बांधकाम कामगार योजना 2024: फायदे, अर्ज, लाभ, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती

Bandhkam Kamgar Yojana 2024: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये बांधकाम कामगार योजना 2024 संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये ही योजना काय आहे, या योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहेत, बांधकाम कामगार योजनेचे फायदे कोणते, योजना कोणासाठी राबवली जात आहे, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, याची अर्ज प्रक्रिया काय, बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म कुठे मिळतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हाला या लेखांमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Bandhkam Kamgar Yojana

बांधकाम कामगार योजना 2024

महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्याकरिता विविध योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकी बांधकाम कामगार योजना ही एक आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार रोजगार उपलब्ध करून दिला जातो. बांधकाम कामगारांचा सामाजिक सुरक्षा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांना आरोग्याविषयी सहाय्य आर्थिक सहाय्य अशा प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सुरू केलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ कामगारांना आर्थिक मदत म्हणून दिला जाणार आहे.

बांधकाम कामगार योजना फायदे 2024

बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट काय?

  • या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारणे.
  • तसेच धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करू देणे.
  • कामगारांची रोजगार क्षमता आणि रोजगाराच्या संधी वाढवणे.
  • त्यांचा कौशल्य विकास करणे.
  • सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य करणे.
  • व्यवसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोरण किंवा कार्यक्रम करून कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे.
  • घातक कामांपासून बाल श्रम काढून श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकटीकरण प्राप्त करणे.
  • कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा प्रचार करणे.

अशा अनेक बाबींचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा असेल, तर तुम्ही अर्ज करून अत्यंत सोप्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकता.

बांधकाम कामगार योजना पात्रता

या योजनेअंतर्गत जे कामगार नवीन इमारत बांधण्यात पासून ते ती इमारत पूर्ण होईपर्यंत काम करतात. अशा सर्व कामगार या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी समाविष्ट आहेत. असे सर्व कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि नोंदणी करण्यास पात्र ठरतील.

महाराष्ट्र घरकुल योजना संपूर्ण माहिती | रमाई आवास योजना

बांधकाम कामगार योजना फायदे

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सहाय्य, आरोग्यविषयक सहाय्य, आर्थिक सहाय्य बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिली जाते. ते आपण सविस्तरपणे पाहू.

सामाजिक सुरक्षा

  • नोंदणीकृत लाभार्थ्याला स्वताच्या विवाहाच्या खर्चासाठी ३०,०००/- रुपये अनुदान म्हणून दिले जाते. त्यासाठी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नोंदणीकृत लाभार्थी कामगाराला मोफत मध्यान्ह जेवण सुविधा या योजनेअंतर्गत दिली जाते.
  • तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा बांधकाम कामगारांना लाभ दिला जातो.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदीत पात्र असलेल्या बांधकाम कामगारांना उपयुक्त असलेली अवजारे खरेदी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला ५००/- रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते. त्यासाठी अवजारे खरेदी करणार असल्याचे हमीपत्र देणे गरजेचे आहे.
  • नोंदणीकृत कामगार लाभार्थ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत विविध लाभ दिले जातात.
  • तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत देखील या कामगारांना लाभ दिले जातात.
  • पात्र कामगारांना पूर्व शिक्षण आणि आवश्यक ते प्रशिक्षण या योजनेअंतर्गत मोफत दिले जाते.
  • सुरक्षा संच कामगारांना पुरवले जातात.
  • दिनांक ३१ ऑगस्ट २०१४ रोजी नोंदणी केलेल्या जीवित असलेल्या बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रति कामगार ३०,०००/- आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.

शैक्षणिक सहाय्य

  • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या पणिल्या २ मुलांना पहिली ते सातवी मध्ये किमान ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असले, तर २,५००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी ७५ टक्के हजेरी बाबतचा दाखला देणे गरजेचे आहे.
  • नोंदणी केलेल्या दोन मुलांना इयत्ता आठवी ते दहावी मध्ये ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असले, तर रुपये ५००/- प्रतिवर्षी प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात.
  • नोंदणीकृत लाभार्थ्याच्या दोन मुलांना इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये कमीत कमी ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये १०,०००/- शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असल्याचे गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे.
  • कामगाराच्या दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगार यांच्या पत्नीला पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्री साठी प्रतिवर्षी २०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य म्हणून दिले जातत. त्यासाठी मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा गुणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या ची पावती किंवा बोनाफाईड सादर करणे आवश्यक आहे.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थ्याच्या दोन पाल्यांना किंवा पत्नीला वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थेत प्रवेश घेण्यासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक शेक्षणिक वर्षी पदवी अभ्यासक्रमासाठी रुपये १ लाख व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी रुपये ६०,०००/- शैक्षणिक सहाय्य म्हणून दिले जातात. त्यासाठी मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या बाबतची पावती सादर करणे आवश्यक आहे.
  • बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना शासनमान्य पदवीके मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलास प्रति शैक्षणिक वर्षी २०,०००/- रुपये आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यास प्रति शैक्षणिक वर्षी २५,०००/- रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातत.
  • कामगाराच्या दोन मुलांना संगणकाचे शिक्षण एमएस-सीआयटी घेत असलेल्या नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शुल्काची परिपूर्ती, तसेच एमएस-सीआयटी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्याच्या फी शैक्षणिक आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाईल.
  • पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप या योजनेअंतर्गत केले जाईल.

