कुसुम सोलार पंप योजना पेमेंट भरण्यासाठी मुदत वाढली !! ही आहे शेवटची तारीख

Kusum Solar Krushi Pump Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार योजना म्हणजे कुसुम सोलार पंप योजना. या योजनेसाठी राज्यातून शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते. आणि त्यामधून लाभार्थी शेतकऱ्यांची बेनिफिशरी लिस्ट म्हणजेच यादी जाहीर करण्यात आलेली होती. यादीनंतर शेतकऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र अपलोड करायचे होते. मागील काही दिवसांपासून पेमेंटचा भरणा करण्याचा ऑप्शन लाभार्थी शेतकऱ्यांना आलेला होता. यासाठी दिनांक 10 मे 2022 रोजी ऊर्जा प्रेस नोट यांच्याकडून एक परिपत्रक जारी केले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांना 21 मे 2022 पूर्वी आपले पेमेंट भरणे बंधनकारक केले गेले होते.

kusum solar pump yojana date extended

कुसुम सोलार पंप योजना ची 31 मे 2022 रोजी मुदत संपली होती

31 मे या मुदतीमध्ये शेतकऱ्याकडून काही कारणास्तव जसे की पेमेंट करण्यासाठी अडचणी, पैसे उपलब्ध नसणे अशा समस्यांमुळे पेमेंटचा भरणा करणे शक्य झाले नव्हते. तसेच महाउर्जा यांच्याकडून दिलेली पेमेंट ची अंतिम तारीख 31 मे देखील संपली होती. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांपुढे हा प्रश्न होता की, त्यांचा अर्ज बाद होईल की त्यांना पेमेंट भरण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळेल. या सर्व बाबींचा विचार करून महाऊर्जा यांच्याकडून 1 जून 22022 रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2022

ही आहे कुसुम कुसुम सोलार पंप योजना च्या पेमेंट भरण्याची अंतिम तारीख | Kusum Solar Pump Yojana Date Extended

पात्र झालेल्या लाभार्थींनी 30 जून 2022 पर्यंत आपल्या पेमेंटचा भरणा आत्ता करता येणार आहे. नव्याने काही लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. यांना देखील पेमेंटचा भरणा करण्यासाठीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्यांनी 30 जून पूर्वी आपले पेमेंट भरून घ्यावे. जेणेकरून महाऊर्जा https://kusum.mahaurja.com/ यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की, दिलेल्या मुदतीपूर्वी पेमेंटचा भरणा केलेला नसेल. तर ते अर्ज बाद करण्यात येतील. म्हणून पात्र लाभार्थ्यांनी 30 जून 2022 पूर्वी आपले पेमेंट भरून घ्यावे. असे आवाहन महाऊर्जा यांच्याकडून लाभार्थी शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top