नागरी सहकारी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना 2024 लागू महाराष्ट्र शासन GR

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात एकरकमी कर्ज परतफेड योजना 2022 संबंधित 6 जून 2022 रोजीच्या शासन परिपत्रकाची माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

एकरकमी कर्ज परतफेड योजना 2022

महाराष्ट्र राज्यातील नागरी सहकारी बँकांना अनुत्पादक कर्जामधील प्रभावी वसुलीसाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शासनास शिफारस केल्याप्रमाणे योजना राबवण्यास यापूर्वी वेळोवेळी शासनाने मंजुरी दिलेली आहे.

योजनेस काही बदलांसह मुदतवाढ

योजनेस मुदतवाढ मिळण्याबाबत अनेक नागरी सहकारी बँकांनी मागणी केली होती. नागरी सहकारी बँकांचे वाढते कमी करण्याच्या दृष्टीने योजनेस मुदतवाढ दिल्यामुळे नागरी सहकारी बँकांची वाढते NPA कमी होण्यास आतापर्यंत मदत झालेली आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरी सहकारी बँकांसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने नागरी सहकारी बँकांसाठी या योजनेस काही बदलांसह मुदतवाढ देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सर्व GR 2022

maharashtra shasan nirnay gr

एकरकमी कर्ज परतफेड योजना जीआर 6 जून 2022

या शासन निर्णयासोबत नागरी सहकारी बँकांसाठी योजना राबवण्यास मंजुरी दिली आहे. ही योजना राबविण्यात यावी म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 157 नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनातील नागरी सहकारी बँकांना भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचा आधीन राहून ही योजना अमलात आणण्यापुरती महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 च्या नियम 49 मधील तरतुदी मधून सूट दिली आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top