो समाविष्ट होईल.
  • समजा आपण पाच एकर जमीन लावलेल्या पैकी दोन एकर सोयाबीन दाखवलेले, उर्वरित आपल्याकडे समजा हळद किंवा गहू, ज्वारी, मका आहे हे आपल्या भरायचे आहे.
  • हे लावल्यानंतर कोण आपल्याला सर्वे नंबर टाकून ते क्षेत्र त्याठिकाणी ऍड करायचे आहे.
  • हि सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली जतन करायचे ऑप्शन दाखवली जाईल या जतन करा वर क्लिक करायचे आहे.
  • जतन करा वर क्लिक केल्यानंतर आपल्या अर्जाची यशस्वीरीत्या नोंदणी झालेली आहे.

शेतकरी प्रमाणपत्र: Online/Offline अर्ज कागदपत्रे, फायदे, संपूर्ण माहिती

पीक कर्ज Check Staus

  • अर्जाची यशस्वीरीत्या नोंदणी झाल्यानंतर, पुढील कारवाईसाठी संबंधित बँकेचे प्रतिनिधी आपणास संपर्क करतील.
  • आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी या संकेत स्थळावरील सद्यस्थिती ऑप्शनचा वापर करावा.
  • यासाठी आपला आधार क्रमांक लॉगिन तर मोबाइल नंबर हा पासवर्ड असणार आहे.
  • आपण भरलेलय अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी आपल्याला यूजर आयडी मध्ये आपला आधार क्रमांक टाकायचे आहे. तर जो मोबाईल नंबर दिलेला आहे, तो मोबाईल नंबर आपला पासवर्ड म्हणून वापरायचा आहे.

महिला कर्ज योजना महाराष्ट्र संपूर्ण मार्गदर्शक

ऑनलाईन अर्ज केल्यानंतरची पीक कर्जाची कार्य प्रकिया काय?

  • मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 857 बँकेच्या द्वारे ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अर्जामध्ये भरलेल्या माहितीची बँकेच्या माध्यमातून तपासली जाईल. आणि बँकेने माहिती तपासल्यानंतर आपण पात्र असाल तर, पात्र असल्या बद्दलची माहिती आपल्याला दिले जाईल. आणि अपात्र असल्याचा अपात्रतेच कारण लॉगिन मध्ये प्राप्त होणार आहे.
  • परभणी जिल्ह्यातील सर्व बँक शाखा या प्रणालीला जोडलेले आहेत.
  • संबंधित बँकेत स्वतंत्र लॉग-इन दिलेला असल्यामुळे, आपण भरलेला अर्ज या बँकेच्या माध्यमातून तपासला जाईल. आणि आपण पात्र असेल, तर आपल्याला कागदपत्रासह बँकेमध्ये घेण्याची वेळ दिली जाईल.
  • यानंतर आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जाईल आणि 15 दिवसाच्या आत मध्ये बँकेच्या माध्यमातून आपले कर्ज दिले जाईल.
  • अशा प्रकारे परभणी जिल्ह्याचे ऑनलाईन पीक कर्जासाठी अर्ज सुरू झालेले आहे.
  • याचप्रमाणे इतर जिल्ह्याच्या माध्यमातून सुद्धा अर्ज भरून घेतले जातील आणि इतर ज्या जिल्ह्याचे लिंक उपलब्ध होतील. ज्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की घेण्याचा प्रयत्न करू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top