7/12 Online Maharashtra: ऑनलाइन सातबारा व ८- अ पाहणे

7/12 Online Maharashtra (7 12 Utara in marathi online): नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्रातील लांड रेकॉर्ड माहिती ऑनलाईन घरबसल्या आपल्या मोबाइलवर कशी पाहायची याची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण गाव नमुना (Gav Namuna) नंबर सातबारा व आठ ऑनलाईन कसे पाहिजे घरबसल्या तुमच्या मोबाईल मध्ये कसे पाहायचे याची माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत.

ऑनलाईन सातबारा कसा बघायचा? | 7 12 Utara in marathi online

  • सर्वप्रथम तुम्हाला https://bhulekh.mahabhumi.gov.in/Pune/Home.aspx भूलेख महाभूमी या महाराष्ट्र शासनाच्या लॅंड रेकॉर्ड च्या अधिकृत पोर्टल वरती जावे लागेल.
satbara online maharashtra
7/12 Online Maharashtra
  • यानंतर तुम्हाला या पोर्टलच्या मुखपृष्ठावर तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिसेल.
  • त्या नकाशामध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करून विभाग निवडू शकता.
  • डाव्या साईडला तुम्हाला तुमच्या विभागाचा सातबारा, ८ अ, मालमत्ता पत्रक असे तीन पर्याय दिसतील. या पर्यायांमध्ये तुम्हाला ज्याची माहिती ऑनलाइन पाहायची आहे तो पर्याय निवडावा लागेल.
  • इथे आपण सात बारा उतारा पाहणार आहोत. त्यासाठी सातबारा उतारा पर्याय निवडावा लागेल आणि तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडावे लागेल. ही माहिती निवडुन झाल्यानंतर लॅंड रेकॉर्ड लोड होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.
  • सातबारा उतारा तुम्ही तुमच्या सर्वे नंबर किंवा गट नंबर किंवा नावावरून देखील शोधू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडावा लागेल.
  • अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन सातबारा उतारा घरबसल्या तुमचा मोबाईल मध्ये पाहू शकता.

कृषी योजना महाराष्ट्र

८ अ उतारा ऑनलाइन कसा पाहायचा?

  • ८ अ उतारा पाहण्यासाठी तुम्हाला https://bhulekh.mahabhumi.gov.in/Pune/Home.aspx भूलेख महाभूमी https://bhulekh.mahabhumi.gov.in/Pune/Home.aspx या महाराष्ट्र शासनाच्या लँड रेकॉर्ड पोर्टल वरती जावे लागेल.
satbara online maharashtra
  • यानंतर तुम्हाला या पोर्टलच्या मुखपृष्ठावर महाराष्ट्राचा नकाशा दिसेल.
  • त्या नकाशामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे.
  • विभाग निवडून झाल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तुमच्या विभागाच्या खाली ८ अ निवडावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल.
  • ही माहिती निवडुन झाल्यानंतर लॅंड रेकॉर्ड लोड होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.
  • तुम्ही तुमच्या सर्वे नंबर किंवा गट नंबर किंवा नावावरून देखील शोधू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडावा लागेल.
  • अशाप्रकारे तुम्ही आठ अ प्रमाणपत्र ऑनलाईन घरबसल्या पाहू शकता.

Online Property Card Maharashtra | ऑनलाईन मालमत्ता पत्रक कसे पाहायचे?

  • तुम्हाला सर्वप्रथम भूलेख महाभूमी https://bhulekh.mahabhumi.gov.in/Pune/Home.aspx या महाराष्ट्र शासनाच्या लँड रेकॉर्ड पोर्टलला भेट द्यावी लागेल.
satbara online maharashtra
  • या पोर्टलच्या मुखपृष्ठावर तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिसेल.
  • त्या नकाशामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
  • जिल्हा निवडून झाल्यानंतर मुखपृष्ठाच्या उजव्या बाजूला तुम्हाला तुमच्या विभागाच्या खाली मालमत्ता पत्रक हा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल.
  • यानंतर सीटीएस CTS नंबर भरावा लागेल आणि थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
  • अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन मालमत्ता पत्रक पाहू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top