आरोग्य विषयक साहाय्य

  • नोंदणीकृत स्त्री बांधकाम कामगार असो किंवा पुरुष बांधकाम कामगार पत्नीला नैसर्गिक प्रसुतीसाठी १५,०००/- रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २०,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीचे प्रमाण पत्र आणि उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
  • जर कामगार लाभार्थ्याच्या कुटुंबीयांना गंभीर आजार झाले, तर त्याच्या उपचारासाठी १ लाख रुपये वैद्यकीय सहाय्य एकाच सदस्यास एकाच वेळी कुटुंबातील २ सदस्य पर्यंत मर्यादित डे आहे. तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने गंभीर आजाराबाबत दिलेले प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचार कागदपत्रे.
  • कामगाराच्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली, तर त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १ लाख रुपये मुदत बंद ठेव लाभ दिला जाईल. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया बाबतचे प्रमाणपत्र आणि अर्जदार कामगाराला एक पेक्षा अधिक मुली नाहीत याचा पुरावा आणि शपथपत्र.
  • नोंदणी केलेल्या कामगाराला ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्याला २ लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
  • जर बांधकाम कामगारांचे विमासंरक्षण असेल, तर विमा रकमेची परिपूर्ती किंवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ दिला जातो. त्यासाठी ७५ टक्के अपंगत्व असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍याकडे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा देखील लाभ घेता येणार आहे. कामगारांची वेळोवेळी तपासणी केली जाईल. त्यासाठी शासकीय केंद्रातून ऊपचार घेतल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

आर्थिक सहाय्य

  • नोंदणी केलेल्या लाभार्थ्याच्या कामावर असताना मृत्यू झाला, तर त्याच्या वारसाला ५ लाख रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला किंवा कामावर असताना मृत्यू झाला आहे असा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
  • नोंदणीकृत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला, तर त्याच्या वारसाला २ लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला सादर करणे गरजेचे आहे.
  • नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराला अटल बांधकाम कामगार आवास शहरी योजने अंतर्गत २ लाख रुपयांची आर्थिक सहाय्य केले जाते. त्यासाठी तो कामगार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहे याचे सक्षम अधिकार्‍याचे पत्र देणे आवश्यक आहे.
  • घर बांधण्यासाठी ४.५ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते. त्यामध्ये केंद्र शासनाकडून २ लाख रुपये आणि कल्याणकारी मंडळाकडून २.५ लाख रुपये दिले जातात.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थ्याला लाभार्थी कामगाराचा जर मृत्यू झाला, तर त्याच्या नामनिर्देशित वारसाला १०,०००/- रुपये त्याच्या अंत्यविधीसाठी मदत म्हणून दिले जातात. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले मृत्युपत्र आवश्यक आहे.
  • कामगाराचा मृत्यू झाला, तर त्याच्या विधवा पत्नीला अथवा स्त्री कामगाराचा निधन झाले तर विधुर पतीला पाच वर्षापर्यंत प्रतिवर्षी २४,०००/- रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला गरजेचा आहे.
  • घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या होम लोन वरील व्याजाची रक्कम दहा लाख किंवा दोन लाख अनुदान स्वरूपात दिली जाते. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतले चा पुरावा किंवा कर्ज किंवा घर पती-पत्नीचा संयुक्त नावे असल्याचा पुरावा गरजेचा आहे.
  • महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांकरिता व्यसनमुक्ती केंद्र उपचाराकरिता नोंदीत कामगारास रुपये ६,०००/- आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातत.

बांधकाम कामगार योजना अटी

  • बांधकाम कामगार योजनेचा लाभ १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांना घेता येईल.
  • अर्जदार कामगार महाराष्ट्राचा नागरिक असणे गरजेचे आहे.
  • मागील १२ महिन्यांमध्ये ९० दिवसापेक्षा जास्त त्याने बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये नोंदणी करणे.

Bandhkam Kamgar Yojana Documents बांधकाम कामगार नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे

  • नोंदणी अर्ज
  • पॅन कार्ड
  • दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशनकार्ड
  • अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड
  • अन्नपूणा शिधापत्रिका
  • केशरी शिधापत्रिका
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रहिवाशी पुरावा
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट आकारातील ३ फोटो
  • अर्जदाराचा जन्म प्रमाणपत्र (जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
  • नियोक्त्याचे मागील वर्षभरात ९० दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
  • महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • स्थानिक पत्ता पुरावा
  • कायमचा पत्ता पुरावा
  • ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • नोंदणी फी- रू. २५/- व वार्षिक वर्गणी रू.६०/- ५ वर्षाकरिता व मासिक वर्गणी रु.१/-

बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी कशी करायची? बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन

  • या योजने अंतर्गत नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • होमपेज वर गेल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी असा पहिलाच ऑप्शन मिळेल. त्यावर ती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
  • आधार क्रमांक भरायचा आहे.
  • मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि Process to Form या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • आत्ता तुमच्या समोर बांधकाम कामगार नोंदणी अर्ज ओपन होईल.
  • त्यामध्ये खालील विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल.
  • Personal Details / वैयक्तिक माहिती
  • Permanent Address / कायमचा पत्ता
  • Family Details / कौटुंबिक तपशील
  • Bank Details / बँक तपशील
  • Employer Details / नियोक्ता तपशील
  • Details of the 90 Days Working Certificate / ९० दिवसांच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील
  • Supporting documents / समर्थन दस्तऐवज
  • वरील सर्व माहिती भरून Save बटनावर क्लिक करायचं आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करावा लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top